Agriculture Agricultural News Marathi article regarding cultivation of maize for fodder. | Agrowon

मुरघासासाठी मका लागवड

डॉ. विठ्ठल कौठाळे, प्रमोदकुमार ताकवले
गुरुवार, 7 जानेवारी 2021

मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची  दोन ओळींमध्ये ३० सें.मी. अंतर राखून पेरणी करावी.हेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते. कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी.

मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची  दोन ओळींमध्ये ३० सें.मी. अंतर राखून पेरणी करावी.हेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते. कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी येते.

म का हे पौष्टिक चारा पीक आहे. मुरघास बनविण्यासाठी हे पीक अत्यंत महत्त्वाचे आहे. मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीमध्ये ९ ते १० टक्के प्रथिने आणि ८.६ टक्के तंतुमय पदार्थ असतात. मक्‍यामधील शुष्कभागाची ६१ टक्के आणि प्रथिनांची पचनियता ६७ टक्के आहे. 

  •   चांगल्या उत्पादनासाठी गाळाची, कसदार, पाण्याचा चांगला निचरा असणारी व मध्यम खोलीची जमीन लागते. तांबड्या जमिनीमध्ये सुध्दा हे पीक चांगले येते. 
  •  जमिनीची खोल नांगरट करून, पहिल्या काकरपाळीनंतर शेणखत जमिनीवर पसरवून दुसरी काकरपाळी करावी.  
  •   आफ्रिकन टॉल जातीचे बियाणे मोठ्या आकाराचे असते. त्यामुळे हेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते. या पिकाची पेरणी बियाणे फेकून किंवा पाभरीने केली जाते. पेरणीच्या या पध्दतीपैकी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने चालविलेल्या पेरणीयंत्राद्वारे किंवा बैलाने चालणाऱ्या पाभरीद्वारे केलेली पेरणी ही सर्वात चांगली पध्दत आहे. पेरणीमुळे दोन ओळीतील अंतर व दोन रोपांतील अंतर नियंत्रित रहाते.  दोन ओळीमध्ये ३० सें.मी. अंतर राखून पेरणी करावी. 
  •  पेरणीच्या अगोदर दहा किलो बियाणास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टरची प्रक्रिया करावी. मक्‍याची पेरणी वर्षभर केव्हाही करता येते. 
  •  मका पिकाला प्रति हेक्टरी ८० ते  १०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. पेरणीच्यावेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी. पीक पेरणीनंतर एक महिन्याने राहिलेली ५० टक्के नत्राची मात्रा द्यावी. 
  •  पीक उगवून आल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी तण नियंत्रणासाठी  खुरपणी करावी. खुरपणी केल्याने पिकाच्या मुळांना मोकळी हवा मिळते. पिकाची जोमदार वाढ होते. तण लहान असतानाच खुरपणी केल्यास फायद्याचे ठरते. चवळीचे दहा किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरून मक्‍यामध्ये मिश्रपीक घेतल्यास ६० टक्केपर्यंत तणांचे नियंत्रण होते. शिवाय शुष्कभागाचे हेक्‍टरी ५० टक्के अधिक उत्पादन मिळते. 

कापणी आणि उत्पादन  
कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी येते. या वाढीच्या अवस्थेत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. यानंतर जसजसे कापणीला जास्त दिवस लागतील तसतसे प्रथिनांचे प्रमाण कमी होते. म्हणून पिकाची कापणी कणसातील दुधी अवस्था येण्यापूर्वी पूर्ण करावी. पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना कापणी करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी येते. हेक्‍टरी ६० ते ७५ टन चारा उत्पादन मिळते.

 

- डॉ.विठ्ठल कौठाळे, 
 ९८३४६६२०९३ 
(बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र,उरुळी कांचन,जि. पुणे)

टॅग्स

इतर चारा पिके
मुरघासासाठी मका लागवडमक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची  दोन ओळींमध्ये...
सकस चाऱ्यासाठी बायफ बाजरी-१अपुऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दूध...
हिरव्या चाऱ्यासाठी लुसर्नलुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
उत्तम प्रतिच्या हिरव्या चाऱ्यासाठी चवळी...चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
चाऱ्यासाठी पर्यायी स्रोत - शेवगाशेवग्याच्या शेंगांचा समावेश मानवी आहारामध्ये...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
जनावरांसाठी चारा म्हणून विविध...झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
सकस चाऱ्यासाठी लसूण घासलसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा...अमेरिकन लष्करी अळी (शा. नाव -स्पोडोप्टेरा...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...