जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्याचे तंत्र

जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यामध्ये जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. संतुलित आहार देऊन मिथेन वायूचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.
cattle feed management
cattle feed management

जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यामध्ये जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. संतुलित आहार देऊन मिथेन वायूचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.

जागतिक हवामानातील बदल ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील नियमित बदलामुळे जनावरांची उत्पादन क्षमता आणि राहणीमानावर परिणाम होतो, जे सभोवतालच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे उद्भवते. मिथेन वायू हा प्रामुख्याने सर्वात अधिक प्रभावशाली उत्सर्जनात भर पडणारा हरितगृहातील वायूंशी निगडीत आहे. मिथेन वायू जनावरांच्या आतड्यातील खाद्याच्या किण्वन प्रक्रियेमुळे तयार होतो. रवंथ करणाऱ्या जवळपास ४ ते १२ टक्के प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो. वातावरणास हानिकारक आणि जनावरांतील ऊर्जा स्रोत कमी करण्याचे एक कारण आहे. ज्याचा दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.   दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांचा हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये मुख्यतः मिथेन, नायट्रस ऑक्साइड आणि कार्बन डाय ऑक्साइडचा समावेश आहे. यामध्ये सर्वात अधिक ५० टक्के प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो.मिथेन वायू उत्सर्जन कमी केल्यास त्याची दूध उत्पादन वाढीस मदत होते.

रवंथ करणाऱ्या जनावरातील मिथेन वायूचे उत्पादन 

  •  रवंथ करणाऱ्या करणाऱ्या जनावरांमध्ये एक विशिष्ट पचन संस्था असते. त्यामध्ये चार कप्यांचे पोट असून रुमेन, रेटीकुलम, ओमेझम व अबोमेझमचा समावेश होतो. यामध्ये कोठीपोट (रुमेन) हा सर्वांत मोठा कप्पा असून तो ८० टक्के पर्यंत व्यापलेला असतो.
  • जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यात जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन करण्याची क्षमता घटते.
  • आपल्याकडे अजुनही गाई,म्हशींची गरज लक्षात घेऊन संतुलित खाद्य दिले जात नाही. त्यामुळे साधारणतः ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वांच्या तुलनेत ते असंतुलित असते. असंतुलित आहार जेवढा जास्त प्रमाणात दिला जातो,त्या प्रमाणात मिथेन वायू निर्माण होतो. 
  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाद्वारे करण्यात आलेल्या क्षेत्रीय चाचण्यांद्वारे असा निष्कर्ष मांडण्यात आला की, आहार संतुलनामुळे दुधाळ जनावरांच्यामध्ये दूध उत्पादन क्षमता, सूक्ष्मजीव प्रथिने यांचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. तसेच मिथेन वायू उत्सर्जन प्रती किलो दूध उत्पादनामागे कमी करता येऊ शकते.
  • इनाफ (INAPH) सॉफ्टवेअर 

  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळातील तज्ज्ञांनी जनावरांच्यापासून मिथेन वायू उत्सर्जनात वाढ कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली तयार केली आहे. याचा वापर विविध कृषी  हवामान क्षेत्रात सुरु केला आहे. 
  • या प्रणालीमध्ये त्या संबधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी तेथील गावांमधील उपलब्ध स्थानिक प्रशिक्षित कुशल व्यक्तीकडून आपल्या जनावराच्या आहाराचे संतुलन जवळ स्थानीय उपलब्ध असलेल्या पशुखाद्यापासून करायचे आहे. यासाठी इनाफ (INAPH) हे  सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.  
  • जनावरांच्या आहाराचे संतुलन केल्यामुळे आतड्यातील किण्वन प्रक्रियेत बदल होतो. त्यामुळे अल्प स्वरूपात असिटेट, बुटायरेट आम्ल आणि अधिक प्रमाणात प्रोपिओनेट आम्ल तयार होते. 
  • मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी संतुलित आहार 

    आजही आपण जनावरांना पारंपरिक पद्धतीने आहार, वैरण देतो.  त्यामुळे साधारणतः ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वांच्या तुलनेत ते असंतुलित असते.

  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या शेणापासून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूपासून जैविक इंधन बनवता येऊ शकते. 
  •  संतुलित आहारामुळे एकूण दूध उत्पादन वाढते. प्रती लिटर मागे उत्पादन खर्च कमी होतो.
  • संतुलित आहार दिल्यामुळे जनावरांच्या दुधातील फॅट आणि एस एन एफ वाढते. त्यामुळे दैनंदिन नफ्यात भर पडते. 
  • आहार संतुलनामुळे जनावरांतील चयापचयाचे विकार (दुग्ध ज्वर, किटोसिस इत्यादी.)  कमी करता येतात. आहार संतुलनामुळे दोन वेतांतील अंतर कमी करता येऊ शकते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. 
  • आहार संतुलानामुळे स्थानीय उपलब्ध असलेल्या चारा स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करता येऊ शकतो. आणि त्यामुळे जनावरांना पोषक तत्त्वांची कमी भासणार नाही.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये ऊर्जा आणि प्रथिने यांचा पुरेपूर वापर होतो. त्यामुळे उत्पादन कार्यक्षमता वाढते.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये सूक्ष्मजीव प्रथिनांच्या उत्पादनात उत्तम सुधारणा होते. दुधाळ जनावरांची उत्पादन क्षमता वाढवता येऊ शकते.
  • आहार संतुलित करून दुधाळ जनावरांपासून हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
  • - डॉ. विलास टाकळे, ७४९८५८३१५३ (वरिष्ठ संशोधन अधिकारी,  गोठीत रेत प्रयोगशाळा, बाएफ, उरूळीकांचन, पुणे ) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com