फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी

ठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच योग्य मात्रेत पाणी द्यावे. जमीन वाफसा अवस्थेत राहील, याची काळजी घ्यावी.
Drip Irrigation
Drip Irrigation

ठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच योग्य मात्रेत पाणी द्यावे. जमीन वाफसा अवस्थेत राहील, याची काळजी घ्यावी.

ठिबक सिंचन संचामधून सर्वत्र पाणी एकसमान मिळते, याची खात्री करावी. फर्टिगेशन साधनाचा इंजेक्‍शन रेट चेक करावा.  खतांच्या मात्रानुसार खतांचे द्रावण तयार करावे. ठिबक सिंचनद्वारे जमीन वाफसा अवस्थेत आणून द्यावी. जमीन वाफसा अवस्थेत असल्यास ठिबकने जादा पाणी देऊ नये. खतांचे द्रावण ठिबक सिंचनामधून जाण्यासाठी फर्टिगेशन टॅंक किंवा व्हेंचुरी बसविली असेल त्या ठिकाणाचा कंट्रोल व्हॉल्व्ह हळूहळू कमी करावा. म्हणजेच, इनलेट आणि आउटलेटमध्ये प्रेशर डिफरन्स निर्माण करावा, तरच खतांचे द्रावण ठिबक सिंचनामधून पाण्यासोबत पिकांच्या मुळांजवळ पोचतील.  ठिबक सिंचनामधून खते देऊन झाल्यावर ठिबक सिंचनाने ५ मिनिटे पाणी द्यावे. नंतर बंद करावे. जादा वेळ ठिबकने पाणी दिल्यास दिलेली खते पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्राबाहेर झिरपून जातील. ठिबक सिंचन संचामधील सर्व गळती बंद कराव्यात. 

उत्कृष्ट फर्टिगेशन होण्यासाठी

  • जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब. 
  • आराखड्याप्रमाणे शेतामध्ये ठिबक सिंचन संचाची उभारणी. 
  • सिंचनाचे तंतोतंत, अचूक वेळापत्रक. 
  • जमिनीचे तापमान (मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये २२ ते २८ अंश सेंटिग्रेड असावे.) 
  • खतांच्या द्रावणाची मुळांच्या कार्यक्षेत्रातील तीव्रता. 
  • खते देण्याचा कालावधी. खते देण्याची साधने. 
  • सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता. 
  • फर्टिगेशनसाठी रासायनिक खतांची मात्रा 
  • मातीपरीक्षण अहवालनुसार.   उत्पादनाच्या लक्षांकावरून. 
  • जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करण्यावरून.  
  • कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार. 
  • ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन  

  • ठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी द्यावे.
  • जमीन वाफसा अवस्थेत राहील, याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना जादा पाणी दिल्यास मुळांजवळ चिखल निर्माण होईल, मुळांजवळ हवा राहणार नाही; त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करता येणार नाही. त्याचबरोबर जादा पाणी दिल्याने अन्नद्रव्ये मुळांच्या कक्षेबाहेर झिरपून जातील. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळणे शक्‍य होणार नाही. 
  • शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासोबत पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करावा. युरिया, पांढरा पोटॅश हाताने जमिनीमध्ये देण्यापेक्षा ठिबकमधून द्यावे. स्फुरदसाठी १२ः६१ः० किंवा फॉस्फोरिक ॲसिडचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना फर्टिगेशन करता येईल.
  • - बी. डी. जडे ९४२२७७४९८१  (लेखक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि,जळगाव  येथे वरिष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ आहेत. )  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com