स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजना

गोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा.गाई,म्हशी नेहमी निरोगी रहातील, याची काळजी घ्यावी.शक्‍य असल्यास दूध काढणी यंत्रांचा वापर करावा. यामुळे स्वच्छ दूध निर्मितीस मदत होते.
clean milk production
clean milk production

गोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा.गाई,म्हशी नेहमी निरोगी रहातील, याची काळजी घ्यावी.शक्‍य असल्यास दूध काढणी यंत्रांचा वापर करावा. यामुळे स्वच्छ दूध निर्मितीस मदत होते. विकत घेतलेल्या गाई,म्हशींची टीबी, ब्रुसेलोसीसाठी तपासणी करावी. तपासणी अहवाल येईपर्यंत या जनावरांना वेगळे ठेवून जंतनिर्मूलन करावे. संसर्गजन्य आजार नसलेल्या जनावरांना वेळेवर लसीकरण करावे. गाई, म्हशी यांची नियमित कासदाह व कासेच्या आजारांबाबत तपासणी करावी. आजारी जनावरांना वेगळे करावे, उपचार करावेत. आजारी जनावरांचे दूध चांगल्या जनावरांच्या दुधात मिसळू नये. जनावर तसेच कास दूध काढण्याच्या आधी १५ मिनिटे स्वच्छ व कोरडी करून घ्यावी. गाई,म्हशींची मांडी, कासेजवळील आणि शेपटीचे केस नियमित कापून घ्यावेत.  कास व सड दूध काढण्याआधी स्वच्छ धुवून कोरडी करावी. याकरिता कोमट पाण्यामध्ये हायपोक्‍लोराइड (१५ मि.लि./ १० लिटर पाणी)  किंवा पोटॅशिअम परमॅंगेनेटचे द्रावण तयार करावे. जनावरांना नेहमी आरोग्यदायी वातावरणात ठेवावे. जनावर नेहमी निरोगी असेल याची काळजी घ्यावी. जनावर संसर्गजन्य, कातडीचे आजारापासून मुक्त असावे.  दूध काढणाऱ्या माणसाला कोणताही संसर्गजन्य, त्वचेचा आजार असू नये.  नखे नियमित काढलेली असावीत. दूध काढण्यापूर्वी हात स्वच्छ पाणी आणि साबणाने धुऊन घ्यावेत. दूध काढताना स्वच्छ कपडे वापरावेत. त्याचबरोबर केसांना टोपी किंवा कापडाने बांधावे.  दूध काढणी संबंधित बाबी 

  • नेहमी कासेतील दूध पूर्णपणे काढावे. तसेच पहिल्या दुधाच्या धारा पूर्णपणे काढून बाहेर टाकाव्यात, कारण यामध्ये जास्त प्रमाणात जिवाणू असतात. दूध जलद काढावे. 
  • दूध पूर्ण हाताने काढावे, कास धुण्यासाठी स्वच्छ कोमट पाण्याचा वापर करावा. 
  • स्ट्रीप कप चाचणीचा नियमित वापर करावा. 
  • आजारी जनावरांचे दूध शेवटी काढावे. कासदाह झालेल्या सडातील दूध चांगल्या सडातील दूध काढून झाल्यानंतर काढावे. त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. 
  • शक्‍य असल्यास दूध काढणी यंत्रांचा वापर करावा. यामुळे स्वच्छ दूध निर्मितीस मदत होते. यंत्राने दूध काढून झाल्यानंतर यंत्र पाणी, डिटर्जंटने स्वच्छ करावी. यंत्राची व्यवस्थित काळजी घेऊन वेळोवेळी दुरुस्ती करावी. 
  • दूध काढून झाल्यानंतर सड डीप कप द्रावणामध्ये बुडवावीत. जेणेकरून सडाच्या उघड्या छिद्रातून जंतुसंसर्ग होणार नाही. 
  •  गोठा संबंधित बाबी 

  • गोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा. दूध काढण्याचे ठिकाण नाले, साठलेले पाणी, उकिरडा यापासून दूर असावे.
  • गोठ्यामध्ये हवा नेहमी खेळती राहावी. गोठा कोंदट नसावा. 
  • गोठ्यातील नाली नेहमी स्वच्छ करावी. शेण, मूत्र यांची वेळोवेळी व्यवस्थित विल्हेवाट लावावी. गव्हाणी सपाट, चिरा नसलेल्या, दुभंगलेल्या नसाव्यात. 
  • ठरावीक कालावधीने गोठ्यात चुना मारावा किंवा चुन्याने शेड धुऊन घ्यावे. 
  • दूध दोहनासाठी वापरात येणारी भांडी 

  • दूध दोहनासाठी वापरात येणारी, साठवणुकीसाठी असणारी भांडी आतील बाजूने  सपाट असावीत. त्यावर कोणताही थर जमा नसावा. त्या भांड्याला चिरा, उंचवटे नसावेत. 
  • भांडी दूध काढून झाल्यानंतर पहिल्यांदा थंड पाण्याने धुवावीत. नंतर कोमट पाण्याने धुवावीत. त्यानंतर सोडा, साबण चुऱ्याने भांडी धुऊन घ्यावीत. कोरडी होण्यासाठी ठेवावीत. दूध काढण्यासाठी जास्त रुंद तोंड असणारी भांडी न वापरता निमुळत्या तोंडाची भांडी वापरावीत. 
  • भांड्याला अस्वच्छ हात लावू नये. भांडी नेहमी कोरड्या, स्वच्छ ठिकाणी ठेवावीत. 
  • भांडी धुण्यासाठी क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळे क्षार जमा होतात. त्यामध्ये दुधाचे कण/ फॅट जमा होऊन जंतूंची वाढ होऊ शकते. क्षार कमी प्रमाणात असणारे पाणी भांडी धुण्यासाठी वापरावे. भांडी धुण्यासाठी धुण्याचा सोडा, पावडर इत्यादींचा वापर करावा. 
  • मुक्त संचार गोठा फायदेशीर 

  • जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा असावा. कारण अस्वच्छ पाण्यातून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्‍यता असते. 
  • एकदम कोरड्या खाद्यापेक्षा त्यावर वरून पाणी शिंपडून खाद्य खाण्यास द्यावे किंवा गोळी/ कांडी पेंडीचा वापर करावा. यामुळे गाय,म्हशीने खाद्य खाताना धूळ उडून दुधामध्ये जाणार नाही.  नाकात धूळ जाऊन गाय,म्हैस विचलित होणार नाही. 
  • दूध काढतेवेळी वास येणारे खाद्य आणि तण दुधाच्या संपर्कात येऊ देऊ नये. नाही तर अशा खाद्याचा, तणाचा वास दुधाला येतो. 
  • गोठ्यातील माश्‍या, कीटक यांचे नियंत्रण करावे.  
  • पूर्ण दूध काढून झाल्यानंतर लवकरात लवकर दूध संकलन केंद्रात पोचवावे, गरजेनुसार ५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत साठवणूक करावी. 
  • सकाळचे दूध संध्याकाळी किंवा संध्याकाळचे दूध सकाळी डेअरीस देऊ नये. अशा दुधामध्ये जंतूंची संख्या वाढलेली असते. साधारणपणे दूध काढल्यानंतर २ ते ३ तास दुधामध्ये जिवाणूंची संख्या वाढत नाही; परंतु त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत असते. 
  •  स्वच्छ दूध उत्पादनासाठी मुक्त संचार गोठा फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये जनावर आनंदी राहते, जनावर स्वच्छ राहते, कासदाह आजाराचे प्रमाण कमी होऊन स्वच्छ दूध उत्पादनास चालना मिळते.
  • -डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४,

    (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com