Agriculture Agricultural News Marathi article regarding Biofloc technology in fish farming | Agrowon

मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे फायदे

डॉ. सुहास वासावे, संगीता वासावे,  डॉ. केतन चौधरी
शनिवार, 18 जानेवारी 2020

टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी संवर्धनात पाण्याचा मर्यादित वापर, पर्यावरण विषयक चिंता, जमिनीची किंमत आणि खाद्यावरील खर्च आटोक्यात आणण्याकरता बायोफ्लाक तंत्रज्ञान फायदेशीर ठरले आहे.

टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी संवर्धनात पाण्याचा मर्यादित वापर, पर्यावरण विषयक चिंता, जमिनीची किंमत आणि खाद्यावरील खर्च आटोक्यात आणण्याकरता बायोफ्लाक तंत्रज्ञान फायदेशीर ठरले आहे.

  • जैवपुंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामुळे सघन मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये पाण्याचा सुयोग्य वापर होतो. अधिक जैव सुरक्षा आहे. खाद्य कमी लागते, त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी होतो.
  • उत्पादित मासळीचा दर्जा अतिशय उच्च असतो, त्यामुळे बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. मात्र जैवपुंज तंत्रज्ञानामध्ये जास्त भांडवली गुंतवणूक करावी लागते.

तंत्रज्ञानाचा वापर 

  • जैवपुंज तंत्रज्ञानाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. समुद्रातील कोळंबी संवर्धनात असलेल्या समस्या सोडविण्याकरिता जे विविध उपाय शास्त्रज्ञाने पडताळून पाहिले. त्यातून जैवपुंज तंत्रज्ञान विकसित झाले (१९८०). टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी संवर्धनात पाण्याचा मर्यादित वापर, पर्यावरणविषयक चिंता, जमिनीची किंमत आणि खाद्यावरील खर्च आटोक्यात आणण्याकरता असे प्रयोग करण्यात आले.
  • जैवपूंज तंत्रज्ञानाचा पहिला यशस्वी व्यावसायिक प्रयोग १९८८ मध्ये फ्रान्समधील माहिटी येथे झाला. याठिकाणी दहा गुंठे क्षेत्रातील सिमेंट कॉंक्रीटच्या तलावातून २० टन प्रति हेक्‍टरी प्रतिवर्ष उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर अमेरिकेतील बेलीज अॅक्वाकल्चर फार्म येथे १.६ हेक्टर जलक्षेत्रातील प्लॅस्टिक लायनिंग तलावातून २६ टन मत्स्य उत्पादन घेण्यात आले आणि जैवपूंज तंत्रज्ञान मत्स्यशेतीकरिता योग्य असल्याचे निदर्शनास आले.
  • त्यानंतर अमेरिकेत सुमारे ५७० घनमीटर पाण्यात अति सधन पद्धतीने केलेल्या कोळंबी शेतीतून ४५ टन उत्पादन घेण्यात आले. मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करून उच्च प्रतीचे जैविक धोक्यांचे व्यवस्थापन करणे, हे अशा व्यावसायिक प्रयोगाचे उद्दिष्ट होते. 
  • सन १९९० च्या दशकात इस्राईल आणि अमेरिकेने तिलापिया आणि व्हनामी कोळंबी संवर्धनाचे यशस्वी प्रयोग केले. रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात जैवपुंज तंत्रज्ञानाचे प्रयोग घेण्यात आले असून, मत्स्यबीज ते मत्स्य बोटुकली उत्पादनात जैवपुंज तंत्रज्ञान उपयोगी असल्याची शिफारस करण्यात आली आहे.

- डॉ. केतन चौधरी ९४२२४४११७८
(मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी)

 


इतर कृषिपूरक
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...