प्रक्रिया उद्योगाला चालना देणार

नारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन नारळ विकास मंडळाच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यात श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ कार्यरत आहे.
Coconut
Coconut

नारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन नारळ विकास मंडळाच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यात श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ कार्यरत आहे. मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी कोकणातील नारळ क्षेत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीफळ उत्पादक संघाची स्थापना झाली. नारळ प्रक्रिया आणि विविध पदार्थांची निर्मिती, लागवडीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणे, काथ्या व चटई निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन आणि नारळ विकास मंडळाच्या माध्यमातून नवीन नारळ जातींच्या लागवडीला प्रोत्साहन देणे हा संघाचा मुख्य उद्देश आहे. श्रीफळ उत्पादक संघाचे आजीव सदस्य ३५० असून, सर्वसाधारण सभासद १००० पेक्षा अधिक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, रत्नागिरी व दापोली तालुक्यांत नारळाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. अन्य सहा तालुक्यांमध्ये हे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबरीने सिंधुदुर्गातही नारळ क्षेत्र वाढत आहे. याचबरोबरीने ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील नारळ उत्पादक शेतकऱ्यांशी आम्ही समन्वय साधत आहोत.      नारळ प्रक्रिया उद्योगात फिलिपिन्स, इंडोनशियासारखे देश आपल्या पुढे आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सध्या आम्ही नारळापासून नीरा उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. संघाच्या माध्यमातून नारळ विकास मंडळाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. दोन ते तीन गावे एकत्र एकत्र करून नारळ उत्पादनासाठी गुहागर तालुक्यात २३ क्लस्टर उभारण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक झाडाला ११० रुपयांची खते, कीडनाशके देण्यात आली होती. १०० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. रत्नागिरी तालुक्यात मालगुंड येथे देखील दोन नवीन क्लस्टर उभारली आहेत.  प्रशिक्षणाचे आयोजन  काथ्या उद्योग उभारण्यासाठी अपंग पुनर्वसन संस्थेच्या वीस सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले; मात्र त्यांना आर्थिक मदत देता न आल्यामुळे अजून व्यावसायिक उत्पादन सुरू झालेले नाही. संघातर्फे एक आठवड्याचे माडकरी प्रशिक्षण घेण्यात येते. यामध्ये २५ टक्के महिला सहभागी असणे अपेक्षित आहेत. गुहागर ५, दापोली ४, रत्नागिरी ५ अशी प्रशिक्षणे झाली असून, २०० माडकरी तयार झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नारळाच्या झाडावर चढण्याची स्पर्धा घेतली जाते. प्रशिक्षणार्थींना दीडशे रुपये विद्यावेतन आणि दोन हजार रुपयांची शिडी दिली जाते. पूर्वी महिलांसाठी केरळ येथून प्रशिक्षक आणावा लागत होता; मात्र आता हर्णे येथील एक शिक्षिका स्वतः नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण देतात. या उपक्रमासाठी डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. राजन खांडेकर यांचे सहकार्य लाभले आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न  कोकणपट्टीत अपेक्षित नारळ उत्पादन होत नाही. त्यामुळे कर्नाटक, केरळमधून  नारळ विक्रीसाठी आणला जातो. तारवटीपेक्षा आपल्याकडील नारळाचा दर्जा खूपच चांगला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित आहे. नीरा उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त नारळाच्या जातींची माहिती बागायतदारांना देण्यात येत आहे. सध्या नारळाचे दर १५ ते २५ रुपयांपर्यंत आहेत. लागवडीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठाही सुरू आहे; परंतु कर्ज घेऊन लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. त्यासाठी शासनाने खार जमिनी ताब्यात घेऊन त्यावर लागवडीसाठी योजना आखली पाहिले. शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून नारळ बागेत आंतरपिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. यामध्ये दालचिनी, केळी, अननस यांसारख्या पिकांमधून वार्षिक उत्पन्न सुरू होते. हे लक्षात घेऊन नारळाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या लागवडीला आम्ही चालना दिली आहे.

नारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन नारळ विकास मंडळाच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यात श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ कार्यरत आहे. या मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी कोकणातील नारळ क्षेत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीफळ उत्पादक संघाची स्थापना झाली. नारळ प्रक्रिया आणि विविध पदार्थांची निर्मिती, लागवडीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणे, काथ्या व चटई निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन आणि नारळ विकास मंडळाच्या माध्यमातून नवीन नारळ जातींच्या लागवडीला प्रोत्साहन देणे हा संघाचा मुख्य उद्देश आहे. श्रीफळ उत्पादक संघाचे आजीव सदस्य ३५० असून, सर्वसाधारण सभासद १००० पेक्षा अधिक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, रत्नागिरी व दापोली तालुक्यांत नारळाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. अन्य सहा तालुक्यांमध्ये हे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबरीने सिंधुदुर्गातही नारळ क्षेत्र वाढत आहे. याचबरोबरीने ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील नारळ उत्पादक शेतकऱ्यांशी आम्ही समन्वय साधत आहोत.      नारळ प्रक्रिया उद्योगात फिलिपिन्स, इंडोनशियासारखे देश आपल्या पुढे आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सध्या आम्ही नारळापासून नीरा उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. संघाच्या माध्यमातून नारळ विकास मंडळाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. दोन ते तीन गावे एकत्र एकत्र करून नारळ उत्पादनासाठी गुहागर तालुक्यात २३ क्लस्टर उभारण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक झाडाला ११० रुपयांची खते, कीडनाशके देण्यात आली होती. १०० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. रत्नागिरी तालुक्यात मालगुंड येथे देखील दोन नवीन क्लस्टर उभारली आहेत.  प्रशिक्षणाचे आयोजन  काथ्या उद्योग उभारण्यासाठी अपंग पुनर्वसन संस्थेच्या वीस सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले; मात्र त्यांना आर्थिक मदत देता न आल्यामुळे अजून व्यावसायिक उत्पादन सुरू झालेले नाही. संघातर्फे एक आठवड्याचे माडकरी प्रशिक्षण घेण्यात येते. यामध्ये २५ टक्के महिला सहभागी असणे अपेक्षित आहेत. गुहागर ५, दापोली ४, रत्नागिरी ५ अशी प्रशिक्षणे झाली असून, २०० माडकरी तयार झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नारळाच्या झाडावर चढण्याची स्पर्धा घेतली जाते. प्रशिक्षणार्थींना दीडशे रुपये विद्यावेतन आणि दोन हजार रुपयांची शिडी दिली जाते. पूर्वी महिलांसाठी केरळ येथून प्रशिक्षक आणावा लागत होता; मात्र आता हर्णे येथील एक शिक्षिका स्वतः नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण देतात. या उपक्रमासाठी डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. राजन खांडेकर यांचे सहकार्य लाभले आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न   कोकणपट्टीत अपेक्षित नारळ उत्पादन होत नाही. त्यामुळे कर्नाटक, केरळमधून  नारळ विक्रीसाठी आणला जातो. तारवटीपेक्षा आपल्याकडील नारळाचा दर्जा खूपच चांगला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित आहे. नीरा उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त नारळाच्या जातींची माहिती बागायतदारांना देण्यात येत आहे. सध्या नारळाचे दर १५ ते २५ रुपयांपर्यंत आहेत. लागवडीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठाही सुरू आहे; परंतु कर्ज घेऊन लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. त्यासाठी शासनाने खार जमिनी ताब्यात घेऊन त्यावर लागवडीसाठी योजना आखली पाहिले. शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून नारळ बागेत आंतरपिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. यामध्ये दालचिनी, केळी, अननस यांसारख्या पिकांमधून वार्षिक उत्पन्न सुरू होते. हे लक्षात घेऊन नारळाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या लागवडीला आम्ही चालना दिली आहे.

अपेक्षा 

  • नारळ बागांमध्ये आंतरपिके घेतली तर शासनाकडून मिळणारे ठिबकसाठीचे अनुदान पुरेसे नाही. हे अनुदान वाढविण्याची गरज.
  •  खार जमिनीवर नारळ लागवडीसाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे.
  • प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रशिक्षणांची गरज.
  • नारळ विकास मंडळाच्या योजनांसाठी सोसायटी तयार करण्यासाठी अनुदान आवश्यक.
  • आंतरपीक लागवडीसाठी योग्य योजना आखली तरच शेतकऱ्यांना फायदा.
  • - डॉ.अनिल जोशी,९४२२३८२४७४

    अध्यक्ष, श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ, रत्नागिरी 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com