Drone technology
Drone technology

पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन, पिकांचे आरोग्य मूल्यांकन इत्यादी कामांमध्ये ड्रोनचा वापर महत्त्वाचा ठरतो. पीक व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन, पिकांचे आरोग्य मूल्यांकन इत्यादी कामांमध्ये ड्रोनचा वापर महत्त्वाचा ठरतो. पीक व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ड्रोन  तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

ड्रोन किंवा यूएव्ही (मानवरहित हवाई वाहन) हे एक ऑटो पायलट आणि जीपीएस निर्देशांकांची मदत घेऊन पूर्व निर्धारित मार्गाने उड्डाण करणारे हवाई परिवहन उपकरण आहे. चालकाच्या हातात असलेल्या रिमोटच्या साहाय्याने किंवा जीपीएसच्या दिशानिर्देशानुसार याला नियंत्रित करण्यात येते. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारे ड्रोन हे साधारणतः २० मीटर (६० फूट) उंच आणि ३ किमी लांब उडू शकतात. या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक घटकांवर नजर ठेवण्यापासून ते कीडनाशक फवारणीपर्यंतची कामे ड्रोनच्या साहाय्याने करता येतात.  ड्रोनच्या साहाय्याने पिकांचे निरीक्षण, नियोजन शक्य आहे. चेसिस, प्रोपेलर्स, मोटर, विद्युत वेग नियंत्रक (इलेक्ट्रॉनिक स्पिड कंन्ट्रोलर), उड्डाण नियंत्रक यंत्र (फ्लाइट कंट्रोलर डिव्हाईस), रेडिओ रिसीव्हर आणि बॅटरी हे ड्रोनचे प्रमुख भाग आहेत. आवश्यकतेनुसार यावर विविध सेंन्सर आणि उपकरणे बसविली जातात. 

कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर  मृदा आणि क्षेत्र विश्लेषण  

  • ड्रोनच्या साहाय्याने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे ३-डी नकाशे तयार करता येतात. या माहितीचा उपयोग प्राथमिक माती परीक्षणासाठी केला जातो. यामुळे आपल्याला लागवडीचे नियोजन करता येते. 
  • पेरणी नंतर, सिंचन आणि नायट्रोजन पातळी स्थिरीकरण, व्यवस्थापनासाठी ड्रोनच्या साहाय्याने उपलब्ध झालेल्या माहितीचा वापर होतो. यानुसार खत आणि पाणी व्यवस्थापन करता येते. 
  • पेरणी नियोजन 

  • ड्रोनच्या साहाय्याने  मिळालेल्या माहितीच्या आधारे आखणी करून पेरणी केली असता साधारणतः ७५ टक्के जलद गतीने कार्य पूर्ण होते. पेरणी खर्चामध्ये चांगली बचत होते. 
  • ड्रोन निरीक्षण अहवाल (डाटा) तपासून पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये पुरवणे शक्य होते. पीक व्यवस्थापन करता येते.
  • पीक फवारणी 

  •  विविध ड्रोनवरील विविध सेंन्सर आणि उपकरणाद्वारे पिकाला स्कॅन करून त्यावरील कीड, 
  • रोगाचा प्रादुर्भाव याचे आकलन केले जाते. 
  • अहवालाच्या आधारावर ड्रोनच्या साहाय्याने कीडनाशकाची फवारणी करणे शक्य होते. येथे प्रादुर्भाव आहे,तेथेच फवारणी केली जाते. फवारणीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
  • पिकांची देखभाल 

  • ड्रोनवर बसविण्यात आलेले, मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल सेंन्सरद्वारे पिकांचे आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचे तंतोतंत आणि अचूकपणे विश्लेषण करता येते. 
  • मिळालेल्या माहितीचा उपयोग करून पिकांना आवश्यक घटक पुरविले जातात.
  • सिंचन  

  •  ड्रोनवरील हायपर-स्पेक्ट्रल, मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा किंवा थर्मल सेंन्सर यांच्या साहाय्याने जमिनीवरील कमी पाण्याचा भाग किंवा कोरड्या भागाचा शोध घेतला जातो. त्याच क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो.
  • ड्रोनच्या वापरामुळे पीकवाढीबरोबर वनस्पती निर्देशांकसुध्दा (व्हेजीटेशन इंडेक्स) मोजणे शक्य होते. वनस्पती निर्देशांक हा पिकाची घनता आणि आरोग्य दर्शवितो. पिकावरील पाण्याचा ताण, उष्णतेचा पिकावरील होणारा परिणाम याचे आकलन करण्यास मदत  करतो.  
  • पिकांचे आरोग्य मूल्यांकन 

    पीक आरोग्यासोबत पिकावरील कीड, रोगांचे निरीक्षण करून त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. पिकांच्या आरोग्य मूल्यांकनासाठी व्हिजिबल आणि इन्फ्रारेड सेंन्सरचा उपयोग केला जातो. ड्रोनमधून या सेंन्सरच्या साहाय्याने पिकांचे स्कॅनिंग करून प्रादुर्भाव झालेल्या रोपांची ओळख केली जाते आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येते. 

     - महेश निकम, ९४०३३३२१५३

    पी.एचडी. स्कॉलर, कृषि शक्ती व औजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com