केळीपासून प्युरी, पावडर

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.
banana products
banana products

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.

केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्म असणारे फळ आहे. केळीमध्ये साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे अ, क आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. केळीपासून विविध टिकाऊ व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.    

पिकलेल्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ  सुकेळी  पिकलेल्या गोड केळीला सुकवून तयार होणाऱ्या पदार्थाला सुकेळी किंवा बनाना फिग असे म्हणतात. पूर्ण केळी किंवा लांबट तुकड्यांना गंधकाची प्रक्रिया करून ड्रायरमध्ये वाळविले जाते (पाण्याचा अंश १५ ते १८ टक्के ठेवण्यासाठी). त्यानंतर वाळलेली केळी पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅकिंग केली जातात. ही प्रक्रियायुक्त केळी केक, मिठाई व इतर बेकरी उत्पादनात वापरली जातात. प्युरी  पूर्ण पिकलेल्या केळी गरावर प्रक्रिया करून प्युरी बनविली जाते. केळीच्या इतर प्रक्रियायुक्त पदार्थांच्या तुलनेत प्युरीची सर्वाधिक निर्यात होते. लहान मुलांसाठी बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये आणि औषधी निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. रस पिकलेल्या केळीचा गर काढून त्यामध्ये प्रोटीयोलायटीक नावाचे कायक मिसळले जाते. केळी गराचा रस तयार होईपर्यंत चांगले ढवळावे. केळीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि उर्जासत्वे मुबलक प्रमाणात असतात. या रसाचा वापर ऊर्जा पेय म्हणून केला जातो. पावडर  पूर्ण पिकलेल्या केळीचा गर बारीक केला जातो. बारीक केलेली पावडर स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर मध्ये सुकवली जाते. पावडरमध्ये पाण्याचा अंश २ टक्के ठेवण्यासाठी पुन्हा कॅबिनेट ड्रायरमध्ये सुकवली जाते. केळी पावडरचा वापर विविध खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये केला जातो.

हिरव्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ  चिप्स किंवा वेफर्स  वेफर्स बनविण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या केळींची निवड  करावी. स्टीलचा चाकू किंवा केळी सोलण्याच्या यंत्राच्या साह्याने केळीची साल काढावी. स्लायसरने केळीच्या चकत्या पाडून तुरटीच्या पाण्यात ५ ते ७ मिनिटे ठेवाव्यात. नंतर चकत्या पाण्यातून काढून एका सुक्या कापडावर पसरून ठेवाव्यात. तेल गरम करून त्यामध्ये चकत्या तळून घ्याव्यात. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कडक तळून घ्यावे. तयार झालेले वेफर्स थंड झाल्यावर योग्य आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये विक्रीसाठी भरावेत. जॅम अर्धवट पिकलेल्या केळीचा गर काढून एकजीव करावा. १ किलो केळी गरामध्ये १ किलो साखर, ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल, ५ ग्रॅम पेक्टिन व खाद्य रंग मिसळावेत. नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. शिजवताना सतत ढवळत राहावे म्हणजे करपत नाही व चांगल्या प्रतीचा जॅम होतो. मिश्रणाचा डिग्री ब्रिक्स ६८ ते ७० आल्यास जॅम तयार झाला असे समजावे. तयार जॅम कोरड्या आणि निर्जंतुक केलेल्या रुंद काचेच्या भरणीत भरावा.

 - शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२  

(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com