Agriculture Agricultural News Marathi article regarding cotton market rates | Agrowon

अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदी

चंद्रकांत जाधव
सोमवार, 30 मार्च 2020

कापसाची खरेदी खानदेशात २९ फेब्रवारीनंतर सीसीआयने बंद केली. पुढे खरेदी सुरू होईल की नाही, हे कोरोनाचे संकट किती दूर होते, यावर अवलंबून आहे. यंदा सीसीआयने कापसाची विक्रमी खरेदी केली आहे. परंतु बाजारातील मंदीमुळे काही अडचणीदेखील आल्या आहेत. 
- अविनाश भालेराव, 
सीसीआय कापूस खरेदी केंद्रधारक, जळगाव

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर कापसाची देशभरातील विविध केंद्रांच्या माध्यमातून विक्रमी खरेदी केली आहे. परंतु जागतिक बाजारातील विविध संकटे व ठप्प झालेली उचल यामुळे सीसीआयला वित्तीय फटका बसला असून, यातून सावरण्यासाठी केंद्राने नुकताच सीसीआयला १०५९ कोटी रुपये मदतनिधी मंजूर केला आहे. 

२०११-१२ नंतर सीसीआयने देशात कापसाची विक्रमी खरेदी केली आहे. यंदा बाजारात हमीभावापेक्षा म्हणजेच ५,४५० व ५,३५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा दर कमी आहेत. कमी दर राहिल्याने  सीसीआयच्या केंद्रांमध्ये कापसाची आवक अधिकच राहिली. राज्यात विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात सुमारे ६७ खरेदी केंद्र सीसीसीआयने सुरू केले होते. तसेच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही कापूस खरेदी केली. 
यंदा फेब्रवारीअखेरपर्यंत सुमारे ९२ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची खरेदी सीसीआयने देशभरात केली. तर मागील हंगामातील ११ लाख गाठी सीसीआयकडे शिल्लक आहेत. अर्थातच सुमारे १०३ लाख गाठी सीसीआयकडे असून, त्या गोदामांमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना विषाणू व इतर संकटांमध्ये मंदी आली. त्यात गाठींची विक्री परवडत नसल्याने सीसीआयने आपला साठा राखून ठेवला. त्यात सीसीआयचे नुकसानही झाले आहे. हे नुकसान भरून निघावे व खरेदीला प्रोत्साहन यासाठी केंद्राने सीसीआयला अनेक वर्षानंतर प्रथमच १,०५९ कोटी मदतनिधी मंजूर केला आहे. सीसीआयकडे केंद्रधारक कारखानदार व शेतकरी यांचे चुकारे थकीत नाहीत. जो निधी थकीत आहे, तो बॅंक पासबूक, आधार क्रमांक आदी तांत्रिक अडचणींमुळे थकल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


इतर अॅग्रोमनी
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...