Agriculture Agricultural News Marathi article regarding calf management. | Agrowon

नवजात वासराची घ्यावयाची काळजी

डॉ. सी. व्ही.धांडोरे
मंगळवार, 28 जुलै 2020

आरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले २४ तास आणि नंतरचे उर्वरित जीवन अशा दोन भागात विभागले आहे. पहिले २४ तास खूप जोखमीचे असतात.

आरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले २४ तास आणि नंतरचे उर्वरित जीवन अशा दोन भागात विभागले आहे. पहिले २४ तास खूप जोखमीचे असतात, जर वासराची पहिल्या २४ तासामध्ये पुरेशी काळजी घेतली नाही, तर वासराला  आजार होण्याची शक्यता असते. अशी वासरे अशक्त होतात, जरी वासरांमध्ये आनुवंशिक गुणधर्म चांगले असले आणि चांगले  व्यवस्थापन असले तरी त्यांची वाढ खुंटते. वासरांना हगवण होते. 

नवजात वासरांचे संगोपन 

 • नवजात वासराच्या जन्मानंतरचा पहिला तास हा खूप महत्त्वाचा आहे.
 • वासराचे तोंड व नाक स्वच्छ करावे. त्यामुळे वासराची श्वसन क्रिया  व्यवस्थित चालू होईल. 
 • गाईला वासरास चाटू द्यावे. त्यामुळे  वासराच्या शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होईल त्यामुळे वासरू उठून उभे राहून चालू लागते.
 • वासराची नाळ बेंबीपासून दोन इंच अंतरावर कापून ती स्वच्छ दोऱ्याने बांधून घ्यावी, जेणेकरून नाळेचे तोंड बंद  होईल.नंतर टिंचर आयोडीन  द्रावणांमध्ये कमीत कमी ३० सेकंद बुडवावी. जर नाळेचे तोंड चुकून उघडे राहिले तर जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. 
 •  नवजात वासरास पहिल्या दोन तासात दोन लिटर चीक पाजावा आणि नंतर बारा तासात एक ते दोन लिटर चीक पाजावा.चिकाद्वारे वासरांना रोग प्रतिकारकशक्ती मिळते.
 • वासरांना पहिल्या एक दोन तासात पुरेशा प्रमाणात चीक पाजला नाही, तर अशी वासरे अशक्त बनतात, आजारी पडतात.
 • सुरुवातीला पुरेशा प्रमाणात वासरांना चीक मिळाला तर त्यांची तीन महिन्यापर्यंत रोग प्रतिकारशक्ती शरीरात तयार होते.

 वासरांना जंतनाशकाचा वापर 

 • पशूतज्ज्ञाच्या सल्यानुसार दहा ते चौदा दिवसात पहिले जंतनाशक द्यावे. नंतर प्रत्येक महिन्याला वयाच्या सहा महिन्यापर्यंत जंतनाशक द्यावे. 

वासरांमधील हगवण/अतिसार 

 • वासरांमधील अतिसाराची विविध करणे आहेत.यामुळे वासरांच्या शरीरातील पाणी तसेच सोडिअम पोटॅशिअम कमी होते.यामुळे वासरू दगावू  शकते.

 उपाय योजना 

 • हगवण/अतिसार असणाऱ्या वासरांना पशूतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार इलेक्ट्रोलाईट द्यावे.घरगुती इलेक्ट्रोलाईट बनवण्यासाठी एक लिटर कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये पाच चमचे ग्लुकोज,एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मीठ मिसळावे. हे द्रावण वासराला पाजावे.     
 • हगवण/अतिसाराचे कारण ओळखून पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत, वासरांना साखर पचत नाही, त्यामुळे आणखी हगवण अतिसार होऊ शकतो म्हणून वासरांना ग्लुकोज द्यावे.
 • वासरांना पुरेशा प्रमाणात चीक पाजावा.
 • गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. जागा कोरडी असावी.    
 • वासरू पाजण्याच्या आधी व पाजल्यानंतर गाईची कास स्वच्छ ठेवावी.

 -  डॉ. सी. व्ही.धांडोरे ः ९३७३५४८४९४
(विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर)

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोलाजनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी,...
व्यवस्थापन गाभण शेळ्यांचेशेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...