Agriculture Agricultural News Marathi article regarding banana processing | Agrowon

केळीपासून प्युरी, पावडर

शशिकिरण हिंगाडे
सोमवार, 30 मार्च 2020

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.

केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्म असणारे फळ आहे. केळीमध्ये साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे अ, क आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. केळीपासून विविध टिकाऊ व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.  
 

पिकलेल्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ 
सुकेळी 
पिकलेल्या गोड केळीला सुकवून तयार होणाऱ्या पदार्थाला सुकेळी किंवा बनाना फिग असे म्हणतात. पूर्ण केळी किंवा लांबट तुकड्यांना गंधकाची प्रक्रिया करून ड्रायरमध्ये वाळविले जाते (पाण्याचा अंश १५ ते १८ टक्के ठेवण्यासाठी). त्यानंतर वाळलेली केळी पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅकिंग केली जातात. ही प्रक्रियायुक्त केळी केक, मिठाई व इतर बेकरी उत्पादनात वापरली जातात.

प्युरी 
पूर्ण पिकलेल्या केळी गरावर प्रक्रिया करून प्युरी बनविली जाते. केळीच्या इतर प्रक्रियायुक्त पदार्थांच्या तुलनेत प्युरीची सर्वाधिक निर्यात होते. लहान मुलांसाठी बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये आणि औषधी निर्मितीसाठी याचा वापर केला जातो.

रस
पिकलेल्या केळीचा गर काढून त्यामध्ये प्रोटीयोलायटीक नावाचे कायक मिसळले जाते. केळी गराचा रस तयार होईपर्यंत चांगले ढवळावे. केळीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि उर्जासत्वे मुबलक प्रमाणात असतात. या रसाचा वापर ऊर्जा पेय म्हणून केला जातो.

पावडर 
पूर्ण पिकलेल्या केळीचा गर बारीक केला जातो. बारीक केलेली पावडर स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर मध्ये सुकवली जाते. पावडरमध्ये पाण्याचा अंश २ टक्के ठेवण्यासाठी पुन्हा कॅबिनेट ड्रायरमध्ये सुकवली जाते. केळी पावडरचा वापर विविध खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये केला जातो.

हिरव्या केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ 
चिप्स किंवा वेफर्स 
वेफर्स बनविण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या केळींची निवड  करावी. स्टीलचा चाकू किंवा केळी सोलण्याच्या यंत्राच्या साह्याने केळीची साल काढावी. स्लायसरने केळीच्या चकत्या पाडून तुरटीच्या पाण्यात ५ ते ७ मिनिटे ठेवाव्यात. नंतर चकत्या पाण्यातून काढून एका सुक्या कापडावर पसरून ठेवाव्यात. तेल गरम करून त्यामध्ये चकत्या तळून घ्याव्यात. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कडक तळून घ्यावे. तयार झालेले वेफर्स थंड झाल्यावर योग्य आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये विक्रीसाठी भरावेत.

जॅम
अर्धवट पिकलेल्या केळीचा गर काढून एकजीव करावा. १ किलो केळी गरामध्ये १ किलो साखर, ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल, ५ ग्रॅम पेक्टिन व खाद्य रंग मिसळावेत. नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. शिजवताना सतत ढवळत राहावे म्हणजे करपत नाही व चांगल्या प्रतीचा जॅम होतो. मिश्रणाचा डिग्री ब्रिक्स ६८ ते ७० आल्यास जॅम तयार झाला असे समजावे. तयार जॅम कोरड्या आणि निर्जंतुक केलेल्या रुंद काचेच्या भरणीत भरावा.

 - शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२  

(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड )

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...
फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...
असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...
फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
महत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...
गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...
केळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...