Agriculture Agricultural News Marathi article regarding changing crop pattern in Kolhapur district. | Agrowon

सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित शेतीकडे कल

राजकुमार चौगुले
बुधवार, 1 जुलै 2020

कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर येते; पण गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात केळी, भाजीपाला आणि हंगामी पिकांच्या लागवडीतून बदलाचे वारे वाहू लागले आहे.

कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर येते; पण गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात केळी, भाजीपाला आणि हंगामी पिकांच्या लागवडीतून बदलाचे वारे वाहू लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस लागवडीच्या प्रमाणाचा विचार केल्यास पीक बदलाचे प्रयोग छोट्या प्रमाणात असले, तरी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणारे आहेत. भाजीपाला, केळीपासून ते उन्हाळी नाचणी उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. पीक बदलाच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. काही वर्षांपूर्वी भाजीपाला उत्पादन हे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येच मर्यादित होते. या भागातील शिरोळ, हातकणंगले हे तालुके भाजीपाल्याचे आगर म्हणून पुढे आले. परंतु आता जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही भाजीपाला लागवड वाढली आहे. थोड्या प्रमाणात का होईना, वाढणारा भाजीपाला शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देत आहे. गडहिंग्लज, आजरा तालुक्‍यातील बरेचसे क्षेत्र भाजीपाला लागवडीखाली येत आहे. पारंपरिक भात किंवा ऊस शेती सोडून हे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. अगदी पाच ते दहा गुंठे क्षेत्र असले तरी भाजीपाला लागवडीतून चांगला नफा मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. 

सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट 
झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गटाने जवळपासच्या गावांतील शेतकऱ्यांना एकत्र केले. भात लागवडीची तसेच पडीक जमीन भाजीपाला लागवडीखाली आणली. गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीतून प्रगतीचा मार्ग दाखविला. केवळ उत्पादनावर न थांबता जवळपासच्या शहरात भाजीपाला विक्रीची शाश्‍वत सोय करून दिली. हे प्रयोग शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणारे ठरले. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन भाजीपाल्याची विक्री केली. चिकोत्रा भाजीपाला गटामध्ये सुमारे ५० शेतकरी सहभागी आहेत. दर महिन्याला १५० टन भाजीपाल्याची विक्री होते. गटाची दर महिन्याची उलाढाल १० लाखांवर पोहोचली आहे.गडहिंग्लज परिसरात युवा शेतकऱ्यांचा समावेश असणाऱ्या अभिनव फार्मिंगसारख्या संस्था सेंद्रिय भाजीपाल्यासाठी पुढे आल्या आहेत. उत्पादन तंत्र आणि बाजारपेठेतील संधीचा सुवर्णमध्य साधत शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनाचे धडे दिले जातात. थेट विक्रीसारख्या संकल्पना राबवून संस्थेने शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. 

उन्हाळी नाचणीचा प्रयोग 
पन्हाळ्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी नाचणीचे पीक यशस्वी केले, त्यामुळे नवा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला. याच भागातील मिलिंद पाटील यांच्यासारखे शेतकरी केळी पावडर तयार करून नवी बाजारपेठ तयार करत आहेत. 

युरोपमध्ये भेंडी निर्यात 
हातकणंगले तालुक्‍यातील अन्नदाता शेतकरी मंडळाने युरोपला भेंडी निर्यात करून शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ दाखवली. मंडळात ३० शेतकरी सहभागी आहेत. वर्षाला ३५ टनांपर्यंत भेंडीची निर्यात केली जाते. उसाच्या पट्ट्यामध्ये बदल म्हणून शेतकऱ्यांनी जिल्ह्यात फारशा चर्चेत नसलेल्या भेंडी पिकाला पसंती दिली आहे. 

तयार होतोय केळी क्‍लस्टर
जिल्ह्यात सरासरी तीनशे हेक्टर केळीचे क्षेत्र आहे. हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ, कागल, गडहिंग्लज नवीन क्लस्टर तयार होत आहे. जिल्ह्यात सुमारे १०० रायपनिंग चेंबर आहेत. हातकणंगले तालुक्‍यातील काही शेतकरी उद्योजक केळी क्‍लस्टर करण्याच्या प्रयत्नात आहेत. सातत्याने ऊस उत्पादन घेणारे शेतकरी केळीकडे वळू लागले आहेत. 
 

 


इतर यशोगाथा
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...