clean milk production
clean milk production

दूध संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षता

दूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर फारशी किंवा टाइल्स लावलेल्या असाव्यात. त्या संकलनाआधी आणि नंतर २ टक्के फिनाईलने स्वच्छ कराव्यात. केंद्र शक्यतो उन्हाचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी किंवा वातानुकूलित असावे.

दूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर फारशी किंवा टाइल्स लावलेल्या असाव्यात. त्या संकलनाआधी आणि नंतर २ टक्के फिनाईलने स्वच्छ कराव्यात. केंद्र शक्यतो उन्हाचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी किंवा वातानुकूलित असावे.

  • माश्‍या, झुरळे आणि चिलटांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी कीटकनाशकांचा वापर न करता खिडक्या आणि दारांना जाळ्या लावून घ्याव्यात.
  • दूध संकालनासाठीची भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक असावीत. ती स्वच्छ गरम पाण्यात सोडा बाय कार्ब किंवा डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुऊन, सुकवून घ्यावीत.
  • केंद्रावरील व्यक्ती/कामगार निरोगी आणि स्वच्छ असावेत. त्यांना वाईट सवयी नसाव्यात.
  • दूध संकलित करण्याआधी त्याचे गुण नियंत्रण करावे. त्यामध्ये दुधाचा वास घेणे, उखळी परीक्षण, विशिष्ट गुरुत्व, स्निग्धांश, आम्लता, भेसळ, मिथिलीन रिडक्शन चाचणी इत्यादीचा समावेश होतो. गुण नियंत्रणासाठीची उपकरणे स्वच्छ असावीत. दुधातील एकूण जीवानुसंख्या १०,००० प्रति मि.लि., कोलीफोर्म जिवाणूसंख्या ५० प्रति मिलि आणि सोमॅटिक पेशी संख्या  १,००,००० प्रति मि.लि. पेक्षा कमी असावी.
  • संकलित केलेले दूध थंड ठिकाणी ठेवावे किंवा दुधाच्या भांड्यात ठेवता येणाऱ्या बर्फाच्या भांड्याचा वापर करावा. मात्र दूध आणि बर्फ मिसळू देऊ नये. दूध जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास शीतकरण यंत्राचा वापर करावा.
  • दुधातील भेसळ ओळखण्यासाठी चाचण्या  पाणी  व्हिट्रिफाइड  टाइल्सच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाकून थोडी तिरपी करावी. शुद्ध दूध पांढऱ्या रंगाची रेष काढीत हळूहळू वाहत जाते. पाणी मिसळलेले दूध रेष न काढता पटकन वाहून जाते.    डिटर्जंट  ५ मि.लि. दुधात तेवढेच पाणी घालून घुसळावे. डिटर्जंट असल्यास जास्त फेसाळते. शुद्ध दूध एवढे फेसाळत नाही. ५ मि.लि. दुधात तीन ते चार थेंब ०.५ टक्का ब्रोमोक्रीसोल पर्पलचे द्रावण टाकावे. जांभळा रंग आल्यास भेसळ असल्याचे समजावे. शुद्ध दुधाचा रंग हलका जांभळा होतो.  स्टार्च  २ मि.लि. दूध ५ मि.लि. पाण्यात उकळावे. थंड करून दोन ते तीन थेंब टिंचर आयोडीन टाकावे. स्टार्च असल्यास निळा रंग येतो. साखर  ५ मि.लि. दुधात १ मि.लि. हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चिमूटभर रिसॉरसिनोल टाकून ५ मिनिटे गरम पाण्यात ठेवावे.  साखर असल्यास लाल रंग येतो. साबण १ः ५ मि.लि. दुधात तेवढेच गरम पाणी घालून १ थेंब फिनोल्फथॅलीन टाकावे. साबण असल्यास लाल रंग येतो. रंग ५ मि.लि. दुधात दोन थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. रंग असल्यास गुलाबी द्रावण होते. मीठ ५ मि.लि. दुधात १ मि.लि. सिल्व्हर नायट्रेट टाकून घुसळावे. त्यात अर्धा मि.लि. पोटॅशिअम क्रोमेट टाकावे. मीठ असल्यास पिवळा तर नसल्यास विटकरी रंग येतो. हायड्रोजन परोक्साइड १ मि.लि. दुधात १ मि.लि. पोटॅशिअम आयोडाइड  टाकावे. हायड्रोजन पॅरॉक्साइड असल्यास निळा रंग येतो. युरिया

  • ५ मि.लि. दुधात ५ मि.लि. पी-डायमिथिल अमिनो बेंझलडीहाइड मिसळावे. युरिया असल्यास पिवळा रंग येतो.
  • ५ मि.लि. दुधात ०.२ मि.लि. युरीएझ (२० ग्रॅम/मि.लि.) टाकून मिसळावे. त्यात चार थेंब ब्रोमोथायमोल ब्लू (०.५%) मिसळावे. युरिया असल्यास निळा रंग येतो.
  • बोरिक आम्ल  ५ मि.लि. दुधात १ मि.लि. शुद्ध हायड्रोक्लोरिक आम्ल टाकून टर्मेरिक कागद बुडवून १००अंश सेल्सिअस वर वळवावा. बोरिक आम्ल असल्यास तो लाल होतो.

    - डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९  - डॉ. महेश कुलकर्णी ९४२२६५४४७० (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग,  पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com