सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची प्रगती

जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या कोकणातील काजूगराला मोठी मागणी आहे. तरीदेखील सध्या जीआय मानांकन मिळालेल्या काजू बीच्या खात्रीशीर दरासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.
cashew nut
cashew nut

जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या कोकणातील काजूगराला मोठी मागणी आहे. तरीदेखील सध्या जीआय मानांकन मिळालेल्या काजू बीच्या खात्रीशीर दरासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. राज्याचा विचार करता सुमारे १.९१ लाख हेक्टरवर काजू लागवड आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये सर्वाधिक काजू लागवड आहे. राज्यात दरवर्षी सुमारे २.६९ लाख टन उत्पादन आहे. दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींच्या उलाढाल काजू पिकामध्ये होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाराशे ते पंधराशे कोटी आणि रत्नागिरी जिल्ह्यात २ कोटींच्या आसपास काजू बीची उलाढाल आहे. कोकणातील काजूला असणारी विशिष्ट चव आणि त्यातील घटकांमुळे जागतिक पातळीवर चांगली मागणी आहे. गेल्या काही वर्षांत वेंगुर्ला येथील फळसंशोधन केंद्राने चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची कलमे विकसित केल्यानंतर काजू लागवडीला गती मिळाली. तसेच १०० टक्के फलोद्यान योजना कोकणातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरली. दराची समस्या  कोकणातील काजूचा दर्जा चांगला असला तरी प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांत काजू बीचे दर झपाट्याने घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ला सात जातीच्या काजू बीला प्रति किलो विक्रमी दोनशे रुपये, तर वेंगुर्ला चार काजू बीला १६० ते १७० रुपये दर मिळाला होता. परंतु त्यानंतर गेली दोन वर्षे काजू बी दरामध्ये दरात घसरण होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजू बीचे दर प्रति किलो ७० रुपयांवर आले. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकिलो १४० रुपये असलेला दर १०५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आहे. एकीकडे दरामध्ये घसरण, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झाली आहे.  फळ बागायतदार संघाची मदत  काजू उत्पादकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकरी व फळ बागायतदार संघाने पुढाकार घेतला. सध्या ६५० काजू उत्पादक संघाचे सभासद आहेत. या संघाने सुरुवातीला सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील शेतकऱ्यांना संघटित केले. कोकणातील सर्वोत्तम काजूबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली.  मागील वर्षी कोरोना काळात काजू बी दरात मोठी घसरण झाली. दर प्रतिकिलो ७० रुपये असताना संघाने जिल्हा बँकेच्या सहकार्याने थेट कारखानदारामार्फत प्रतिकिलो १२० रुपये दराने काजू बी खरेदी केली. या वर्षी देखील दराची अडचण लक्षात घेत संघाने पुन्हा एकदा प्रति किलो १४० रुपये दराने काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याचा चांगला फायदा काजू उत्पादकांना होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी संघाने जोरदार आवाज उठविला. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला भाग पाडले. हत्ती, गवे, मगर, शिंगाडी, साळींदर, माकड, शेकरू इत्यादी व्हर्मिन प्राणी म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी संघाने केली आहे. प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने सौर कुंपण योजना प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

अपेक्षा 

  • कृषी विद्यापीठाने काजू बीला प्रतिकिलो उत्पादन खर्च १२२ रुपये गृहीत धरला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यास कमीत कमी १६० रुपये हमीभाव द्यावा.
  • शासनाकडून हमीभाव मिळेपर्यंत गोवा सरकारच्या धर्तीनुसार प्रति किलोस २५ रुपये अनुदान मिळावे.
  •  परदेशातून आयात होणाऱ्या काजू बी वर २० टक्के आयात शुल्क आकारावे.
  • सिंधुदुर्गातील काजूगरामध्ये परदेशी काजूगरांचे मिश्रण कारखानदार करणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
  • वाया जाणाऱ्या काजूबोंडापासून वाइननिर्मितीला मान्यता मिळावी.
  • काजू उत्पादक आणि कारखानदार यांच्यात थेट खरेदीसाठी प्रयत्न व्हावेत.
  • सेंद्रिय पद्धतीने काजू उत्पादनावर भर देण्यासाठी संशोधन करावे.
  • - विलास सावंत,९४२३३४४५६०

    अध्यक्ष, शेतकरी व फळ बागायतदार संघ, सावंतवाडी-दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com