आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात केंद्राची गरज

गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे. यामुळे २०-२२ वर्षांपासून तळेगाव, वडगाव मावळ परिसरात पॉलिहाउसमध्ये नियंत्रित आणि निर्यातक्षम फुलोत्पादनाला प्रारंभ झाला.
rose flower
rose flower

गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे. यामुळे २०-२२ वर्षांपासून तळेगाव, वडगाव मावळ परिसरात पॉलिहाउसमध्ये नियंत्रित आणि निर्यातक्षम फुलोत्पादनाला प्रारंभ झाला.

टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्र वाढू लागल्यानंतर पतपुरवठा, निविष्ठा, उत्पादन, बाजारपेठ, निर्यात आणि अडचणींवर मात करण्यासाठी २००० मध्ये पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाची स्थापना करण्यात आली. सध्या पॉलिहाउसमधील लागवडीचे क्षेत्र सुमारे दीड हजार एकर आहे. संघाचे ५०० सभासद आहेत.  संघाचे उपक्रम  वीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय फलोत्पादन मिशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पॉलिहाउसमधील फूल उत्पादनाला चालना मिळाली. वडगाव मावळ, तळेगाव परिसरातील पोषक वातावरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पाच -दहा गुंठ्यांवरील पॉलिहाउस उभारण्यास सुरुवात केली. वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबर काही उद्योजकांनी देखील उद्योग म्हणून या व्यवसायात उतरले. पॉलिहाउसमधील फुलोत्पादनासाठी एक ठरावीक पीकपद्धती ठरलेली आहे. त्याचे वर्षभराचे नियोजन ठरलेले असते. मात्र विक्रीच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करावे लागतात. ती सर्वसाधारण सर्व ठिकाणी सारखीच आहे. यासाठी कंपन्यांचे कन्सल्टंट असल्यामुळे उत्पादनासाठी विशेष काही अडचणी येत नाहीत. मात्र विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर सामूहिक कष्ट घ्यावे लागले. पहिल्यांदा शेतकरी वैयक्तिकरीत्या उत्पादन आणि विक्री करायचे. विक्रीदेखील बाजार समित्यांमध्ये अडतीवर करायचा. त्यामुळे राज्य तसेच परराज्यांतील दर आणि एकूण उत्पन्नाची शाश्‍वती नसायची. त्यामुळे काही वेळा तोटाही सहन करावा लागायचा. हे लक्षात घेऊन फूल उत्पादकांनी एकत्र येत, आपणच फुलांचा दर ठरवायचा आणि व्यापारी, खरेदीदारांना आपल्या शेतावर बोलावून विक्री करायचे आम्ही ठरविले. २००६-०७ मध्ये आम्ही ही कार्यपद्धती अंगीकारल्यामुळे रोजचा साधारण दर ठरवून एकमेकांना कळवायचा आणि ज्याला जो परवडेल त्या दराने जागेवरच विक्री करायची असे ठरविण्यात आले. त्यानुसार आता ही विक्री पद्धती सुरू आहे. संघ फूल उत्पादकांच्या समस्या सोडवितो. विविध क्षेत्रांशी समन्वय साधण्याचे काम करतो.

अपेक्षा 

  •  देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नवनवीन फुलांच्या जाती केंद्र आणि राज्य सरकारने उपलब्ध करून द्याव्यात.
  • सध्या आम्हाला नेदरलँड, स्पेन आदि देशांतून नवनवीन जाती रॉयल्टी देऊन आणाव्या लागतात. याचा खर्च सरकारने करावा. 
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी असलेल्या फुलांच्या नवनवीन जातींसाठी संशोधन व विकास केंद्र तळेगावात उभारावे. 
  • तळेगावमध्ये लिलाव गृह आणि निर्यात सुविधा केंद्र उभारावे. त्याचा फूल उत्पादक, खरेदीदार, निर्यातदारांना फायदा होईल. 
  • शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये पॉलिहाउसेसच्या नुकसान भरपाईसाठी धोरण आखावे.   
  • तळेगाव येथे फ्लोरिकल्चर पार्क सहकारी उत्पादक संघ कार्यरत आहे. या संघाचे १११ सभासद असून, सुमारे ५०० एकरांवर फूल उत्पादनासाठी पॉलिहाउसची उभारणी झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने फ्लोरिकल्चर पार्कची उभारणी करण्यात आली आहे. आमच्या संघाच्या माध्यमातून एकत्रितपणे विविध समस्यांच्या निवारणाचे काम केले जाते. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांसाठी एमआयडीसी सोबत समन्वय साधणे, निर्यातदाराकडून होणारी फसवणूक टाळणे, फुलांचा दर एकसारखा ठेवणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. शेतकरी, खरेदीदार, निर्यातदार यांच्या सर्वांच्या सोयीसाठी तळेगाव परिसरात लिलाव आणि निर्यात सुविधा केंद्र उभारले तर सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. कोरोनासारख्या संकटामुळे गेल्या वर्षी फूल उत्पादन आणि निर्यात पूर्ण ठप्प झाली होती. अशा परिस्थिती सध्याच्या टाळेबंदीमध्ये फुलांची बाजारपेठ अत्यावश्‍यक सेवेमध्ये असावी अशी आमची मागणी आहे.

    -व्ही. एम. जम्मा, ९९२२४०२८९९ (अध्यक्ष, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क सहकारी उत्पादक संघ) 

    - शिवाजीराव भेगडे,७०६६२१११७१ (अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com