Agriculture Agricultural News Marathi article regarding cashew nut shell oil production | Agrowon

सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मिती

हेमंत श्रीरामे
शनिवार, 4 एप्रिल 2020

सौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल काढता येते. पॅराबोलिक कुकर (एसके. १४) व ऑईल एक्सट्राक्टरचा वापर करून घरगुती स्तरावर काजू बी टरफल तेल (सीएनएसएल तेल) काढता येते. तेलाचा उपयोग विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकूड सामानाला लेप देण्यासाठी,  सायकल कोटिंग, प्रायमर इत्यादी तयार करण्यासाठी होतो. 

सौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल काढता येते. पॅराबोलिक कुकर (एसके. १४) व ऑईल एक्सट्राक्टरचा वापर करून घरगुती स्तरावर काजू बी टरफल तेल (सीएनएसएल तेल) काढता येते. तेलाचा उपयोग विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकूड सामानाला लेप देण्यासाठी,  सायकल कोटिंग, प्रायमर इत्यादी तयार करण्यासाठी होतो. 

 

काजूगर निर्मिती उद्योगातून मोठ्या प्रमाणात काजू बी टरफल उपलब्ध होतात. पारंपरिक पद्धतीने काजू बी टरफलापासून तेल काढण्यात येते. उदा. 
हॉट ऑईल बाथ, एस्पेलर, भट्टी पद्धत, इत्यादी.  काजू बी टरफल तेलाचा उपयोग रंग उद्योग, रेझीन (बुरशीनाशक, कीटकनाशक), रबर उद्योग व औषधी द्रव्यामध्ये होतो. 
काजू टरफल तेलात अॅनाकार्डिक अॅसिड व कार्डेनॉल असते. काजू तेलात असलेल्या युरिशिओल व कॅटेचोल या द्रवामुळे त्वचेला तेलाचा स्पर्श झाल्यास त्वचा जळते. त्यामुळे या तेलाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. 
पॅराबोलीक कुकरचा (एसके.१४) वापर अन्न शिजवण्यासाठी करता येऊ शकतो. या कुकरद्वारे साधारणतः पाच ते सात माणसांचा स्वयंपाक करता येतो. 

पॅराबोलीक सौर कुकरचा काजू टरफल तेल काढण्यासाठी उपयोग 

 • पारंपरिक पद्धतीमध्ये तेल काजू टरफलातून काढताना अॅनॉकॉर्डीक अॅसिडच्या वाफा निघत असतात. त्या मानवी आरोग्यास हानिकारक असतात. अशा किचकट पद्धतीऐवजी सौर ऊर्जेचा उपयोग करून तेल काढले गेले तर ते ऊर्जा तसेच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. 
 •   सौर पॅराबोलीक कुकरचा वापर घरच्याघरी काजू टरफलांपासून तेल काढण्यासाठी होऊ शकतो. या कुकरवर १ किलो काजू टरफले ठेवली असता २७० मिली तेल दोन तासात मिळते. 
 • दिवसातून पाच वेळा या कुकरचा वापर केला तर पाच किलो टरफलापासून १ किलो पर्यंत तेल मिळते. 
 • कुकरच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळात शिजविणे शक्य आहे, तसेच काजू टरफल तेल काढणे शक्य आहे. 

रचना, कार्य आणि काळजी 

 •  सूर्यकिरणे केंद्रित होतील त्या जागेवर भांडे ठेवण्याकरिता लोखंडी पट्ट्या वापरून तयार केलेली तबकडीची बैठक कशीही फिरवली तरी आतील अन्नपदार्थ सांडणार नाही, याकरिता ही व्यवस्था केलेली असते. 
 •  सौर कुकरच्या तबकड्यांच्या बाजूस एक उभा खिळा दिलेला असतो. सूर्यकिरणांच्या दिशेने तबकडीची दिशा केल्यास या खिळ्याची सावली पडत नाही. त्या वेळी उपलब्ध सर्व सूर्यकिरणांचा योग्य वापर होतो. 
 • कुकर वजनाने हलका असल्याने व छत्रीच्या आकाराची तबकडी असल्यामुळे वारा वेगाने वाहत असल्यास कलंडण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी. 
 •  परावर्तनाद्वारे सूर्यकिरणे प्रखर होत असल्याने त्यापासून डोळ्यांना इजा होऊ शकते. ते टाळण्याकरिता योग्य काळजी घ्यावी. गॉगलचा वापर करावा. 
 •  काम संपल्यानंतर तबकडी पालथी करून ठेवल्यास हा धोका टाळता येईल. तसेच परावर्तकाची चकाकी जास्त काळ टिकविता येईल. 
 •  तापमान जास्त असल्याने भाजण्याच्या जखमा होऊ शकतात. त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. हातमोजे वापरावेत. 

काजू टरफल तेलाचे उपयोग

 • काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या जाळ्यासारख्या पेशी असतात त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रव असतो, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात. 
 •  हा द्रव मिळविण्यासाठी ५ पद्धती आहेत. उदा. गरम तेलामध्ये उकळणे, एक्सपेलर, भट्टी पद्धत, द्रावकाद्वारे काढण्याची पद्धत आणि अति लघुलहरी पद्धत. 
 • काजू टरफल तेल ऊर्ध्वपातनानंतर तेलाचा उपयोग विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकूड सामानाला लेप देण्यासाठी, हवेवर सुकणारे वॉर्निश, सायकलचे कोटिंग, प्रायमर (रंगाच्या आधी) इत्यादी तयार  करण्यासाठी होतो. 
 •  तेलाच्या उपपदार्थाचा उपयोग यंत्राचे वंगण, विषाणूनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि औषधी द्रव्ये इत्यादींमध्ये करतात. 

 

 सौर पॅराबोलिक कुकर 

 • याचा उपयोग ५ ते ७ माणसांच्या कुटुंबाच्या कमीत कमी वेळेमध्ये कोणतीही अतिरिक्त ऊर्जा न वापरता स्वयंपाक करण्यासाठी होतो. हा सौर कुकर, पॅराबोला आकाराच्या तबकडीपासून बनविण्यात येतो. 
 •  सौर कुकरची निर्मिती करताना मुख्यतः एम. एस. रॉड, चकाकी दिलेला अॅल्युमिनियम पत्रा, लोखंडी पट्टी, स्क्रू इत्यादींचा वापर करण्यात येतो. 
 • पॅराबोलीक सोलर कुकर हा सुट्ट्या भागाच्या रूपात उपलब्ध असून त्याची जोडणी अत्यंत सोपी असते. हा सोलर कुकर घरगुती तसेच हॉस्टेल्स, धाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे. 
 • एकाच वेळेला ५ ते ७ माणसांचे अन्न ४० ते ४५ मिनिटात शिजविले जाते. त्यामुळे या कुकरच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळात बनविणे शक्य आहे. 
 •  वापरण्यास अत्यंत सोपा व कोठेही वाहून नेता येणारा असा हा बहुउपयोगी कुकर असून यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थसुद्धा करता येतात. 
 •  यामध्ये नेहमीच्या वापरातील प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजविता येते. या सौर कुकरची किंमत अंदाजे ९,५०० रूपये आहे. 

    वैशिष्ट्ये 

 • पॅरोबोलीक कुकर हा इंधन बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो. 
 • या कुकरद्वारे उच्च तापमान मिळू शकते. 
 • चांगल्या सूर्यप्रकाशात एक तासामध्ये अन्न शिजवता येते. 
 • हाताळण्यास आणि स्वच्छ करण्यास अगदी सोपा आहे. 
 •  कुकर टिकाऊ, सुरक्षित व कार्यक्षम आहे.
 •  कुकर दिवसातून ऊन असेपर्यंत कितीही वेळा वापरता येतो.  

 

-  हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५ 
 - मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५
(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...