स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्ता

दुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन जनावरांच्या व्यवस्थापनासोबतच स्वच्छ दूध उत्पादनाकडे लक्ष द्यावे.
milking machine
milking machine

दुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन जनावरांच्या व्यवस्थापनासोबतच स्वच्छ दूध उत्पादनाकडे लक्ष द्यावे.

दुधात दूषित रोगाचे जंतू झपाट्याने वाढतात. अस्वच्छ गाई, म्हशींची कास, अस्वच्छ दुधाची भांडी, दूध काढण्याचे दूषित यंत्र, जनावरास झालेले रोग, गोचीड आणि बाह्यपरजीवींच्या प्रादुर्भावामुळे दूध काढतानाच त्यामध्ये रोगकारक जंतू प्रवेश करतात. 

स्वच्छ दूध उत्पादनासाठी बाबी जनावरांचा आहार 

  • जनावरांना उच्च प्रतीचा हिरवा चारा खाऊ घालावा.   
  •  चाऱ्यामध्ये हानिकारक तण जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • दूध काढण्याच्या एक तासापूर्वी किंवा नंतर जनावरांना मुरघास खायला द्यावा.
  • पाणी 
  •  दुग्धशाळेच्या स्वच्छतेसाठी शुद्ध व पुरेसे पाणी आवश्यक आहे. 
  • जनावरांच्या खाद्याची भांडी साफ करण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
  • दूध काढण्याच्या पद्धती 

  •  दूध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात, त्यात चिमटा पद्धत, पूर्ण हात पद्धत, नकलिंग म्हणजेच अंगठा पद्धत. यात पूर्ण हात पद्धत ही चांगली मानली जाते. या पद्धतीमध्ये संपूर्ण कासेवर समान दब पडतो आणि जनावराला त्रास होण्याऐवजी दूध काढण्यास आरामदायक वाटते. ही पद्धत सर्वात जास्त योग्य व सुरक्षित आहे.
  • दूध काढण्यापूर्वी हातावर फेस किंवा पाणी न लावता हात स्वच्छ धुऊन पुसून स्वच्छ करून दूध काढावे.
  • दूध काढण्याची प्रक्रिया सुरू करताना प्रत्येक कासेपासून प्रथम ३-४ धारा वेगळ्या काढाव्यात. कारण या दुधात जिवाणूंची संख्या सर्वाधिक असते. शेवटच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असतो, म्हणून शेवटचे दूध नीट काढून घ्यावे. धारा पाच ते सात मिनिटात पूर्ण कराव्यात. 
  • यंत्राचा वापर 

  • कासेला इजा होत नाही.
  •  ही पद्धत शक्यतो जास्त जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
  •  या पद्धतीचा उपयोग सरकारी संस्था किंवा मोठे फार्म जास्त प्रमाणात करतात. 
  • या पद्धतीत सडाला मालिश होते.   
  • जलद दूध काढता येऊन मनुष्यबळ वाचते जनावरांची एकंदर उत्पादकता समजते.
  • दुधाचा साठा 

  • स्वच्छतापूर्वक काढलेल्या दुधात जिवाणू संख्येच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दूध काढताच शीतकरण तापमान (४ अंश सेल्सिअस ते ८ अंश सेल्सिअस) पर्यंत थंड करणे आवश्यक आहे.
  • दुधाचे निर्जंतुकीकरण 

  •  दूध ठराविक तापमानाला ठराविक काळासाठी तापवले जाते. त्यामुळे दुधातील अनेक रोगकारक जंतूंचा नाश होतो. निर्जंतुकीकरणानंतर दूध सुमारे ४ ते ८ अंश सेल्सिअस ठेवावे, जेणेकरून दुधातील उर्वरित जिवाणूंची वाढ कमी होईल आणि दूध खराब होणार नाही. निर्जंतुकीकरणानंतर दुधाला हाताने स्पर्श करू नये.
  • दूध वितरण 

  • निर्जंतुकीकरणानंतर दूध जास्त काळ न ठेवता ग्राहकांना लवकर दूध वितरित करावे. दूध जर साठवून ठेवायचे असेल तर उकळून नंतर थंड करून ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला साठवावे.
  •  - डॉ. कीर्ती जाधव ः ७७७६०९५१९४   (पशुवैद्यकीय महाविद्यालय,  बिदर, कर्नाटक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com