Agriculture Agricultural News Marathi article regarding cashew cluster in Sindhudurg district | Agrowon

सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया उद्योगात वाढ

एकनाथ पवार
बुधवार, 1 जुलै 2020

डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे वाढलेले दर, प्रकिया उद्योगात झालेली वाढ आणि शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील काही गावांमध्ये काजू लागवड क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. 

डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे वाढलेले दर, प्रकिया उद्योगात झालेली वाढ आणि शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील काही गावांमध्ये काजू लागवड क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. या पिकामुळे गावांचे अर्थकारण बदलू लागले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. काही तालुक्यांना किनारपट्टी लाभली आहे, तर काही तालुक्यांत डोंगराळ क्षेत्र आहे. किनारपट्टी आणि लगतच्या तालुक्यांत आंबा, कोकम, नारळ, सुपारी आणि मसाला पिकांची लागवड आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातील तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा भात, नाचणी लागवडीवर भर आहे; परंतु मागील काही वर्षांत सह्याद्री पट्ट्यातील या गावांमध्ये काजू लागवडीला चालना मिळाली आहे.

वैभववाडी तालुका होतोय काजू क्लस्टर 
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, कोकिसरे, करूळ, कुभंवडे, नावळे, सांगुळवाडी, सडुरे, अरूळे, निमअरूळे, खांबाळे, कुर्ली या गावांचा परिसर डोंगर पट्ट्याचा आहे. भातशेती आणि नाचणी लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा भर होता. डोंगर पट्ट्यात काही शेतकऱ्यांनी गावठी काजूची झाडे जपली होती. गेल्या पंधरा वर्षांत जिल्ह्यात १०० टक्के अनुदानावर फलोद्यान योजना राबविण्यात आली. या योजनेमुळे वैभववाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी काजू, आंबा लागवड केली. २०००-२००१ नंतर काजूचे अधिक उत्पादन देणाऱ्या वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७  या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. या गावशिवारांत एक एकरपासून अगदी दहा, पधंरा, वीस एकर काजूच्या बागा उभ्या राहिल्या. कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी बागांचे चांगले व्यवस्थापन ठेवल्याने अपेक्षित उत्पादनही मिळू लागले. पडिक डोंगररांगामध्ये व्यावसायिक पद्धतीने काजू लागवडीने गती घेतली. याच कालावधीत काजू बीचे दरही वाढू लागले. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना मिळाला.

वैभववाडी तालुक्यातील अकरा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काजू लागवड वाढू लागल्याने रोपवाटिका, कृषी सेवा केंद्रांचा व्यवसायही सुरू झाला. यातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती झाली. लागवडीच्या बरोबरीने काजू बी उत्पादनात वाढ झाल्याने परिसरात प्रक्रिया उद्योग सुरू झाले. सध्या प्रत्येक गावात तीन ते चार प्रकिया उद्योग कार्यरत आहेत. या अकरा गावात काजू पिकामुळे सरासरी १० कोटींपर्यंत उलाढाल होते. वाढत्या काजू उत्पादनामुळे काजू बी खरेदी करणारा व्यापारी वर्गदेखील तयार झाला आहे. काजू पिकाने तालुक्यातील अर्थकारणाला वेगळी दिशा दिली आहे.

राज्यभर काजूला मागणी 
वैभववाडी पट्ट्यातील काजू उत्तम दर्जाचा असल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर याशिवाय राज्याच्या विविध भागांतून काजूगराला मोठी मागणी आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार प्रकिया उद्योगांनीदेखील उत्पादनात बदल केले. सुरुवातीला काजूगर, काजू पाकळी, काजू कणी अशा प्रकारे वर्गीकरण केले जात होते. परंतु आता लहान, मोठा, चटकदार मसाले काजू असे प्रकार उद्योजकांनी बाजारपेठेत आणले आहेत. हंगाम आणि मागणीनुसार काजू प्रकिया उद्योजक उत्पादनात बदल करतात. येथील काजू गराला सरासरी ८०० ते १००० रु. प्रतिकिलोस दर मिळतो. गणेशोत्सवकाळात काजू मोदकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते.

 


इतर अॅग्रो विशेष
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्केपरभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज...
‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन...नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी...
कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्धपुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा...
देशातून आत्तापर्यंत साखरेची ४८ लाख टन...कोल्हापूर: देशातून आत्तापर्यंत ४८ लाख ६९ हजार टन...
खत ‘आणीबाणी’ने शेतकरी त्रस्तपुणेः खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिके बहारात असून...
खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी...
धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची...पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवरपुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...