शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञान

ड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा पशुधनाच्या हालचालींबद्दल प्रत्यक्ष माहिती देतात. जेणेकरून व्यवस्थापनाबद्दलचे निर्णय कार्यक्षमतेने घेतले जातात. ड्रोन वायरलेस प्रणालीने दूरस्थपणे नियंत्रित करता येतात. पीक व्यवस्थापनात ड्रोनचा वापर वाढत आहे.
Drone Flight
Drone Flight

ड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा पशुधनाच्या हालचालींबद्दल प्रत्यक्ष माहिती देतात. जेणेकरून व्यवस्थापनाबद्दलचे निर्णय कार्यक्षमतेने घेतले जातात. ड्रोन वायरलेस प्रणालीने दूरस्थपणे नियंत्रित करता येतात. पीक व्यवस्थापनात ड्रोनचा वापर वाढत आहे. ड्रोन हे मानव रहित हवाई वाहन आहे. शेती आधुनिकि‍करणामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा पशुधनाच्या हालचालींबद्दल प्रत्यक्ष माहिती देतात. जेणेकरून व्यवस्थापनाबद्दलचे निर्णय कार्यक्षमतेने घेतले जातात. ड्रोन वायरलेस प्रणालीने दूरस्थपणे नियंत्रित करता येतात किंवा ऑनबोर्ड कंट्रोलर्सवर चालणाऱ्या नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करून पूर्व निर्धारित मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रोग्रॅम तयार केला जाऊ शकतो. जगभरात ड्रोनचा वापर मर्यादित आणि विशिष्ट चाचण्यांसाठी केला जातो. याचबरोबरीने  शेतीचा विचार करता तण, किडी आणि रोग व्यवस्थापनासाठी फवारणी आणि खते पसरविण्यासाठी ड्रोनचा उपयोग होत आहे. ड्रोनचा शेतीमधील वापर  माती विश्लेषण  ड्रोनचा उपयोग माती व शेती विश्लेषणासाठी, सिंचन, लागवड नियोजन आणि जमिनीत नायट्रोजन पातळी तपासणीसाठी करता येतो. याचबरोबरीने अचूक ३-डी नकाशे तयार करण्यास उपयुक्त आहे, याचा उपयोग मातीचे गुणधर्म, आर्द्रता आणि मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता यांचे विश्लेषण करण्यासाठी करतात. पिकांची देखरेख   हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान होते. पिकांची वाढ व आरोग्य यावर देखरेख करण्यासाठी ड्रोनच्या साहाय्याने घेतलेल्या उच्च गुणवत्तेच्या मल्टीस्पेक्ट्रल प्रतिमा उपयोगी ठरतात.  माहिती विश्लेषक याद्वारे पिकांमधील बदल डोळ्यांनी दिसण्याच्या आधीच कळतात. सिंचन  थर्मल, मल्टीस्पेक्ट्रल किंवा हायपर-स्पेक्ट्रल सारख्या सेन्सरच्या साहाय्याने जमिनीतील ओलाव्याची कमतरता असलेला भाग ओळखू शकतात. हे वेळेवर सिंचन करण्यासाठी उपयोगी ठरते.  पीक फवारणी  ड्रोन ठराविक क्षमतेपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. याचा उपयोग करून कमी वेळात मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर कीडनाशक फवारणी करू शकतो. ड्रोनच्या अंतर्गत प्रणालीच्या साहाय्याने विशिष्ट क्षेत्रावर, ठरवलेल्या वेळेनुसार आणि मार्गांद्वारे पीक फवारणी अधिक सुरक्षित आणि प्रभावी होते. यामुळे हानिकारक रसायनांसोबत मनुष्याचा संपर्क कमी होतो. संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की, पारंपारिक यंत्रणेच्या तुलनेत ड्रोन फवारणीची क्षमता पाच पटीने जास्त आहे. पक्ष्यांना घाबरविणे  पिके पेरल्यानंतर पक्षी ही मोठी समस्या आहे. अशा वेळी शेताचे राखण करणे हे खूप गरजेचे आहे. काही ड्रोन फ्लाइट्स पक्ष्यांना शेतापासून दूर ठेऊ शकतात. पीक आरोग्य मूल्यांकन    वनस्पती दृश्यमान  आणि अवरक्त प्रकाश प्रतिबिंबित करतात, ही प्रतीबिंबनाची तीव्रता वनस्पतीच्या आरोग्याची स्थिती आणि तणाव यांच्या पातळीनुसार वेगवेगळी असते. यासाठी सक्षम सेन्सर बसविलेल्या ड्रोनचा वापर पिकाच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी ठराविक काळासाठी केला जाऊ शकतो. तसेच उपाययोजनांच्या प्रतिसादावर नजर ठेवण्यासाठी केला जातो. पिकांवर नजर  मोठ्या शेतात पिकांच्या एकूण स्थितीचा अंदाज बांधणे अशक्य आहे. ड्रोनच्या साहाय्याने पिकाच्या चित्रणामुळे शेतकऱ्यांना वनस्पतींच्या स्थितीनुसार, क्षेत्रानुसार अद्ययावत राहण्यास मदत होते आणि कोणत्या क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे, हे कळते.  पिकांच्या स्थितीचा अंदाज लावण्यासाठी  ड्रोनवरील कॅमेराद्वारे शेताची पाहणी करता येते. पिकांवर नजर आणि पीक आरोग्य मूल्यांकन हे ड्रोनचे वैशिष्ट्य आहे.  शेतकऱ्यांच्या विमा दाव्याच्या पडताळणीसाठी याची मदत होते.  पिकाचा अंदाज ड्रोन्सवर बसविलेले अल्ट्रा कॉम्पॅक्ट लिडर  सेन्सर वापरून पीक, झाडांची संख्या आणि जमिनीपासूनचे अंतर पृष्ठभागापासून मोजले जाऊ शकते. जंगलातील लाकूड उत्पादनाचा अंदाज आणि उसासारख्या पिकांमध्ये उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी हे उपयोगी ठरते. 

- सुयोग खोसे ,९४०३६१३४७१,  (आयआयटी,खरगपूर,पश्चिम बंगाल)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com