Agriculture Agricultural News Marathi article regarding cattle feed production. | Agrowon

दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्र

डॉ. पराग घोगळे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक, शारीरिक वाढ, गाभण काळ व दूध उत्पादन इत्यादींसाठी विविध पोषणतत्त्वांची आवश्यकता असते. यासाठी पशुखाद्य उत्पादन करीत असताना त्याची गुणवत्ता एकसारखी असणे आवश्यक आहे.

जनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक, शारीरिक वाढ, गाभण काळ व दूध उत्पादन इत्यादींसाठी विविध पोषणतत्त्वांची आवश्यकता असते. यासाठी पशुखाद्य उत्पादन करीत असताना त्याची गुणवत्ता एकसारखी असणे आवश्यक आहे.

तयार पशुखाद्य निर्मिती म्हणजे धान्य किंवा कृषि उप पदार्थांवर प्रक्रिया करून जनावरांना खाण्यायोग्य खाद्य बनविणे. पशुखाद्य हे जनावरांची शारीरिक गरज पूर्ण करते. असे पशुखाद्य हे प्रक्रिया केलेला किंवा न केलेला कच्चा माल शास्त्रीयदृष्ट्या एकत्र करून बनविले जाते. त्याची बाजारात व्यावसायिक विक्री केली जाते. असे तयार पशुखाद्य गाई, म्हशी, वासरे, पक्षी, वराह, मासे, शेळी, मेंढी इत्यादी उद्योगक्षेत्रांसाठी बनविले जाते. 

    पारंपारिक खाद्याकडून दूध उत्पादकांना तयार संतुलित पशू खाद्याकडे वळविण्यास मोठा वाव आहे. पशुखाद्यातील प्रथिने व फॅट या बरोबरच त्यातील ऊर्जा आणि एकूण पचनीय पोषक तत्त्वे (टी.डी.एन) यावर भर देऊन  किफायतशीर दरांमध्ये पशुखाद्य उपलब्ध करता येते.चांगल्या प्रतीच्या उत्तम गुणवत्ता असणाऱ्या व योग्य फॉर्मुला वापरून एकत्र एकजीव केलेल्या संतुलित पशुखाद्याला जनावरेही तितक्याच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तयार पशुखाद्यात आद्रता, पोषणतत्त्वांची उपलब्धता, गोळीचा पोत जनावरांना एकसमान उपलब्ध होतात. पशुखाद्यातील गुणवत्तेवरच जनावरांच्या उत्पादनाची कामगिरी अवलंबून असते. जनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक, शारीरिक वाढ, गाभण काळ व दूध उत्पादन इत्यादींसाठी विविध पोषणतत्त्वांची आवश्यकता असते. यासाठी पशुखाद्य उत्पादन करीत असताना त्याची गुणवत्ता एकसारखी असणे आणि त्यापासून वातावरणाचे कमीत कमी नुकसान व्हावे याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पशुखाद्यासाठी कच्चा माल 

 • पशुखाद्य उत्पादनासाठी विविध प्रकारचा कच्चा माल जसे जास्त व बायपास प्रथिने असलेले घटक उदा. रेप सीड डी ओ सी, मेझ ग्लुटेन, सोयाबीन डी ओ सी, कपास डी ओ सी, शेंगदाणा डी ओ सी, खोबरे पेंड, पाम केक, राईस ब्रान.
 •  ऊर्जेचा स्रोत असलेले मका, गहू, गहु भुसा, ज्वारी, बाजरी बायपास फॅट, राईस पॉलिश, मोलॅसिस याबरोबरच सभोवताली उपलब्ध होणारा कच्चा माल.
 •  हंगामी पिकांपासून उपलब्ध होणारे घटकांचा वापर आपण पशुखाद्यामध्ये त्यातील पोषक तत्त्वे व आवडीने/चवीने जनावरांनी ते खाण्याचे प्रमाण या निकषांवर करू शकतो. 

पशूखाद्याचे गुणवत्ता नियंत्रण 
कच्च्या मालाची गुणवत्ता 
कच्या मालामध्ये भेसळ होणे, एकसारख्या गुणवत्तेचा माल न मिळणे अशा  अडचणी येत असल्याने पशुखाद्य कारखान्याचे गुणवत्ता नियंत्रण पथक कच्या मालाची सर्व प्रकारे तपासणी करून, असा माल पशुखाद्य बनविण्यास योग्य असेल तरच त्याचा वापर करणे अपेक्षित असते. 

प्रयोग शाळेबाहेरील तपासणी  
पशू खाद्यातील विविध कच्या मालाची तपासणी करताना प्रथम त्याचा रंग, आकार, एकजिनसीपणा, वास, चव, स्पर्श तसेच धान्याच्या बाबतीत आवाज इत्यादी प्रकारची चाचणी केली जाते. 

प्रयोगशाळेतील तपासणी
कच्या मालातील आद्रता, प्रथिने, फॅट/ऑईल, फायबर, सिलिका, टी. डी. एन. एकूण पचनीय पोषक तत्त्वे, ऊर्जा  याची तपासणी केली जाते. 

कच्या मालाचे गोदाम 
विविध प्रकारचा कच्चा माल हा भारतातून तसेच भारता बाहेरून आयातकरून गोदामामध्ये साठवून ठेवला जातो. कच्चा माल साठवून ठेवणे आवश्यक असते. कच्चामालामध्ये पोरकिडे, उंदीर, पक्षी इत्यादींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना आवश्यक आहे. वजनामध्ये आलेली घट व आगीपासून सुरक्षितता याची काळजी घेणे गरजेचे असते. याबरोबरच कच्च्या मालातील होणारी विविध प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी तसेच कच्चा व तयार माल प्रयोगशाळेत पृथक्करण करणे आवश्यक असते. त्याचा योग्य तो अर्थ लावण्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते. कच्चा माल व पशुखाद्याचे नमुने व पृथक्करण अहवाल जपून ठेवणे आवश्यक असते जेणेकरून दिलेल्या  फॉर्म्युलाप्रमाणे तयार माल बनला याची खात्री करता येते. 

पशुखाद्य फॉर्म्युलेशन

 • प्रथम  जनावरांच्या गरजेनुसार जसे की दुभत्या गाई, म्हशी, वासरे, गाभण जनावरे, बैल यांच्यासाठी तज्ज्ञांकडून फॉर्म्युला निश्चित केला जातो. ज्यामध्ये सर्व पोषणतत्त्वे योग्य प्रमाणात उपलब्ध केली जातात. 
 •  विविध कच्या मालातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांचे एकत्रीकरण केले जाते. सर्व प्रकारची अमिनो आम्ले, स्निग्ध आम्ले, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्वे, ऊर्जा यांची उपलब्धता जनावरांच्या गरजेनुसार असून ते खाण्यायोग्य आहे याची काळजी घ्यावी लागते. कारण काही कच्या मालात गुणवत्ता भरपूर असते परंतु जनावरे ते कमी प्रमाणात खातात. तर काही कच्या मालात तंतूचे प्रमाण जास्त असल्यामुळे गोळी नीट न बनता तिचा लवकर भुगा होतो. 
 •  जनावरांचे  सध्याचे सुरु असलेले खाद्य, दुधाचे प्रमाण, सोबत असलेल्या चाऱ्याचे प्रमाण आणि प्रकार यांची माहिती घेतल्यास चांगला फॉर्म्युला बनविता येतो. नाहीतर विविध  कारणांमुळे बाजारातून तक्रार येण्याची शक्यता असते.

बॅच बनविणे 

 • अत्याधुनिक  स्वयंचलित यंत्रणेमध्ये बॅचींग हे संगणकाच्या साहाय्याने केले जाते. ज्यामध्ये सायलो मधील कच्चा माल लोड सेन्सरच्या माध्यमातून अचूकपणे वजन केला जातो. 
 •  सेमी ऑटो प्लान्टमध्ये वजन काट्याच्या साहाय्याने कच्च्या मालाच्या बॅग वजन करून सुमारे एक हजार किलोची एक बॅच बनवली जाते. त्यानंतर सर्व कच्चा माल इनटेक मध्ये सोडला जातो.

ग्राईन्डींग 

 • कच्चा  माल स्क्रू कन्व्हेयर मधून हॅमर मिलमध्ये दळण्यासाठी नेला जातो. तिथे त्याचे विशिष्ट जाळीद्वारे २ ते ३ एम एम आकारामधे बारीक तुकडे केले जातात. कच्च्या मालाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे ते कोठीपोटातील जीवाणूद्वारे पचायला मदत होते. 
 • ग्राईन्डींग विभागात हॉपर, हॅमर मिल, स्क्रू कन्व्हेयर, एलेव्हेटर आणि डस्ट कलेक्टर अशी यंत्र सामग्री असते. 
 • हॅमर मिल मध्ये बारीक  दळलेला कच्चा माल हॉपर मध्ये साठवला जातो.

बॅच मिक्सर 

 •  दळलेला कच्चा माल बॅच मिक्सर मध्ये आल्यानंतर तिथे तो ५ ते ८ मिनिटे  एकजीव केला जातो. 
 •  कच्या मालाच्या  मिश्रणावर तयार पेलेट्सची गुणवत्ता अवलंबून असते. यासाठीचा भिन्नता गुणांक ५ पेक्षा कमी असणे फार महत्त्वाचे असते. 
 •  खाद्यात कमी प्रमाणात लागणारी खनिजे, जीवनसत्वे, बफर व इतर पशुखाद्य पुरके बॅच मिक्सर मध्ये खास इनलेट मधून सोडली जातात.

मोलॅसीस मिक्सर 

 • मोलॅसीस मिक्सरमध्ये बॅच मिक्सरमधून आलेल्या मालामध्ये ५ ते १० टक्के मळी फॉर्म्युल्यानुसार कालवली जाते. मळी हा पशुखाद्यातील एक किफायतशीर उर्जास्त्रोत आहे.
 •  मळी ही स्टोरेज टाकी मध्ये बराच काळ राहू शकते. गुणवत्ता ही त्याची घनता व त्यातील साखरेचे प्रमाण यावर ठरते. मळीचा वापर पशुखाद्यातील ऊर्जा वाढविणे, खाद्याची स्वादिष्टता वाढविणे व बाईंडर म्हणून केला जातो. 

कंडीशनिंग

 •  पशुखाद्यातील सर्व कच्चा माल वाफेच्या साहाय्याने अर्धवट शिजवला जातो. बॉयलरमधील वाफेद्वारे मोलॅसीस मिक्सर मधून आलेला माल व्यवस्थितरीत्या एक किंवा दोन वेळेस कंडीशनिंग केला जातो. यावेळी वाफेचे तापमान ८० ते ९० अंश सेल्सिअस इतके असते. यामध्ये कच्या मालाचा एक प्रकारचा लगदा तयार होतो. 
 •  हा  लगदा थोडक्यात मळलेल्या पिठाप्रमाणे पॅलेट्स बनविण्यासाठी तयार केला जातो. कंडीशनिंग जेवढे चांगले तेवढे पशुखाद्य चांगले बनते.

 पॅलेटिंग 

 •  पॅलेट मिल  पशुखाद्यासाठीच्या कच्च्या मालाने पुरेपूर भरल्यानंतर प्रेस रोलर व डायच्या माध्यमातून गोळी खाद्य तयार होते. 
 •   डायचा आकार ३ ते ४ एम एम आकाराची गोळी बनविण्यास योग्य बनविला जातो. डाय मधून कच्चा माल जाताना तो जळू नये याचीही काळजी घेतली जाते.  एकदा गोळी डायच्या बाहेर पडली की भोवताली फिरणारा पॅलेट कटरने योग्य आकारात तुकडे करता येतात. अशा प्रकारे तयार झालेली खाद्य गोळी पॅलेट कुलर मध्ये पाठवली जाते.

पॅलेट कुलिंग
      गरम वाफ आणि घर्षणामुळे तयार पशुखाद्य किंवा खाद्य गोळी गरम झालेली असते. अशी गरम खाद्य गोळी बॅगेत भरल्यास त्याचे नंतर एकत्र गठ्ठे तयार होऊ शकतात. म्हणून पॅलेट कुलर मध्ये गरम खाद्य गोळी थंड केली जाते आणि ती गायरो सीव्ह मध्ये येते. तिथे पूर्ण आकाराची पेलेट एलेव्हेटर द्वारे स्टोरेज बीनमध्ये साठवली जाते. उरलेली पावडर सक्शन ब्लोअरद्वारे पुन्हा पॅलेट मिल मध्ये गोळी खाद्य बनविण्यासाठी पाठवली जाते. स्टोरेज बीन मध्ये पेलेट मधील आद्रतेची चाचणी घेण्यात येते. 

बॅगिंग
      तयार गोळी खाद्याचे अचूक वजन करून प्लॅस्टिक किंवा बारदान गोणीमध्ये भरून शिलाई करून  गोदामामध्ये पाठवली जाते.

  - डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ 
(लेखक पशूपोषण व व्यवस्थापन सल्लागार आहेत )

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...