Agriculture Agricultural News Marathi article regarding goat management. | Agrowon

शेळीपालनाचे नियोजन

पंकज पाटील
गुरुवार, 7 जानेवारी 2021

माझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे. यामध्ये दोन एकर क्षेत्रात ऊस आणि वीस गुंठ्यांत चारा पिकांची लागवड असते. बाजारपेठेचा अभ्यास करून तीन वर्षांपूर्वी मी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यापूर्वी शेळीपालनाचे दोनदिवसीय प्रशिक्षण घेतले होते.

माझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे. यामध्ये दोन एकर क्षेत्रात ऊस आणि वीस गुंठ्यांत चारा पिकांची लागवड असते. बाजारपेठेचा अभ्यास करून तीन वर्षांपूर्वी मी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यापूर्वी शेळीपालनाचे दोनदिवसीय प्रशिक्षण घेतले होते.

शेळ्यांचे व्यवस्थापन

  • शेतामध्ये साठ फूट बाय नव्वद फूट आकाराचे बंदिस्त शेळीपालनासाठी शेड उभारले आहे. काही क्षेत्र शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळे ठेवले आहे. शेडमध्ये सहा कप्पे आहेत. यामध्ये पिलांसाठी स्वतंत्र चार कप्पे आहेत. शेडच्या कडेने जाळीचे कुंपण केले आहे. मी जातिवंत बिटल, सिरोही, सोजत आणि गावरान जातीचे संगोपन करतो. 
  • सध्या शेडमध्ये शेळ्या, बोकड मिळून ७० संख्या आहे. सकाळी सहा वाजता शेळ्यांचे व्यवस्थापन सुरू होते. शेडची स्वच्छता करून सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता शेळ्यांना चाराकुट्टी आणि खाद्य मिश्रण दिले जाते. गरजेनुसार शेळ्यांना ताजे पाणी मिळेल याची व्यवस्था केलेली आहे.
  • दररोज दोन वेळा चारा दिला जातो. सकाळी सुका, हिरवा चारा, मुरघास आणि सायंकाळी सुका, हिरवा चारा, मुरघास, खुराक, खनिज मिश्रण देतो. खुराकामध्ये मका, गहू, सोयाबीन भरडा देतो. सध्या थंडी असल्याने खाद्यामध्ये सोयाबीन, बाजरी भरड्याचा वापर करतो. यामुळे शेळ्यांना ऊर्जा मिळते. सर्दीचा त्रास कमी होतो. लहान करडांना उकडलेली बाजरी खाद्यामध्ये दिली जाते. वजनानुसार सरासरी दररोज ५० ग्रॅम बाजरी दिली जाते. एका शेळीला सकाळी आणि संध्याकाळी ३ किलो चारा मिश्रण आणि १०० ग्रॅम खुराक देतो. सुक्या चाऱ्यामध्ये तूर, हरभरा भुस्सा यांच्या वापर करतो.
  • डिसेंबर महिन्यात पीपीआरचे लसीकरण केले आहे. तीन वर्षांतून एकदा ही लस दिली जाते. पशुतज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी केल्याने आरोग्य चांगले आहे.
  • जागा कमी असल्याने बंदिस्त पद्धतीने शेळीपालनावर सध्या भर आहे. थंडीमुळे संध्याकाळी गोठ्याच्या कडेने झाकतो. त्यामुळे थंड वाऱ्याचा त्रास होत नाही. लहान करडांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शेकोटी केली जाते.
  • प्रत्येक वाढीच्या टप्प्यात करडे, बोकड आणि शेळीच्या नोंदी ठेवल्या जातात. यामध्ये वजन, खाद्य, लसीकरण, जंतनिर्मूलन, विक्रीचा तपशील असतो. प्रयोग म्हणून मी काही करडांना वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य मिश्रण देत आहे. त्यांच्या वाढीवर होणार परिणाम लक्षात घेऊन पुढील काळात संबंधित निवडलेले खाद्य सर्व शेळ्यांना देणार आहे.

विक्री नियोजन
मी शक्यतो बाजारपेठ किंवा व्यापाऱ्यांना विक्री करत नाही. सोशल मीडियाद्वारे थेट शेतकऱ्यांना शेळी, बोडकांची विक्री केली जाते. आमचा शेळीपालकांचा गट आहे. जातिवंत शेळ्यांची पैदास असल्याने बहुतांश विक्री ब्रीडिंगसाठी होते. दर चार महिन्यांनी १५ ते २० शेळ्या, बोकडांची विक्री होते.

- पंकज पाटील,  ८२०८५६०३७६ 

 

 


इतर कृषिपूरक
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणादळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर...
दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपायखुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे....
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...