Agriculture Agricultural News Marathi article regarding crop planing. | Page 2 ||| Agrowon

पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन

डॉ.वासुदेव नारखेडे, डॉ.मदन पेंडके, मोरेश्वर राठोड
बुधवार, 3 जून 2020

कोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. जमिनीच्या मगदुरानुसार पीक लागवड आणि पध्दतीचे नियाजन करावे. लवकर येणाऱ्या पिकांच्या जातींना प्राधान्य देवून सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन ठेवावे.

कोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. जमिनीच्या मगदुरानुसार पीक लागवड आणि पध्दतीचे नियाजन करावे. लवकर येणाऱ्या पिकांच्या जातींना प्राधान्य देवून सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन ठेवावे.

पावसाची सुरुवात वेळेवर होते. त्यानंतर काही वेळा पावसाचा खंड पडतो.परत पुन्हा पावसाची सुरुवात होते. यामुळे पीक वाढीच्या कालावधीवर परिणाम होतो.जिरायती पिकाची पेरणी १०० मि. मी. पाऊस झाल्यावर लगेच करावी. भारी जमिनीमध्ये सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, कापूस  लागवड करावी.  हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल, मटकी, कारळा, तीळ, ज्वारी लागवड करावी.     

 • योग्य पाऊस होताच (७५ ते १०० मि.मी.) पेरणी करावी. पेरणी बरोबर रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पाऊस उशिरा सुरु झाल्यास आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा.
 •  पेरणीपूर्व मशागत, बीजप्रक्रिया, आंतरमशागत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि एकात्मिक पीक संरक्षणाचा अवलंब करावा.
 • मूलस्थानी जलसंधारणाकरीता रुंद वरंबा सरी पध्दतीवर पेरणी करावी.
 •  पूर्वमशागत करीत असताना शिफारशीनुसार शेणखताचा वापर करावा.
 •  मृद व जलसंधारणाकरीता बांधबंदिस्ती, ओघळ, नाले इतर उपचाराची दुरुस्ती करावी. जास्त पाऊस झाल्यास शेतात साचलेले पाणी लवकर शेताबाहेर काढावे.
 •  पाऊस झाल्यानंतर तीन दिवसांनी वखर पाळी देऊन पेरणी करावी. जेणेकरुन तणाचा बंदोबस्त करणे शक्य होते.

पीक व्यवस्थापन 

 •  जमीन व पाऊसमानानुसार पीक पध्दती निवडावी. मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मूग, उडीद यांचा समावेश करावा.
 • मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन ही पिके निवडावीत.
 • हलक्या जमिनीमध्ये बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी, भगर या पिकांची लागवड करावी.
 •  आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. त्यामध्ये सोयाबीन + तूर (४:२), कापूस + सोयाबीन/ मूग/उडीद (१:१), बाजरी + तूर (४:२) किंवा (३:३), एरंडी + भुईमूग (२:४), तूर + तीळ (२:४), खरीप ज्वारी + तूर (३:१) किंवा (२:१), कापूस + तूर (६:१), या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. 
 • पाऊस खंडाच्या काळात कोळपणी करावी. त्यामुळे उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन होण्यास मदत होते. तण नियंत्रणासोबत जमीन भुसभुशीत होऊन भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. 
 • रोपाची विरळणी करुन जमिनीतील अन्न, पाणी याची बचत करावी. झाडांची योग्य संख्या राखली जाते. दोन ओळी आणि दोन झाडांत योग्य आंतर ठेवावे.
 • पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी पिकास सरी आड पध्दतीने पाणी द्यावे. तुषार सिंचनाचा अवलंब करावा.
 • लवकर येणाऱ्या जातीचा अवलंब करावा. बियाण्याचे प्रमाण प्रती हेक्टरी योग्य ठेवावे. बीज प्रक्रियेचा अवलंब करावा. 
 • शेणखत, रासायनिक खते, जिवाणू संवर्धन, बिजप्रक्रिया यांचा अधिक उत्पादनासाठी अवलंब करावा. ५० ते ७५ टक्के रासायनिक खताबरोबर २५ ते ५० टक्के शेणखताचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचे जैविक, भौतीक व रासायनिक गुणधर्म सुधारतात. 
 • जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरुन पिकांना फायदा होईल.
 • पेरणीसाठी प्रमाणित बियाणांचा वापर करावा.सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे ३ वर्षांपर्यत वापरता येते.

 

 - डॉ. वासुदेव नारखेडे, ९८२२९९२८६४
(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...