Agriculture Agricultural News Marathi article regarding feed management of milch animal. | Agrowon

जनावरांना खुराकासोबत द्या बायपास प्रथिने

डॉ. सागर जाधव
मंगळवार, 5 मे 2020

जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी जनावरांना खाद्यामध्ये बायपास प्रथिनांचा समावेश करावा. खाद्य घटकातील बायपास प्रथिनांच्या प्रमाणाच्या आधारावर पोषक पशुखाद्य बनवावे. 

जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी जनावरांना खाद्यामध्ये बायपास प्रथिनांचा समावेश करावा. खाद्य घटकातील बायपास प्रथिनांच्या प्रमाणाच्या आधारावर पोषक पशुखाद्य बनवावे. 

आहारातील प्रथिनांचा काही भाग पोटात पचन न होता तो लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होऊन जनावराच्या शरीराला पूर्णतः उपलब्ध होतो, यालाच बायपास प्रथिने असे म्हणतात. प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणजे तेलविरहित पेंड (सरकी, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल व इतर धान्य). आहारात प्रथिनांचा वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा व किती प्रमाणात होत आहे हे समजून घेऊन प्रथिनांचे प्रमाण ठरवावे.

बायपास प्रथिने  देण्याचे नियोजन

 • जनावरांच्या पोटात असणारे सूक्ष्मजीव हे पोटात पचन होणाऱ्या (आरडीपी) प्रथिनांचे रूपांतर उपयुक्त सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये करतात, परंतु उत्तम दर्जाचे व अधिक प्रथिने असल्यास संपूर्ण प्रथिनांचे रूपांतर हे योग्य प्रथिनांमध्ये होत नाही आणि त्याचा काही भाग वाया जातो. म्हणून पोटाच्या पहिल्या भागात ६०-७० टक्के पचन होणाऱ्या उत्तम दर्जाच्या प्रथिनांचे विविध पद्धतीचा (रासायनिक) वापर करून फक्त २० ते २५ टक्के प्रथिने पचन होण्यास बायपास प्रथिने मदत करते. 
 • दुष्काळी परिस्थितीत निकृष्ट दर्जाचा चारा वापरला जातो. त्यामुळे जनावराच्या शरीरात पोषणतत्त्वाची कमतरता भासते आणि त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर होतो. अशा परिस्थितीत प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर होतो. 
 • जास्त प्रमाणात आरडीपी असणाऱ्या प्रथिनांचे रूपांतर आरयूडीपी प्रथिनांमध्ये करण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर होतो. 
 •  बायपास प्रथिनांचे फायदे  
 • खाद्य घटकातील बायपास प्रथिनांच्या प्रमाणाच्या आधारावर पोषक पशुखाद्य बनवता येते. 
 • बायपास प्रथिने पचनशील प्रथिनांचे अमोनियामध्ये रूपांतर कमी प्रमाणात करतात, त्यामुळे जनावराचा अमोनिया विषबाधेपासून बचाव होतो. 
 • अमिनो आम्लाचे प्रमाण शरीरात वाढते, त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन ही वाढते. जास्त दूध (२०-२५ लीटर) देणाऱ्या जनावरांसाठी बायपास प्रथिने अतिशय उपयुक्त आहेत. 
 • दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 
 • जनावराच्या वाढीचा दर व प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. 
 • वासरांची वाढ बायपास प्रथिनांमुळे चांगली होते. 
 • जनावरे चांगला माज दाखवतात. त्यानंतर गाभण राहण्याचे प्रमाण यामुळे वाढते. 

बायपास प्रथिने देण्याच्या पद्धती 

 • नैसर्गिक प्रथिनांचा उपयोग करणे : पशुआहारात कमी पचन होणारी प्रथिने (मका) मिसळावीत. 
 • कृत्रिम अमिनो आम्ल : काही काळ उष्णतेचा समतोल साधून तयार केले जाते. त्यामुळे ते पोटात कमी प्रमाणात पाचन होते. 
 • पोटामध्ये कृत्रिमरीत्या सोडणे : बटर, दूध प्रथिने. 

बायपास प्रथिने 
आहारातील प्रथिने ही दोन भागांत विभागलेली असतात. पहिला भाग म्हणजे पोटात (रुमेन) पचन होणारी (आरडीपी - रुमेन डिग्रीडेबल प्रोटीन) आणि दुसरा भाग म्हणजे पोटात न पचन होणारी (आरयूडीपी - रुमेन अनडिग्रीडेबल प्रोटीन). आहारातील प्रथिनांचा काही भाग पोटात पचन न होता तो लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होऊन जनावराच्या शरीराला पूर्णतः उपलब्ध होतो.  

 

बायपास प्रथिनांसंबंधी महत्त्वाच्या बाबी  

 • सरासरी १० ते १५ लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिक बायपास प्रथिनांचा (सरकी पेंड, सोयाबीन मिल इ.) वापर करावा. 
 • १५ ते २० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम पद्धतीने बनवलेली बायपास प्रथिने वापरावीत. 
 • नैसर्गिक बायपास प्रथिने वापरत असताना पूर्ण आहारातून दिल्या जाणाऱ्या एकूण प्रथिनांमध्ये ६० ते ६५ टक्के आरडीपी व ३५ ते ४० टक्के आरयूडीपीचे प्रमाण असले पाहिजे. 
 • बाजारातून आणलेल्या बायपास प्रथिनांमध्ये प्रमाण किमान २२ टक्के व आरयूडीपीचे प्रमाण १४ टक्के असावे.

 - डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ 
(पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

 

 

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...