Agriculture Agricultural News Marathi article regarding cattle feed management. | Agrowon

जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्याचे तंत्र

डॉ. विलास टाकळे, डॉ. शिवाजी सोनटक्के
बुधवार, 3 जून 2020

जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यामध्ये जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. संतुलित आहार देऊन मिथेन वायूचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.

जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यामध्ये जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. संतुलित आहार देऊन मिथेन वायूचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.

 

जागतिक हवामानातील बदल ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील नियमित बदलामुळे जनावरांची उत्पादन क्षमता आणि राहणीमानावर परिणाम होतो, जे सभोवतालच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे उद्भवते. मिथेन वायू हा प्रामुख्याने सर्वात अधिक प्रभावशाली उत्सर्जनात भर पडणारा हरितगृहातील वायूंशी निगडीत आहे. मिथेन वायू जनावरांच्या आतड्यातील खाद्याच्या किण्वन प्रक्रियेमुळे तयार होतो. रवंथ करणाऱ्या जवळपास ४ ते १२ टक्के प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो. वातावरणास हानिकारक आणि जनावरांतील ऊर्जा स्रोत कमी करण्याचे एक कारण आहे. ज्याचा दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.
  दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांचा हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये मुख्यतः मिथेन, नायट्रस ऑक्साइड आणि कार्बन डाय ऑक्साइडचा समावेश आहे. यामध्ये सर्वात अधिक ५० टक्के प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित होतो.मिथेन वायू उत्सर्जन कमी केल्यास त्याची दूध उत्पादन वाढीस मदत होते.

रवंथ करणाऱ्या जनावरातील मिथेन वायूचे उत्पादन 

 •  रवंथ करणाऱ्या करणाऱ्या जनावरांमध्ये एक विशिष्ट पचन संस्था असते. त्यामध्ये चार कप्यांचे पोट असून रुमेन, रेटीकुलम, ओमेझम व अबोमेझमचा समावेश होतो. यामध्ये कोठीपोट (रुमेन) हा सर्वांत मोठा कप्पा असून तो ८० टक्के पर्यंत व्यापलेला असतो.
 • जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू, बुरशीजन्य पेशी, प्रोटोझुआ, रासायनिक प्रक्रिया आणि किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होतो. ज्यात जनावरांतील ऊर्जेचा अधिक वापर होतो. त्यामुळे गाई,म्हशींची दूध उत्पादन करण्याची क्षमता घटते.
 • आपल्याकडे अजुनही गाई,म्हशींची गरज लक्षात घेऊन संतुलित खाद्य दिले जात नाही. त्यामुळे साधारणतः ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वांच्या तुलनेत ते असंतुलित असते. असंतुलित आहार जेवढा जास्त प्रमाणात दिला जातो,त्या प्रमाणात मिथेन वायू निर्माण होतो. 
 • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाद्वारे करण्यात आलेल्या क्षेत्रीय चाचण्यांद्वारे असा निष्कर्ष मांडण्यात आला की, आहार संतुलनामुळे दुधाळ जनावरांच्यामध्ये दूध उत्पादन क्षमता, सूक्ष्मजीव प्रथिने यांचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. तसेच मिथेन वायू उत्सर्जन प्रती किलो दूध उत्पादनामागे कमी करता येऊ शकते.

इनाफ (INAPH) सॉफ्टवेअर 

 • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळातील तज्ज्ञांनी जनावरांच्यापासून मिथेन वायू उत्सर्जनात वाढ कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली तयार केली आहे. याचा वापर विविध कृषी  हवामान क्षेत्रात सुरु केला आहे. 
 • या प्रणालीमध्ये त्या संबधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी तेथील गावांमधील उपलब्ध स्थानिक प्रशिक्षित कुशल व्यक्तीकडून आपल्या जनावराच्या आहाराचे संतुलन जवळ स्थानीय उपलब्ध असलेल्या पशुखाद्यापासून करायचे आहे. यासाठी इनाफ (INAPH) हे  सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.  
 • जनावरांच्या आहाराचे संतुलन केल्यामुळे आतड्यातील किण्वन प्रक्रियेत बदल होतो. त्यामुळे अल्प स्वरूपात असिटेट, बुटायरेट आम्ल आणि अधिक प्रमाणात प्रोपिओनेट आम्ल तयार होते. 

 

मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी संतुलित आहार 

आजही आपण जनावरांना पारंपरिक पद्धतीने आहार, वैरण देतो.  त्यामुळे साधारणतः ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वांच्या तुलनेत ते असंतुलित असते.

 • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या शेणापासून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूपासून जैविक इंधन बनवता येऊ शकते. 
 •  संतुलित आहारामुळे एकूण दूध उत्पादन वाढते. प्रती लिटर मागे उत्पादन खर्च कमी होतो.
 • संतुलित आहार दिल्यामुळे जनावरांच्या दुधातील फॅट आणि एस एन एफ वाढते. त्यामुळे दैनंदिन नफ्यात भर पडते. 
 • आहार संतुलनामुळे जनावरांतील चयापचयाचे विकार (दुग्ध ज्वर, किटोसिस इत्यादी.)  कमी करता येतात. आहार संतुलनामुळे दोन वेतांतील अंतर कमी करता येऊ शकते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. 
 • आहार संतुलानामुळे स्थानीय उपलब्ध असलेल्या चारा स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करता येऊ शकतो. आणि त्यामुळे जनावरांना पोषक तत्त्वांची कमी भासणार नाही.
 • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये ऊर्जा आणि प्रथिने यांचा पुरेपूर वापर होतो. त्यामुळे उत्पादन कार्यक्षमता वाढते.
 • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये सूक्ष्मजीव प्रथिनांच्या उत्पादनात उत्तम सुधारणा होते. दुधाळ जनावरांची उत्पादन क्षमता वाढवता येऊ शकते.
 • आहार संतुलित करून दुधाळ जनावरांपासून हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

- डॉ. विलास टाकळे, ७४९८५८३१५३
(वरिष्ठ संशोधन अधिकारी,  गोठीत रेत प्रयोगशाळा, बाएफ, उरूळीकांचन, पुणे ) 


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...