Agriculture Agricultural News Marathi article regarding Biofloc technology in fish farming | Agrowon

मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती

डॉ.आलोक वानकर, डॉ. एम. एफ.सिद्दीकी
मंगळवार, 12 मे 2020

भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे. या तंत्राविषयी शेतकरी, व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. या तंत्राविषयी अधिक माहिती घेऊयात.

भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे. या तंत्राविषयी शेतकरी, व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. या तंत्राविषयी अधिक माहिती घेऊयात.

पारंपारिक मत्स्य व्यवसाय शेततळ्यांमध्ये केला जातो. मात्र, या पद्धतीमध्ये खाद्य वाया जावून उत्पादन खर्चात वाढ होते. पर्यायाने नफा कमी होतो. त्याच प्रमाणे शेततळ्यातील वातावरणावर आपल्याला फारसे नियंत्रण ठेवता येत नाही. माशांची वाढ नियमित होत आहे किंवा नाही, होणारे आजार यावरही व्यवस्थित लक्ष ठेवणे अशक्य होते.
पूर्व आशियातील इंडोनेशिया, जपान व चीन या देशांमध्ये आधुनिक बायोफ्लॉक पद्धतीचा वापर मत्स्यपालनासाठी अनेक वर्षापासून केला जात आहे. मत्स्यपालन हे फायदेशीर राहण्यास मदत झाली आहे. या पद्धतीत खाद्याचे नियोजन, रोगांचे नियंत्रण व उपचार करणे सोपे आहे. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये सुक्ष्मजीवांचा वापर करून उर्वरित अन्न, माशांची विष्ठा व अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रुपांतरण केले जाते. हे सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. खाद्यांचा खर्च पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होते. सूक्ष्मजीवांमुळे पोषक घटक व स्वस्त सूक्ष्म वातावरण तयार होऊन माशांना होणारी रोगराई व सामान्य आजार यांचे प्रमाण अत्यंत कमी राहते. माशांची वाढ उत्तम होते.

बायोफ्लॉक पद्धतीचा अवलंब 

 • छोटे व मोठे शेतकरी, व्यावसायिक किंवा  बेरोजगार तरूण मंडळी या तंत्राने मत्स्यपालन करू शकतात. 
 • हा व्यवसाय वैज्ञानिक पद्धतीने व चिकाटीने केल्यास स्वयंरोजगाराचे उत्तम साधन ठरू शकते. 
 • यासाठी एक ट्रैमपुलीन टँक (१० हजार लिटर क्षमता, ४m× १m) आवश्यक असतो.  एक टँकचा संपूर्ण खर्च साधारणपणे १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत येतो.
 • यासाठी फक्त १५× १५ फूट जागा लागत असल्याने अल्पभूधारक शेतकरीही ते करू शकतो. 

 

व्यवसायाची सुरुवात 

व्यवसाय सुरू करण्याआधी चांगल्या संस्थेतून किमान ७ ते १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. 

 • पहिले छोट्या सेटअपपासून (१ ते २ टँक)  सुरूवात करावी. नंतर आपल्या अनुभवानुसार व्यवसायात वाढ करत जावी. एकदम मोठे धाडस करण्याची आवश्यकता नाही. 
 • माशांच्या सामान्य प्रजाती विशेषतः बाजारामध्ये सहज, चांगल्या दरात विकल्या जाणाऱ्या प्रजाती बायोफ्लॉकमध्ये पाळाव्यात.
 • बायोफ्लॉक टँकचे सूक्ष्म वातावरण खासकरून विरघळलेला ऑक्सिजन (DO), अमोनिया, नायट्राईट, सामू ( आम्ल व अल्कली) यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
 •  १५ ते २० दिवसानंतर माशांची वाढ व्यवस्थित होत असल्याची किंवा मासे निरोगी असल्याची खात्री वजन घेऊन करावी.
 •  या पद्धतीत वारंवार पाणी बदलण्याची आवश्यकता नसते. कधी बदलण्याची वेळ आली तरी ५ टक्यांपेक्षा जास्त पाणी कधीही बदलू नये.  टँक मधील सूक्ष्म वातावरण एकदम बदलून जाते. तसेच फ्लॉक पण निघून जातो. परिणामी माशांची वाढ थांबते. त्यांची मरतूक वाढू शकते.
 • मासे सोडण्यापुर्वी ३० दिवस टँक व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे.
 •  फ्लॉक बरोबर बनला की नाही व त्याचा आकार काय आहे, याकडे सतत बरीक लक्ष ठेवावे.
 •  माशांच्या प्रजातीनुसार, त्यांची वाढ लक्षात घेऊनच तेवढेच मासे प्रत्येक टँकमध्ये सोडावेत. अन्यथा गर्दीमुळे माशांची वाढ खुंटते, ते मरतात.
 • माशांसाठी अतिरीक्त औषधांचा वापर करू नये. कारण त्यामुळे रोगकारक जीवाणूंसोबत चांगले जीवाणू तसेच फ्लॉकसुद्धा मरतात.

- डॉ.आलोक वानकर, ९८६०५८८१४९ ,  

-  डॉ. एम.एफ. सिद्दीकी, ०९९६०१४७१७१
(सहाय्यक प्राध्यापक,  पशू वैद्यकीय महाविद्यालय, परभणी.)

 

 

 

 


इतर कृषिपूरक
शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपनशेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू...
जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवातिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक...
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास...एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये...
थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित...
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच...लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा...
चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅशमहाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
कासदाहाकडे नको दुर्लक्ष... कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच...
जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१०...
नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो...क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार...
ओळख अळिंबी उत्पादनाची...अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
जनावरांना द्या संतुलित आहारगाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास...
अळिंबी उत्पादनात मोठी संधी अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
जनावरांतील गोचीड तापगोचीड ताप अनेक दिवस राहू शकतो. या आजारामुळे...
मुधोळ हाऊंड श्वानास राष्ट्रीय मान्यतामुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि...
मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरजजनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू...
सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रणसर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास...
लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणलाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत...