सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची गुणवत्ता

सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक, अभियांत्रिकी तंत्रांचा वापर करून पशुखाद्य व चाऱ्याची पौष्टिकता वाढवली जाते. यामध्ये पोपिंग, सूक्ष्म जिवाणूंचे कल्चर आणि चाटण विटांचा वापर केला जातो.
animal feed processing unit
animal feed processing unit

सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक, अभियांत्रिकी तंत्रांचा वापर करून पशुखाद्य व चाऱ्याची पौष्टिकता वाढवली जाते. यामध्ये पोपिंग, सूक्ष्म जिवाणूंचे कल्चर आणि चाटण विटांचा वापर केला जातो. 

पशुआहारातील घटकांचे आकारमान कमी करण्यासाठी ते दळले किंवा भरडले जातात. दळणे ही प्रक्रिया पद्धत अन्न घटक मिसळणे आणि कांड्या (पॅलेट) करण्यासाठी कमी खर्चिक आणि महत्त्वाची आहे. आकारमान कमी झाल्यामुळे त्या अन्न घटकाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढून काही द्रव्य तयार होऊन त्यांची पचनीयता वाढते. त्यामुळे अन्नघटकांचा सुयोग्य वापर होऊन जनावरांचे दूध उत्पादन वाढते. दळण्यासाठी हॅमर मिल, चक्की इत्यादी यंत्रणाचा वापर केला जातो. रोलिंग  धान्य हे रोलर मिलमध्ये टाकून रोल केले जाते. त्यामुळे दळायला मदत होते. यासाठी रोलर मिलचा वापर करतात. पोपिंग किंवा फुगवणे   धान्य उच्च तापमानाला जसे की ३७ ते ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाला  १५ ते ३० सेकंदासाठी तापवले जाते. जेणे करून ते फुगून त्यातील स्टार्च फुटून जनावरांसाठी ओटीपोटात उपलब्ध होतो. अशाप्रकारे प्रक्रिया केलेले धान्य रुचकर व चवदार लागते. त्यामुळे त्याची पचनीयता वाढण्यास मदत होते. भाजणे  धान्य विशिष्ठ तापमानाला म्हणजेच १४.९ अंश सेल्सिअसला भाजले जाते. सोयाबीन तेल भाजून घेतल्यामुळे त्यातील हानिकारक तत्त्व कमी होऊन पचनीयता वाढविण्यास मदत होते. यासाठी विविध प्रकारच्या व्हेसल्स वापरल्या जातात. ओली प्रक्रिया पद्धत  भिजवणे : बहुतांश वेळा पशुखाद्याचे घटक १२ ते १५ तास भिजवून जनावरांना खाऊ घातले जातात. त्यामुळे त्या अन्नघटकांमधील हानिकारक तत्त्व नाहीशी होण्यास मदत होते. वाफ देणे : ही प्रक्रिया धान्यावर केली जाते. ज्यामध्ये दाबावर अवलंबून काही कालावधीसाठी (८ ते २० मिनिटे) वाफ दिली जाते. साखर कारखान्यातील ऊस बगॅसवर अशा प्रकारची वाफेची प्रक्रिया केली जाते. यामुळे त्याची पचनीयता आणि पौष्टिकता वाढते. यासाठी विशिष्ट प्रकारची बंदिस्त व्हेसल वापरून वाफ देता     येते.

युरिया प्रक्रिया ः

वाळलेल्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये युरिया आणि पाण्याचा संयोग होऊन अमिनो ॲसिड तयार होतात. त्यामुळे पचनीय प्रथिने जास्त प्रमाणात मिळून वाळलेला चारा सकस होतो.युरिया प्रक्रियेसाठी जमिनीतील खड्डा, प्लॅस्टिकचे ड्रम, प्लॅस्टिक पिशव्या इत्यादीचा वापर केला जातो.  सूक्ष्म जिवाणूंचे कल्चर :

उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे कल्चर वापरून वाळलेला आणि हिरवा चारा सकस करता येतो. 

अभियांत्रिकी तंत्रांचा वापर  ठोकळे (ब्लॉक) : हायड्रोलिक दाबाचा वापर करून एका विशिष्ठ तंत्रज्ञानाद्वारे वाळलेला चारा आणि पशुखाद्य वापरून संपूर्ण पशुआहार ठोकळा, मुरघास आणि चाऱ्यांचे ठोकळे बनवले जातात. या तंत्रज्ञांचा चांगला फायदा होतो. अशा प्रकारच्या ठोकळ्यांमुळे जनावरे तो आहार व्यवस्थित खातात. त्यांची पचनीयता वाढते. कांड्या (पॅलेट) : पशुखाद्य आणि संपूर्ण पशुआहार एका विशिष्ठ पद्धतीने वाफ देऊन पॅलेट मिलच्या साह्याने कांड्यामध्ये रूपांतरित केला जातो. जवळपास ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमानाला प्रक्रिया करून कांड्या किंवा पॅलेट बनवल्या जातात. याचा फायदा म्हणजे पशुखाद्य चवीला रुचकर लागून जनावरे आवडीने खातात. गोळी पेंड स्वरूपातील पशुखाद्य खायला रुचकर असते, खाद्याची पचानीयता वाढते. चाटण विटा : विशिष्ठ प्रकारचे तंत्रज्ञान वापरून खनिज मिश्रणाच्या चाटण विटा बनवल्या जातात. जनावरांसाठी त्या खनिजांचे उपयुक्त माध्यम म्हणून वापरले जाते. अशा प्रकारच्या चाटण विटा सर्व प्रकरचे खनिजे मिळण्याचे शाश्‍वत माध्यम म्हणून गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या यांना फायद्याचे ठरतात.

-डॉ. मनोजकुमार आवारे,  ९४२१००७७८५ (डॉ. आवारे बाएफ संस्थेमध्ये येथे पशुआहार व पशुपोषण विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पशू सूक्ष्मजीवाणू व विषाणू तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com