Agriculture Agricultural News Marathi article regarding Dron technology in agriculture. | Agrowon

शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

डॉ. के.के.डाखोरे, डॉ.डी.आर.कदम
बुधवार, 20 जानेवारी 2021

पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता आणि पीक मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. येत्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे.

पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता आणि पीक मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. येत्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे.

 काटेकोर शेती नियोजनात मानव रहित हवाई वाहने (यूएव्ही) यांचा वापर प्रगत देशात केला जातो. या तंत्रज्ञानाला  मानव रहित हवाई प्रणाली (यूएएस) किंवा ड्रोन म्हणून देखील ओळखले जाते. अचूक शेती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ड्रोनचा वापर वाढतो आहे. रिमोट सेन्सिंग उपकरणे (सेन्सर) असलेले ड्रोन्सचा वापर पीक वाढीवर नजर ठेवण्यासाठी, कमतरता तसेच कीड, रोगांचा  प्रादुर्भाव शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.  ड्रोनचा वापर करून अतिश अचूकपणे पिकांतील कीड,रोग व वातावरण बदलामुळे संभाव्य धोके ओळखता येतात. ड्रोन वर असणारे विविध सेन्सरचा उपयोग करून पिकांचे आरोग्य, पीक परिस्थिती आणि पिकावर कीड व रोग प्रादुर्भावाचा अचूक वेळी वेध घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झालेले असेल ते ठिकाण शोधून त्यावर तातडीने फवारणी करण्यासाठी परदेशात ड्रोनचा वापर होत आहे. भविष्यात ड्रोनद्वारे पिकातील कीड व रोग प्रादुर्भाव असलेले ठिकाण उपकरणाद्वारे शोधून त्यावर जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त कीटक सोडता येतील. यासाठी  हवामान विभाग,कीटकशास्त्र विभाग, कृषी अभियांत्रिकी विभाग यांचे संयुक्त प्रयत्न महत्वाचे असणार आहेत.   

ड्रोन वापर वाढण्याची कारणे 

 •  पीक लागवड क्षेत्र मोठे असल्याने  प्रत्यक्ष पाहणी करून एखादी कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झालेले ठिकाण शोधणे कठीण होते. परंतु यूएव्हीमुळे मोठ्या क्षेत्रातसुध्दा कीड, रोगाचा प्रादुर्भाव शोधणे सोपे जाते. 
 •  यूएव्ही चालविणे सोपे झाले आहे. कारण ऑफलाइन फ्लाइट प्लॅनिंगचा वापर करून फ्लाइट मिशन पूर्णपणे स्वयंचलित केले आहे. यंत्रणेद्वारे इमेज प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंग टूल्सचा वापर करून संबंधित पिकाचे चित्रण करता येते. 
 •  या तंत्रज्ञानाच्या मॉडेल उच्चस्तरीय डेटा अ‍ॅब्स्ट्रॅक्शन्सचा वापर करतात. यामध्ये अनेक प्रोसेसिंग लेयर्स असतात, ज्यामध्ये रेषीय आणि अरेषीय रूपांतरणे असतात. यांची चांगले परिणाम मिळविण्याची क्षमता असते. दूरस्थ सेन्सिंग प्रतिमांचा वापर केला जातो.  
 •   या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या क्षेत्रावरील पीक परीक्षण,दुष्काळी स्थिती, कीड, रोगाचा प्रादुर्भाव स्थिती, अन्नद्रव्यांची कमतरता, तणांचा प्रादुर्भाव यांचे परीक्षण आणि मूल्यांकन निश्चित करण्यासाठी होतो.
 •   सध्या ज्या ठिकाणी कीड, रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे अशा ठिकाणी फवारणी करते वेळेस मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच फळबागेत ज्या ठिकाणी मानवास फवारणी करणे शक्य नाही, त्या ठिकाणी यूएव्हीचा वापर करुन योग्यरीत्या व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.

तंत्रज्ञानाचा वापर 

 • वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय, जीएनडीव्हीआय, इ.), विशिष्ट वनस्पतींचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापर.
 • पानांमध्ये असलेल्या कॅरोटीनोईड रंगद्रव्यांमध्ये बदल होण्यास संवेदनशील फोटोकेमिकल रिफ्लेक्व्हन्स इंडेक्स (पीआरआय) तपासणी.
 • पिकातील आणि हवेतील तापमानातील फरक तपासणी.
 • पीक पाणी ताण निर्देशांक (सीडब्ल्यूएसआय) फरक तपासणे.
 • बाष्प दाब तफावतीद्वारे (व्हीपीडी) संबंधित पिकातील तापमान आणि हवेच्या तापमानादरम्यान, नॉन वॉटर स्ट्रेस बेसलाइन (एनडब्ल्यूएसबी) तपासणी.
 •  शेतीत अचूकता आणण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर फायदेशीर ठरतो. 

- डॉ. के.के.डाखोरे , ९४०९५४८२०२
(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर टेक्नोवन
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...