Agriculture Agricultural News Marathi article regarding clean milk production. | Agrowon

स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष द्या

डॉ. गोपाल मंजुळकर
शनिवार, 2 मे 2020

दूध काढण्यापूर्वी जनावरांना खरारा करावा. यामुळे रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण क्रिया वाढते. दूध काढण्यापूर्वी दूध काढणी यंत्राचे सर्व भाग निर्जंतुक करावेत. स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत.

दूध काढण्यापूर्वी जनावरांना खरारा करावा. यामुळे रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण क्रिया वाढते. दूध काढण्यापूर्वी दूध काढणी यंत्राचे सर्व भाग निर्जंतुक करावेत. स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत.
 

दूध काढणारी व्यक्ती 
दूध काढणाऱ्या व्यक्तीने पूर्ण अंग झाकले जाईल असे स्वच्छ कपडे घालावेत. तोंडावर मास्क किंवा कापड बांधलेले असावे.
हाताची नखे कापलेली असावीत. शक्य असल्यास प्लॅस्टिक डिस्पोजेबल हातमोजांचा वापर करावा.दूध काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावेत. निर्जंतुक करून नंतरच दूध काढावे. दूध काढतेवेळी दूध पात्राच्या दिशेने खोकू किंवा शिंकू नये.

गोठा  

  • गोठ्यातील जमीन स्वच्छ व सपाट असावी. गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी. गोठा सदैव स्वच्छ असावा. हवा खेळती असावी.  
  • गोठ्यात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असावा. जेणेकरून गोठ्यातील जमीन कोरडी राहील. 
  • दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी.  गोठ्यात बाहेरील व्यक्तींचा प्रवेश टाळावा. गोठ्याच्या प्रवेशावर जंतुनाशक फूट डिपची सोय करावी. त्यासाठी छोटे आयताकृती सिमेंटचे हौद  तयार करावेत. त्याची खोली साधारण आपले पाय बुडतील एवढी असावी. त्यामध्ये पोटॅशिअम परमॅंग्नेट  किंवा सोडियम हायपोक्लोराईट चे सौम्य द्रावण टाकावे. जेणेकरून बाहेरून येणारा व्यक्ती जंतुनाशक द्रावणात पाय बुडवूनच गोठ्यात प्रवेश करेल. 
  • गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यामुळे धूळ उडणार नाही. जमिनीपासून चार ते पाच फुटांपर्यंत चुना लावावा.  त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो.

गाई, म्हशींचे व्यवस्थापन 

  • दूध काढण्यापूर्वी जंतुनाशकाच्या द्रावणाने गाई,म्हशींची कास,  सड,  शेपटी व मागील भाग धुवून घ्यावा. कास स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यावी. यामुळे दुधात घाण, शेण, माती,  चिखल तसेच केस पडणार नाहीत. जंतू संसर्ग टाळला जाईल.  अंगावर गोचीड, गोमाश्या व चिलटे नसावीत. तोंडखुरी, पायाखुरी, घटसर्प, एकटांग्या व ब्रुसेल्लोसीस प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.  
  • धार काढण्याच्या बादल्या, किटल्या, चरव्या,कॅन यांना कमीत कमी कोपरे असावेत. म्हणजे ती स्वच्छ करायला सोपी जातात. पात्रांची तोंडे छोटी असावीत. दूध काढण्याच्या पूर्वी आणि नंतर भांडी गरम पाण्याने धुवावी. भांडी धुण्यासाठी डिटर्जंट पावडर वापरावी. दूध काढण्यापूर्वी जनावरांस खरारा करावा. त्यामुळे अंगावरील सुटे केस निघून जातील. दुधात पडणार नाहीत. तसेच यामुळे रक्तप्रवाह व रक्ताभिसरण क्रिया वाढते.  
  • दूध काढण्यापूर्वी यंत्राचे सर्व भाग निर्जंतुक करून घ्यावेत. यंत्रामध्ये कोणताही दोष नाही, याची खात्री करावी. 
  • दूध काढताना चारही सडांमधून सुरवातीच्या धारा जमिनीवर सोडाव्यात. दूध काढून झाल्यानंतर जनावरांना कमीत कमी  एक तास खाली बसू देऊ नये.  कारण सडाची छिद्रे धार काढल्यानंतर किमान एक तास उघडी असतात. धार काढल्यानंतर सड निर्जंतुक द्रावणामध्ये बुडवावेत.

 - डॉ. गोपाल मंजुळकर, ९८२२२३१९२३
(पशू विज्ञान विभाग, कृषि विज्ञान केंद्र, अकोला)


इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...