वेळेवर करा कर्जाची परतफेड

सुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा कालावधी हा “हप्ता नाही” असा कालावधी असतो. त्या काळातील फक्त व्याज भरावे लागते. मात्र, तुमच्याकडे हप्ते भरण्यायोग्य उत्पन्न येत असेल तर या काळातील व्याज हे मुद्दलात एकत्र करून हफ्ते ठरवता येतात.
poultry business
poultry business

सुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा कालावधी  हा “हप्ता नाही” असा कालावधी असतो. त्या काळातील फक्त व्याज भरावे लागते. मात्र, तुमच्याकडे हप्ते भरण्यायोग्य उत्पन्न येत असेल तर या काळातील व्याज हे मुद्दलात एकत्र करून हफ्ते ठरवता येतात.

स दाशिवच्या कुक्कुटपालनाचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचा निरोप मिळाला. ते पत्र घेण्यासाठी सदाशिव आणि दिगंबर  बँकेत गेले. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी कर्ज मंजूरी पत्र देताना त्याला शुभेच्छा देताना सांगितले की, बँकेला आवश्यक कागदपत्रांवर सह्या करून त्वरित कर्ज रक्कम घ्यावी. प्रकल्पास शक्य तितक्या लवकर सुरवात करावी.  त्यांनी सदाशिवला कर्जाची नियमित परतफेड व त्यांचे हप्ते यांची सविस्तर माहिती दिली. ही माहिती ऐकत असलेल्या दिगंबरला राहवले नाही. तो म्हणाला की, माझ्या डेअरीच्या कर्जाची परतफेड आणि सदाशिवच्या कर्जामध्ये फरक  जाणवतो. हा असा दुजाभाव का? त्यावर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांना पुन्हा सर्व बाबी समजावताना सांगितले की,  हे दोन वेगळे व्यवसाय आहेत. त्यांच्या कर्जाचे हप्ते, रक्कम उचलण्याच्या वेळा वेगळ्या असणार आहेत. कर्जाच्या परतफेडीमध्ये  कर्जाचे मुद्दल,व्याज, परतफेडीचा हप्ता आणि परतफेडीचा कालावधी अशा अनेक गोष्टी असतात. त्याचे प्रमाण हे व्यवसायागणिक वेगवेगळे असते. याबाबत त्यांनी आणखी स्पष्टीकरण दिले. ते असे...

  • प्रकल्पातून उत्पन्नाला सुरुवात कधी होणार, यावर परतफेडीची सुरवात अवलंबून असते.
  • कर्जाचा हप्ता व व्याज  एकत्र भरवायचे असते.
  • कर्जाचा हप्ता हा मासिक, त्रैमासिक, सहामाही, किंवा वार्षिक असा असू शकतो.
  • अल्पमुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज या नुसारही  परतफेडीचा कालावधी ठरत असतो.
  • पीक कर्ज हे अल्प मुदतीचे कर्ज असते.
  • सुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा कालावधी  हा “हप्ता नाही” असा कालावधी असतो. त्या काळातील फक्त व्याज भरावे लागते. मात्र, तुमच्याकडे हप्ते भरण्यायोग्य उत्पन्न येत असेल तर या काळातील व्याज हे मुद्दलात एकत्र करून हफ्ते ठरवता येतात.
  • कर्ज नियमित असते,  तेव्हा सरळ व्याज दराने व्याज आकारले जाते.
  • दिगंबर आणि सदाशिव या दोघांनी बँक अधिकाऱ्यांचे आभार मानले. कर्ज परतफेड व्यवस्थितपणे करण्याचे आश्वासनही दिले.  दिगंबरने जाताना पुन्हा एक शंका विचारली. तो म्हणाला, “आमच्या गावातील हंबीरराव यांनी घरासाठी कर्ज घेतले आहे. ते त्या कर्जाची परतफेड  इ.एम.आय ने हप्ता भरतात. मला हे  इ.एम.आय म्हणजे काय, ते कळले नाही.”  त्यावर बँक अधिकाऱ्यांनी त्यांना  इ.एम.आय  म्हणजे काय, ते समजून संगितले. 

    यानंतर दोघांनी परत आभार मानले. त्यांच्या मनातील अनेक शंका मिटल्या होत्या. दिगंबर सदाशिवला म्हणाला, “मीही उगाच घाबरत होतो. परतफेड ही व्यवसायानुसार, त्या माणसाच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार करता येते. आपल्या आर्थिक गणितांचा विचार करून बॅंकाच्या सहकार्याने परतफेड ठरवता येते. म्हणजेच आपल्याला सोपे आणि सुलभ होईल, अशा प्रकारे नियोजन केल्यास खरेतर काळजीचे कारण राहणार नाही. प्रत्येक कर्जदाराने हे समजून घेतले पाहिजे. मीही आधी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.”  “होय, आपण घेतलेल्या कर्जाची थकबाकी नसेल, तर बँकेमध्ये आपली पत वाढते. बँका आपल्याला कर्ज देण्यास स्वतः पुढाकार घेतात. हे मी आमच्या दाजींच्या बाबत पाहिले आहे.”  सदाशिव पुढे म्हणाला की, मागील वेळेला बँक अधिकारी जेव्हा माझ्या जागेची पाहणी करावयास आले होते, त्यावेळी मी विचारले होते की ,जर काही कारणाने उदा. नैसर्गिक आपत्ती, किंवा व्यवसायातील काही अपरिहार्य  कारणे यामुळे हप्ता वेळेत भरता आला नाही तर काय करायचे? त्यावर त्यांनी संगितले होते की , बँकेला कळवावे. अडचण रास्त असेल, तर बँक परतफेडीच्या हप्त्याची पुनर्बांधणीही करून देते. म्हणजे कर्ज थकबाकीत जात नाही. 

    इ.एम.आय  म्हणजे काय 

  • इ.एम.आय (EMI) म्हणजे Equated Monthly Instalment. समजा कर्जाची परतफेड ही साठ महिन्याची असेल, तर साठही महिने कर्ज परत फेडीचा हप्ता सारखाच असतो. 
  • यात  मुद्दल व व्याज वेगळे नसते,दोन्ही एकत्र असतात. ज्यांना  दरमहा ठरावीक उत्पन्न असते, अशा व्यक्तींसाठी अशा प्रकारची परतफेड सोईस्कर असते. उदा. पगारदार / नोकरदार व्यक्ती. 
  • गृह कर्ज, वाहन कर्ज यामध्ये परत फेडीसाठी इ.एम.आय म्हणजेच दरमहाचे हप्त्याद्वारे परतफेड केली जाते. 
  •   - अनिल महादार, ८८०६००२०२२ (निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com