Agriculture Agricultural News Marathi article regarding agriculture machines. | Page 2 ||| Agrowon

मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारे

वैभव सूर्यवंशी
बुधवार, 6 जानेवारी 2021

कृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य आहे. याचबरोबरीने उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर, वेळेवर शेती कामांची पूर्तता करणे शक्य आहे.

कृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य आहे. याचबरोबरीने उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर, वेळेवर शेती कामांची पूर्तता करणे शक्य आहे.

ट्रॅक्टरचलित खड्डा करणारे यंत्र 

 • हे ट्रॅक्टरचलित खड्डा करणारे यंत्र आहे. याचा उपयोग फळबागा,वृक्षारोपण किंवा कुंपणाचे खड्डे करण्यासाठी केला जातो.
 • यंत्र ट्रॅक्टरच्या थ्री पॉइंट लिंकेजला जोडलले असते. ट्रॅक्टर पी.टी.ओ. च्या पॉवर ने यंत्राचा खड्डा करणारा स्क्रू चालविला जातो.

ट्रॅक्टरचलित कापूस पऱ्हाट्या कुट्टी यंत्र
कापूस कुट्टी यंत्र ट्रॅक्टरचलित असून कापूस वेचणी झाल्यावर कापसाच्या पऱ्हाट्या कुट्टी करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे यंत्र ट्रॅक्टरच्या मागच्या थ्री पॉइंट लिंकेजला जोडून पी.टी.ओ. पॉवरच्या साहाय्याने चालविले जाते.एका वेळेस कापूस पऱ्हाट्याची एक ओळ  जमिनीपासून ५ से.मी पर्यंत कापून कुट्टी करून ब्लोअर च्या साहाय्याने मागे जमिनीवर टाकली जाते.केलेली कुट्टी गोळा करावयाची असल्यास त्याच यंत्राला मागच्या बाजूला ट्रॉली जोडून त्यात गोळा करता येते.
वैशिष्टे

 • अतिशय सोपे,जलद व कार्यक्षम यंत्र
 • वेळ, श्रम आणि पैशात बचत 
 • भाडेतत्वावर अधिक उपयोगी कार्यक्षम यंत्र
 • चार कुट्टी करण्यासाठी सुद्धा वापर करता येतो

ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र

 • या यंत्राला बूम फवारणी यंत्र असे म्हणतात. मूग,उडीद, सोयाबीन, कापूस,हरभरा,आदि पिकांसाठी याचा वापर करता येतो. पिकाप्रमाणे  बुमची उंची ठरवून फवारणी करता येते.
 •  एका वेळेस ३० फूट फवारणी २० नोझलद्वारे करता येते.या मध्ये फूल कोन नोझल व फ्लॅट नोझल आहेत. याचा उपयोग अनुक्रमे कीडनाशक व तणनाशक फवारणीसाठी केला जातो.
 • ट्रॅक्टरला मागच्या बाजूला थ्री पॉइंट लिंकेजला जोडला जातो. पी.टी.ओ.च्या साहाय्याने एच.टी.पी. फिरवून दाब तयार केला जातो. या फवारणी यंत्रामध्ये मुख्यतः टाकी, पंप असेंब्ली,सक्शन पाइप सोबत स्ट्रेनर,प्रेशर गेज,रेग्युलेटर,एअर चेंबर,डिलिव्हरी पाईप आणि स्प्रे बूम सोबत नोझल दिलेले आहे.

पॉवर वीडर

 • या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो. 
 •  अंतर मशागतीसाठी उपयुक्त. 
 •  पॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात,उद्यानविद्या आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते. 
 •  ज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६० ते ७० सें.मी.पेक्षा जास्त आहे, अशा पिकांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इत्यादी विविध पिकांसाठी आपण पॉवर वीडरचा वापर करू शकतो.
 •  विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत. 
 •  पॉवर वीडरमध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल  इ. भाग आहेत. 

- वैभव सूर्यवंशी, 
 ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ, कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव)

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
काढणीपश्‍चात कामासाठी सुधारित यंत्रेमानवचलित सुपारी सोलणी यंत्र पारंपरिक पद्धतीने...
सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची...सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित...
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...