Agriculture Agricultural News Marathi article regarding disease management in goats. | Agrowon

शेळ्या, मेंढ्यांमधील देवी आजार

डॉ. सचीन टेकाडे
शनिवार, 2 जानेवारी 2021

देवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप पॉक्स लस व शेळ्यांसाठी गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आजाराची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

देवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप पॉक्स लस व शेळ्यांसाठी गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आजाराची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

देवी हा पॉक्स विषाणूपासून शेळ्या, मेंढ्यांना होणारा अती संसर्गजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचे विषाणू सूर्यकिरणांना संवेदनाक्षम असतात, परंतु शरीरावरील लोकर / केस, तसेच बाधित जनावरांच्या शरीरावरील कोरड्या झालेल्या खपल्यामध्ये तीन महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. 

आजारामध्ये मेंढ्यांच्या शरीरावर (कान, तोंड, कास, सड, शेवटीखालील जागा, पोट इ.) प्रथम लालसर पुरळ येतात. त्यामध्ये पू होऊन ते पिवळ्या रंगाचे दिसतात. त्याचे रूपांतर खपल्यामध्ये होते. आजारामध्ये प्रौढ शेळ्या, मेंढ्यांमध्ये ५ ते १० टक्के मरतुकीचे प्रमाण असून करडे, कोकरांमध्ये हे प्रमाण जास्त असते. 

प्रसार 

 • बाधित जनावरांच्या संपर्कामुळे. 
 •  बाधित खाद्य, चारा, वाड्यामधील साहित्य, खाद्य भांडी, पाण्याच्या कुंड्या जनावरांच्या गोठ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या माश्यांमार्फत प्रसार. 
 • बाधित जनावरांची लाळ तसेच नाक व डोळ्यांतील स्रावाद्वारे प्रसार. 
 •  बाधित जनावरांचे दूध व मलमूत्राद्वारेसुद्धा रोगाचा प्रसार होतो. 

लक्षणे 

 •  आजाराची तीव्रता, जनावरांचे वय, जात तसेच जनावरांची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असतात. 
 •  विषाणूचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यापासून साधारणपणे ८ ते १३ दिवसांमध्ये लक्षणे दिसतात.      
 •  १०४ अंश फॅरनहाइटपेक्षा जास्त शरीराचे तापमान वाढते.
 •  जनावरांची भूक मंदावते, सुस्त व मलूल दिसते.  
 •     सुरुवातीला शरीरावरील लोकर नसलेल्या भागावर (कान, नाक, कास, सड, शेपटीखालील जागा इ.) पुरळ येतात. त्यामध्ये पू तयार होऊन त्याचे रूपांतर गाठीमध्ये होते. 
 •     नाक, डोळ्यांतील आतील त्वचा लालसर तसेच मानेवरील लसिका गाठीवर सूज येते. 
 •   डोळ्यांच्या पापण्या तसेच नाकामधील आंत्रर्त्वचा यावर पुरळ आल्यामुळे तेथे दाह निर्माण होऊन नाकातून व डोळ्यांतून चिकट स्राव स्रवतो. 
 •  श्‍वास घेताना त्रास होतो. 
 •  गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.
 •  करडे, कोकरामध्ये तीव्रता अधिक असून मरतुकीचे प्रमाण जास्त असते. 

उपचार  

 •  आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही.
 •  लक्षणे आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपामधून वेगळे करावे. 
 •  इतर जिवाणूचे संक्रमण टाळण्याकरिता ५ दिवस प्रतिजैविके व वेदनाशामक औषधोपचार करावा.
 •   शरीरावरील जखमा पोटॅशिअम परमॅंगनेट द्रावणाने स्वच्छ व निर्जंतुक करून त्यावर जंतुनाशक मलम लावावे.

लसीकरण  

 • मेंढ्यांकरिता शीप पॉक्स लस व शेळ्याकरिता गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे.
 •  लसीची रोग प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये राहते. याकरिता तीन महिने वयाच्या वरील सर्व शेळ्या व मेंढ्यांना डिसेंबर - जानेवारी  महिन्यामध्ये दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. 
 •   लसीकरण करताना योग्य मात्रा, प्रमाण, लसीची कालबाह्य तारीख इत्यादीची खात्री करूनच लसीकरण करावे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

 • २ टक्के फेनोल किंवा १ टक्का फोर्मलीनचे द्रावण वापरून जनावरांचे वाडे तसेच इतर साहित्य निर्जंतुक करून घ्यावे. त्याचप्रमाणे फ्लेम गनच्या साह्याने वाडे वरच्यावर निर्जंतुक करावेत. 
 •  गोठ्यामधील बाधित जनावरांच्या संपर्कात आलेला चारा, खाद्य तसेच मृत जनावरे जमिनीमध्ये पुरवून किंवा जाळून त्याची विल्हेवाट लावावी. 
 •  बाधित कळप किंवा जनावरे किमान ४५ दिवस वेगळे ठेवावे.
 •  नवीन खरेदी केलेली जनावरे किमान २१ दिवस पायाभूत कळपामध्ये मिसळू ठेवू नयेत. 
 • प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये मेंढ्यांचे स्थलांतर करू नये.

- डॉ. सचीन टेकाडे, ८८८८८९०२७०
(सहायक संचालक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र  मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)


इतर कृषिपूरक
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणादळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर...
दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपायखुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे....
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...