Agriculture Agricultural News Marathi article regading fertilizer management in sugarcane | Page 2 ||| Agrowon

सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा

डॉ. प्रीती देशमुख, सौ. जे. पी. खराडे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्यास या खतांची उपयुक्तता वाढते. उभ्या पिकात खते देताना जमिनीत वापसा असावा. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. 

रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्यास या खतांची उपयुक्तता वाढते. उभ्या पिकात खते देताना जमिनीत वापसा असावा. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. 

सुरु उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस तोडणी १५ फेब्रुवारीच्या आत होते. त्यामुळे खोडवा उत्तम ठेवता येतो. खोडवा ठेवायचा नसल्यास जमिनीची मशागत करून जमिनीला चार महिने ऊन मिळते. या जमिनीमध्ये खरीप व रब्बी पिके घेऊन पुन्हा सुरू उसाची लागवड करता येते. यामुळे पिकांची चांगली फेरपालट होऊन जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून  सुपीकता राखता येते. 
सुरु लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. यानंतर लागवड झाल्यास जादा तापमानामुळे खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो, पर्यायाने उत्पादनही घटते. लागवडीसाठी जास्त साखर उतारा आणि उत्पादन देणाऱ्या को ८६०३२ (नीरा), व्हीएसआय ४३४, कोसा ६७१, एमएस १०००१ आणि व्हीएसआय ०८००५ या जातींची निवड करावी.

सेंद्रिय खतांचा वापर

 एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर लागणी अगोदर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. याचबरोबरीने ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके 
फायदेशीर ठरतात. 

रासायनिक खतांचा वापर

 • उसाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी १०० किलो नत्र, ४६ किलो स्फुरद व ४६ किलो पालाशची शिफारस आहे. माती परीक्षण करून खत मात्रेत योग्य बदल करावा.
 •  को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा म्हणजे १२० किलो नत्र, ५६ किलो स्फुरद व ५६ किलो पालाश प्रतिएकरी द्यावी. 
 •  खतांचा पहिला हप्ता म्हणजेच १० टक्के नत्र लागवडीपूर्वी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते. लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसास फुटवा येण्यास सुरुवात होते, फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी म्हणून नत्र खताची ४० टक्के मात्रा उसाच्या बुडात द्यावी. त्यानंतर अवजाराच्या साहाय्याने बाळ बांधणी करावी. बाळबांधणी केल्यामुळे खताची मात्रा मातीत गाडली जाते, उसाच्या बुडाला मातीची हलकीशी भर दिली जाते. त्यामुळे फुटवा चांगला फुटतो आणि जोमदार वाढ होते. 
 • पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास मदत होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा (युरिया) द्यावी. अवजारांच्या साहाय्याने हातपेरणी करावी किंवा खत उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे म्हणजे खत मातीआड होईल, जमीन मोकळी होईल. 
 •  लागणीनंतर ३.५ ते ४ महिन्यांत उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. मोठी बांधणी करताना प्रथम शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खताची ४० टक्के, स्फुरद व पालाशची उर्वरित प्रत्येकी ५० टक्के मात्रा उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे, म्हणजे खत मातीआड होईल. जमीन मोकळी होईल. त्यानंतर रिझरच्या साहाय्याने बांधणी करावी म्हणजे उसाला चांगली भर लागेल. 
 • रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांच्या साहाय्याने द्यावीत.
 • उभ्या पिकात खते देताना जमिनीत वापसा असावा. 
 • रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. 
 • स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्टरी २.५ लिटर द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. 
 • पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. 
 • रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्यास रासायनिक खतांची उपयुक्तता वाढते. 
 • गंधक हे जरी दुय्यम अन्नद्रव्य असले तरी उसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे. लागणीच्यावेळी हेक्टरी ६० किलो गंधक शेणखतात मिसळून द्यावा. 

- ०२०- २६९०२२७८

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)


इतर नगदी पिके
उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव सध्याच्या पावसाळी वातावरणात ऊस जोमदार वाढीच्या...
उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे...ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...