नवजात वासराची घ्यावयाची काळजी

आरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे पहिले २४ तास आणि नंतरचे उर्वरित जीवन अशा दोन भागात विभागले आहे. पहिले २४ तास खूप जोखमीचे असतात.
calf management
calf management

आरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले २४ तास आणि नंतरचे उर्वरित जीवन अशा दोन भागात विभागले आहे. पहिले २४ तास खूप जोखमीचे असतात, जर वासराची पहिल्या २४ तासामध्ये पुरेशी काळजी घेतली नाही, तर वासराला  आजार होण्याची शक्यता असते. अशी वासरे अशक्त होतात, जरी वासरांमध्ये आनुवंशिक गुणधर्म चांगले असले आणि चांगले  व्यवस्थापन असले तरी त्यांची वाढ खुंटते. वासरांना हगवण होते. 

नवजात वासरांचे संगोपन 

  • नवजात वासराच्या जन्मानंतरचा पहिला तास हा खूप महत्त्वाचा आहे.
  • वासराचे तोंड व नाक स्वच्छ करावे. त्यामुळे वासराची श्वसन क्रिया  व्यवस्थित चालू होईल. 
  • गाईला वासरास चाटू द्यावे. त्यामुळे  वासराच्या शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होईल त्यामुळे वासरू उठून उभे राहून चालू लागते.
  • वासराची नाळ बेंबीपासून दोन इंच अंतरावर कापून ती स्वच्छ दोऱ्याने बांधून घ्यावी, जेणेकरून नाळेचे तोंड बंद  होईल.नंतर टिंचर आयोडीन  द्रावणांमध्ये कमीत कमी ३० सेकंद बुडवावी. जर नाळेचे तोंड चुकून उघडे राहिले तर जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. 
  •  नवजात वासरास पहिल्या दोन तासात दोन लिटर चीक पाजावा आणि नंतर बारा तासात एक ते दोन लिटर चीक पाजावा.चिकाद्वारे वासरांना रोग प्रतिकारकशक्ती मिळते.
  • वासरांना पहिल्या एक दोन तासात पुरेशा प्रमाणात चीक पाजला नाही, तर अशी वासरे अशक्त बनतात, आजारी पडतात.
  • सुरुवातीला पुरेशा प्रमाणात वासरांना चीक मिळाला तर त्यांची तीन महिन्यापर्यंत रोग प्रतिकारशक्ती शरीरात तयार होते.
  •  वासरांना जंतनाशकाचा वापर 

  • पशूतज्ज्ञाच्या सल्यानुसार दहा ते चौदा दिवसात पहिले जंतनाशक द्यावे. नंतर प्रत्येक महिन्याला वयाच्या सहा महिन्यापर्यंत जंतनाशक द्यावे. 
  • वासरांमधील हगवण/अतिसार 

  • वासरांमधील अतिसाराची विविध करणे आहेत.यामुळे वासरांच्या शरीरातील पाणी तसेच सोडिअम पोटॅशिअम कमी होते.यामुळे वासरू दगावू  शकते.
  •  उपाय योजना 

  • हगवण/अतिसार असणाऱ्या वासरांना पशूतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार इलेक्ट्रोलाईट द्यावे.घरगुती इलेक्ट्रोलाईट बनवण्यासाठी एक लिटर कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये पाच चमचे ग्लुकोज,एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मीठ मिसळावे. हे द्रावण वासराला पाजावे.     
  • हगवण/अतिसाराचे कारण ओळखून पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत, वासरांना साखर पचत नाही, त्यामुळे आणखी हगवण अतिसार होऊ शकतो म्हणून वासरांना ग्लुकोज द्यावे.
  • वासरांना पुरेशा प्रमाणात चीक पाजावा.
  • गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. जागा कोरडी असावी.    
  • वासरू पाजण्याच्या आधी व पाजल्यानंतर गाईची कास स्वच्छ ठेवावी.
  •  -  डॉ. सी. व्ही.धांडोरे ः ९३७३५४८४९४ (विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com