मका पिकासाठी ठिबक सिंचन

मका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि उंची १ फूट ठेवावी. गादीवाफ्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. दोन ओळींच्यामध्ये इनलाईन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी.
drip irrigation for maize
drip irrigation for maize

मका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि उंची १ फूट ठेवावी. गादीवाफ्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. दोन ओळींच्यामध्ये इनलाईन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी. खरिपातील मका पावसावर अवलंबून असल्याने फुलोरा   तसेच, दोन पावसामध्ये मोठा खंड पडल्यास दाणे भरताना, दाणे पक्व होताना पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनांवर मोठा परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनावर मका लागवड करावी. यामुळे जमिनीत कायम वाफसा राहून पिकास पाण्याचा ताण पडत नाही. उत्पादनात वाढ मिळते. 

  • ज्यांच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत आहे,त्यांनी मका पिकाची पारंपरिक पद्धतीने  लागवड न करता गादीवाफा तयार करून त्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. दोन ओळींच्यामध्ये इनलाईन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी.
  • लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि उंची १ फूट ठेवावी.  रोटॅवेटरचा उपयोग करून नंतर गादीवाफे बनवावेत. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना इनलाईन ठिबक पद्धतीचा वापर करावा.
  •  मका पिकास संतुलित पोषण द्यावे. लागवडीपूर्वी गादी वाफे तयार करताना एकरी १०:२६:२६ च्या दोन गोण्या, १० किलो झिंक सल्फेट, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ३ किलो बोरॅक्स जमिनीत मिसळावे. खते विभागून द्यावीत. 
  • गादी वाफ्यावर मक्याच्या दोन ओळी टोकण पद्धतीने लावताना दोन ओळीत ३० ते ४० सेंमी अंतर ठेवावे. तर दोन रोपांमध्ये २० ते २५ सेंमी अंतर ठेवावे.
  • गादी वाफ्यावर ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केल्यास पिकास कोणत्याही अवस्थेत पाण्याचा ताण पडत नाही. कणसामध्ये दाणे चांगले भरतात. उत्पादनात वाढ होते. 
  • गादी वाफ्यावर लागवड केल्याने पाऊस अधिक झाल्यास पाण्याचा निचरा लगेच होण्यास मदत होईल. 
  • ठिबक सिंचनामधून शिफारशीनुसार पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खतांचा वापर करावा. 
  • - बी.डी. जडे,९४२२७७४९८१,

    (वरीष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.,जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com