Agriculture Agricultural News Marathi article regarding cultivation of maize and bajara for fodder | Agrowon

सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मका

के. एल जगताप
मंगळवार, 31 मार्च 2020

जनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, एकूण पचनीय घटक  भरपूर प्रमाणात असतात. येत्या काळात दुधाळ जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी बाजरी, मका लागवड करावी.

जनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, एकूण पचनीय घटक  भरपूर प्रमाणात असतात. येत्या काळात दुधाळ जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी बाजरी, मका लागवड करावी.

 

बाजरी  

 • हा चारा अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये २ ते ३ टक्के कच्ची प्रथिने असतात. ३६ टक्के तंतुमय पदार्थ असतात. १ते ३ टक्के क्षाराचे प्रमाण असते. 
 • या चारा पिकात ऑक्झालिक आम्लाचे प्रमाण हे कमी असून ते सुरक्षित आहे. नेपियर गवताबरोबर बाजरी पिकाचा संकर करून जास्त उत्पादन देणारे संकरीत हायब्रिड नेपियर हे चारा पीक तयार केले आहे.  
 • या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. परंतु हे पीक हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत चांगले येते.
 •  पिकाची चांगली उगवण होण्यासाठी वाफे तयार करावेत. ढकळे, धसकटे, गवत काढून वाफे समतल प्रमाणात केलेले असावेत.
 • हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.
 • सध्याच्या काळात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
 •  जाती - पुसा मोती,  मोती बाजरा, जायंट बाजरा, एचबी- १, एचबी - २ इ. 
 • लागवडीपुर्वी शेणखत मिसळून द्यावे. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४०  किलो स्फुरद द्यावे. नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. म्हणजेच ५० किलो नत्र पेरणीच्या वेळी व राहिलेले ३० किलो नत्र हे पहिल्या कापणीनंतर द्यावे.  
 • पिकाला गरजेनुसार १ ते २ पाण्याच्या पाळ्या आवश्यकतेनुसार द्याव्यात.
 • पेरणीनंतर ३० दिवसांमध्ये पिकामध्ये १ ते २  कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. 
 • पीक ५५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पाहिली कापणी करावी. पुढच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात. 

मका 
या पिकात ८ ते १० टक्के कच्ची प्रथिने, ६० टक्के एकूण पचनीय घटक असतात. 
काळी, कसदार, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी.
प्रति हेक्टरी  ४० ते ४५ किलो बियाणे लागते. सध्याच्या काळात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
जाती ः आफ्रिकन टॉल, गंगा हायब्रिड-२, गंगा-५, किसान, जेएस-२०, इ. 
 लागवडीपुर्वी जमिनीत शेणखत मिसळावे. हेक्टरी ८० ते १०० किलो नत्र, ४० ते ५० किलो स्फुरद मिसळावे. नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व राहिलेले अर्धे नत्र ३० दिवसांनी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
पेरणीनंतर १५ ते ३० दिवसांनी कोळपणी करावी. 
पीक ६०  दिवसांचे झाल्यानंतर कापणी करावी. हेक्टरी ५०० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

 - के. एल जगताप, ९८८१५३४१४७
(विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर चारा पिके
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
उत्तम प्रतिच्या हिरव्या चाऱ्यासाठी चवळी...चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
चाऱ्यासाठी पर्यायी स्रोत - शेवगाशेवग्याच्या शेंगांचा समावेश मानवी आहारामध्ये...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
जनावरांसाठी चारा म्हणून विविध...झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
सकस चाऱ्यासाठी लसूण घासलसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा...अमेरिकन लष्करी अळी (शा. नाव -स्पोडोप्टेरा...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...
लागवड ओट चारापिकाची...संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
जनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...