Agriculture Agricultural News Marathi article regarding changing cropping pattern in Ratnagiri District. | Agrowon

मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधन

राजेश कळंबटे
बुधवार, 1 जुलै 2020

रत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड वाढली आहे. याचबरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी भातशेतीनंतर भाजीपाला लागवड हे उत्पन्नाचे नवे साधन तयार झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड वाढली आहे. याचबरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी भातशेतीनंतर भाजीपाला लागवड हे उत्पन्नाचे नवे साधन तयार झाले आहे.

कोकण म्हटलं, की आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकमसह भातशेतीचे चित्र समोर येते. मात्र गेल्या दहा वर्षांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुहागर, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीच्या बागेत मसाला पिकांच्या लागवडीला चालना दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भातासह फळपिकांच्या लागवडीखाली सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये पेरणीचे क्षेत्र सुमारे ९३ हजार हेक्टर आणि फळपिकांखालील क्षेत्र सुमारे १ लाख ५२ हजार हेक्टर आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. तसेच, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतही फळबाग लागवडीला गती मिळाली. आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवडीच्या बरोबरीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीमध्ये जायफळ, काळी मिरी, लवंग, दालचिनी, लागवडीला प्राधान्य दिले. जिल्ह्यात सुमारे १०० हेक्टरवर मसाले पिकांची लागवड झाली आहे. प्रामुख्याने गुहागर, चिपळूण, दापोली तालुक्यांमध्ये मसाला पिकांची लागवड वाढत आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि रत्नागिरीतील नारळ संशोधन केंद्राने शेतकरी गट आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मसाले पिकांचे महत्त्व, लागवड तंत्र आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याची सखोल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीच्या बागांमध्ये विविध मसाला पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले. यामध्ये सर्वाधिक लागवड काळी मिरीची आहे. त्याचबरोबर जायफळ, लवंग, दालचिनी लागवड क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मिरी पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. मसाला पिकांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

बचत गटातून भाजीपाला लागवडीला चालना 
कोकणात भातशेती झाल्यानंतर वायंगणी शेतीपद्धत रुजली आहे. भातशेतीनंतर उपलब्ध पाण्यावर शेतकरी पंचक्रोशीतील बाजारपेठेचा अंदाज घेत पालेभाज्या, फळभाज्यांच्या लागवडीकडे वळले. भाजीपाला लागवड ही दिवाळीनंतर सुरू होते. सर्वसाधारणपणे जानेवारीपासून पुढे भाजीपाला लागवडीतून उत्पन्न सुरू होते. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, पावस परिसरातील गावे भाजीपाल्यासाठी ओळखली जाऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी कार्यरत असणाऱ्या दहा हजार महिला बचत गटांनी भाजीपाला लागव़ड, प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालनातून  सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. याचबरोबरीने पर्यटकांच्या ओघामुळे कलिंगडाखालील क्षेत्रही वाढत आहे. चिपळूण, रत्नागिरी तालुक्यात शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून हळद लागवडीला चालना मिळाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...