गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

शेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात. गर्भाच्या वाढत्या वयाबरोबर हे बदल दिसतात. गर्भाची योग्य वाढ होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.
Goat
Goat

शेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात. गर्भाच्या वाढत्या वयाबरोबर हे बदल दिसतात. गर्भाची योग्य वाढ होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. 

शेळी गाभण असल्याची खात्री झाल्याने तिची गर्भारपणातील काळजी घेणे सोपे जाते. विण्याचा दिवस सर्वसाधारणपणे निश्‍चित करता येतो. या काळात कासदाह नियंत्रणासाठी औषधोपचार, संतुलित आहार पुरवावा. गोठ्यामध्ये व्यंग असलेल्या मादी वेगळ्या करून रोगचिकित्सा करता येते. गर्भनिदानामुळे गाभण मादीला पौष्टिक संतुलित आहार देणे शक्‍य होते. मादीच्या गर्भपणात योग्य आहाराचा अभाव असल्यास अशक्त पिल्ले जन्मतात. 

गर्भनिदानाच्या पद्धती बाह्य लक्षणे  शेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात. गर्भाच्या वाढत्या वयाबरोबर हे बदल दिसतात . 

  • शेळी माजावर न येणे ः साधारणपणे प्रत्येक २१ दिवसानंतर शेळी माजावर येते. ही मादी माजावर असताना योग्य वेळी रेतन केले असता माज दाखवत नाही. अशा वेळी गाभण असल्याची तपासणी करून घ्यावी. कारण काही वेळा मादी शरीराअंतर्गत इतर दोषामुळे माजावर येत नाही. 
  • वाढणाऱ्या गर्भामुळे वजन वाढू लागते. पोटावर घेर वाढतो. 
  • विण्यापूर्वी दोन आठवडे कासेचे आकारमान वाढते. सड पिळल्यास त्यातून चिकट द्रव बाहेर येतो. 
  • प्रयोगशाळेतील चाचण्या  श्‍लेष्मा परीक्षण 

  • कॉपर सल्फेट परीक्षण ः यात परीक्षानळीत कॉपर सल्फेटच्या द्रावणात थोडे योनीमार्गातील अंतःत्वचेवरील श्‍लेष्मा टाकल्यास जर तो बुडाला गेला तर गर्भधारणा आहे असे समजावे. 
  • सोडिअम हायड्रोऑक्‍साइड ः १० टक्के सोडियम हायड्रोऑक्‍साइडमध्ये योनीमार्गातील अंतःत्वचेवरील श्‍लेष्मा टाकून पाच-सहा मिनिटे उकळले असता जर तपकिरी रंग तयार झाला तर गर्भधारणा आहे असे समजावे. 
  • ऊर्ध्वपातित पाणी परीक्षण ः ५ मि.लि. ऊर्ध्वपातित पाण्यात ५ मि.लि. अंतःत्वचेवरील श्‍लेष्मा टाकून ३ मिनिटे उकळल्यास जर गढूळ असे मिश्रण दिसत असेल तर गर्भधारणा आहे असे समजावे. 
  • दूध परीक्षण 

  • दुधामध्ये ३ टक्के कॉपर सल्फेट मिसळून ते हलवावे. जर हे मिश्रण एकजीव मिसळले गेले नाही तर गर्भधारणा आहे असे समजावे. 
  • लघवी परीक्षण 

  • ५ मि.लि. लघवी गाळून घ्यावी. त्यामध्ये ४ ते ५ थेंब १ टक्का बेरिअम क्‍लोराइड मिसळले असता लघवी पारदर्शक राहिली तर गर्भधारणा आहे असे समजावे. 
  • आर.आय.ए. (रेडिओ इम्यूनो एसए) तंत्र 

  • या पद्धतीत दूध व प्लाझ्मा (एका काचनलिकेत काही वेळ न हलवता ठेवल्यानंतर वरच्या भागात जमा होणारा पारदर्शक भाग) यातील प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावाचे प्रमाण तपासले जाते. ते जर २ ng प्रति ml पेक्षा जास्त असेल तर शेळी गाभण आहे असे समजावे.
  • अल्ट्रासोनोग्राफी 

  • या तंत्रात ध्वनिलहरींचा वापर केला जातो. हर्टझ हे मोजण्याचे माप आहे. एक हर्टझ म्हणजे एका सेकंदाला एक कंपन. अर्थात मेगाहर्टझ म्हणजे एका सेकंदाला दहा लाख कंपने. शेळीमध्ये ७ मेगाहर्टझचा वापर केला जातो. 
  •  शेळीमध्ये रेतन केल्यानंतर या उपकरणाने पाचव्या आठवड्यानंतर द्रवामुळे किंवा पिलामुळे गर्भाचे अस्तित्व कळू शकते. 
  • या तपासणीमध्ये मृदू अवयवांचे स्पष्ट चित्रण होते. गर्भाचे हृदय व्यवस्थित काम करत आहे का हे आपल्याला या तपासणीतून कळते. 
  • गर्भ कसा आहे, गर्भाची वाढ नीट होते की नाही, गर्भाशयाची स्थिती उत्तम आहे की नाही, गर्भ एकच आहे की जुळं, तिळं आहे.तसेच प्रसूतीच्या अंदाजे तारखेची माहिती मिळते. 
  • लेप्रोस्कोपी तंत्र 

  • या तंत्रात लेप्रोस्कोपीचा वापर करून अंडाशय तपासले जाते. जर इतर गर्भधारणेच्या लक्षणांसोबत अंडाशयावर क्वारपस ल्यूटियम (CL) आढळले तर जनावर गाभण आहे असे समजावे. 
  • फीटल इलेक्‍ट्रोकार्डिओग्राफी 

  • या तंत्रात गर्भाच्या हृदयाच्या ठोक्‍यामुळे जो इलेक्‍ट्रिक ग्राफ दिसू लागतो, त्यावरून गर्भधारणा आहे असे समजावे.
  • -  डॉ. मंजूषा पाटील, ९०९६३६८४०७ (सहायक प्राध्यापक, पशुप्रजनन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com