Agriculture Agricultural News Marathi article regarding development of Sapota sangha. | Agrowon

फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची गरज

उत्तम सहाणे
बुधवार, 21 एप्रिल 2021

चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू उत्पादकांना संघटित केले आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग, अन्य शासकीय यंत्रणा, व्यापारी, वाहतूकदार, वेस्टन साहित्य उत्पादक आदी सर्वांना सोबत घेऊन संघ वाटचाल करीत आहे.

चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू उत्पादकांना संघटित केले आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग, अन्य शासकीय यंत्रणा, व्यापारी, वाहतूकदार, वेस्टन साहित्य उत्पादक आदी सर्वांना सोबत घेऊन संघ वाटचाल करीत आहे.

आज संघाचे राज्यभर तीनशेहून अधिक सभासद आहेत. राज्यात तीस हजारांपेक्षा जास्त क्षेत्रात चिकूची लागवड झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नवी लागवडदेखील होत असून, दिवसेंदिवस क्षेत्र वाढत आहे.

भौगोलिक निर्देशांक मिळाले  
चिकू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त, चवीला गोड आहे. त्यामुळे डॉक्टर तसेच आहारतज्ज्ञ देखील आजारी, अशक्त व्यक्तीला चिकू खाण्याचा विशेष सल्ला देतात राज्यात तसेच देशांमध्ये या फळाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. चिकू हे फळ अन्य फळांप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणावे तसे पोहोचलेले नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  गरीब जनतेचे फळ असेही त्यास संबोधण्यात येते. कारण अन्य फळांच्या तुलनेत ते स्वस्तही आहे. 
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका या फळासाठी प्रसिद्ध आहे. या फळाला २०१६ मध्ये ‘डहाणू, घोलवड चिकू’ असे भौगोलिक निर्देशांकदेखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे फळ आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. या भागातील बचत गटांमार्फत चिकूपासून मूल्यवर्धित पदार्थही बनवले जात आहेत. डहाणू पर्यटनस्थळ असल्यामुळे विक्रीही चांगल्या प्रकारे होत असते. परंतु तरीही मोठ्या प्रमाणात त्याचे मूल्यवर्धन करून निर्यात होणे गरजेचे वाटते.

सदस्यांना सुविधा 
या फळाला विशेष करून उत्तर भारतात थंड हवेतील प्रदेशांमध्ये खूप मागणी आहे. यंदाच्या जानेवारीपासून केंद्र सरकारच्या ‘किसान रेल’ योजनेमार्फत दररोज १५० ते २०० टन चिकू डहाणू तालुक्यातून दिल्ली येथे अनुदानित वाहतूक दरामध्ये पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे कमी वाहतूक दरात फळे लवकर पोहोचतात; शिवाय सुरक्षित वाहतूक होते. अशा प्रकारे चिकू बागायतदारांना  फायदा होत आहे. बागेसाठी लागणाऱ्या निविष्ठा (उदा. कीडनाशके, खते) काही गटांमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

समस्या 
सन २०१३ पासून चिकूला हवामान आधारित विम्याचे कवच मिळत आहे. परंतु त्याच्या अटी थोड्या जाचक आहेत. तसेच यासंबंधी नियमावली बनविताना चिकू उत्पादकांना विश्‍वासात घेतले पाहिजे होते. ते न झाल्याने त्याचा फायदा चिकू उत्पादकांना कमी मिळतो. चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी खूप वाव आहे. यामध्ये तीन ते चार प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. मात्र या मूल्यवर्धित पदार्थांना पाहिजे तशी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मूल्यवर्धित पदार्थ साखळी निर्माण करण्याची गरज आहे.

अपेक्षा

  • केंद्र आणि राज्य शासनातर्फे समाजातील प्रसिद्ध व्यक्ती (सेलिब्रिटी), सिनेअभिनेते आदींमार्फत चिकूचे प्रमोशन होणे गरजेचे आहे. जाहिरातींद्वारे ग्राहकांना या फळाची उपयुक्तता समजावून सांगणे गरजेचे वाटते.
  • जुन्या बागांचे पुनरुज्जीवन ही बाब खूप महत्त्वाची आहे या योजनेला शासन स्तरावर मदत मिळत आहे. कृषी विद्यापीठांमार्फत नवीन जाती निर्माण करणे, खते व संजीवके यांचा वापर जाणीवपूर्वक करून फळाचा दर्जा आणि उत्पादन कसे वाढवावे यावर संशोधन होणे अपेक्षित आहे.
  • चिकू बागायतदार फळांची प्रत सुधारण्यासाठी चांगली मेहनत घेत आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रांची त्यांना चांगली मदत मिळत आहे. अजूनही सर्व स्तरांवरून सहकार्याची अपेक्षा आहे.

- विनायक बारी,९२२६४८४२२८

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ

 (शब्दांकन ः उत्तम सहाणे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, जि. पालघर)


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...