Agriculture Agricultural News Marathi article regarding goat management. | Page 2 ||| Agrowon

शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲझोलाचा वापर

डॉ. सचिन टेकाडे
शनिवार, 23 जानेवारी 2021

झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास हिरव्या वैरणीचा ४० टक्के खर्च आपण कमी करू शकतो. खाद्यामधील पोषणमूल्याचे प्रमाण वाढवून कमी खर्चात पौष्टिक चारा शेळ्यांना उपलब्ध करण्याकरिता अझोलाचा वापर करावा.

झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास हिरव्या वैरणीचा ४० टक्के खर्च आपण कमी करू शकतो. खाद्यामधील पोषणमूल्याचे प्रमाण वाढवून कमी खर्चात पौष्टिक चारा शेळ्यांना उपलब्ध करण्याकरिता अझोलाचा वापर करावा.

शेळी पालनामध्ये खाद्य व चाऱ्यावर ६० ते ७० टक्के खर्च होत असतो. हा खर्च कमी झाल्यास उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित वैरण प्रजातींच्या एकदल व द्विदल प्रकारातील चारा पिकांची लागवड करावी.झाडपाल्याचा चारा म्हणून वापर केल्यास हिरव्या वैरणीचा ४० टक्के खर्च आपण कमी करू  शकतो. 

चाऱ्यासाठी उपयुक्त असलेल्या चारावृक्षाच्या प्रजातीची लागवड ही निश्चितच फायदेशीर ठरू शकते. यामध्ये केंद्रीय रेशीम जननद्रव्य संशोधन केंद्र, केंद्रीय रेशम बोर्ड, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, होसूर, तामिळनाडू या संस्थेमार्फत तुतीच्या  विकसित केलेल्या व्ही-१, एस-१६३५, एस-१३ या सुधारित प्रजाती शेळ्यांच्या चाऱ्याकरिता उपयुक्त व फायदेशीर आहेत. तसेच तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीकेएम-१ आणि पीकेएम-२ या शेवग्याच्या प्रजाती चाऱ्याकरिता उपयुक्त असून अशा प्रजातींच्या वृक्षापासून   शेळ्यांना सकस असा चारा मुबलक प्रमाणात निर्माण होऊ शकतो. 

खाद्यामध्ये अझोलाचा वापर 

  •   अझोला ही पाण्यावर तरंगणारी शैवाळवर्गीय वनस्पती आहे. अझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त व लिग्निन या घटकाचे प्रमाण अल्प असल्यामुळे ते शेळ्यांना सहज पचनीय असते. 
  •   सुरुवातीला सवय होईपर्यंत अझोला इतर खाद्यात मिसळून द्यावा. शेळ्यांना  प्रतिदिन ५० ते १०० ग्रॅम या प्रमाणात अझोला देऊ शकतो.

मुरघास प्रक्रियेने चारा साठवण 

  •   हिरवी वैरण साठवून ठेवण्याकरिता मुरघास एक उत्तम  पर्याय आहे.  मुरघास कोणत्याही हंगामात तयार करता येतो. एकदल वर्गातील चारा पिके जसे मका, ज्वारी पिकाच्या वैरणीचे सर्वोत्तम मुरघास तयार होऊ शकते. मुरघास हवाबंद केल्यामुळे आम्ल तयार करणाऱ्या जिवाणूंची वाढ होते. आम्लाच्या सान्निध्यात नको असलेल्या जिवाणूंची वाढ होत नाही त्यामुळे चारा कुजत नाही. आम्लाचे प्रमाण वाढले म्हणजे चारा कुजण्याची प्रक्रिया थांबते आणि चारा टिकून राहतो. ४५ दिवसांत उत्तम प्रकारचा मुरघास तयार होतो आणि एक वर्षापर्यंत टिकून राहतो. 
  •   मुरघास खाऊ घालण्याआधी शेळ्यांना वाळलेला वैरण द्यावी. त्यानंतर दिवसातून २-३ वेळा मुरघास समभागात विभागून घ्यावा. एका शेळीला ६०० ते ९०० ग्रॅम किंवा वजनाच्या २ टक्यांपर्यंत मुरघास देऊ शकतो परंतु सहा महिने वयाच्या आतील करडांना शक्यतो मुरघास खाऊ घालू नये. 

नोंदींचे विश्लेषण   

  •    कुठल्याही व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता बघण्याकरिता व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवणे व त्याचे विश्लेषण करणे आवश्यक असते. परंतु शेळीपालन व्यवसायामध्ये नोंदी ठेवणे याकडे शेळीपालकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची दिसून येते. 
  •    शेळ्यांचे दर महिन्याला वजन घेऊन नोंदी घेऊन त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. पिल्लांमध्ये प्रतिदिन वजन वाढीचा वेग १०० ग्रॅम पेक्षा जास्त असल्यास समाधानकारक व्यवस्थापन असल्याचा अनुमान लावता येतो परंतु या पेक्षा कमी वजन वाढीचा वेग असल्यास व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे गरजेचे असते. 
  •    याचबरोबरीने पैदाशीच्या नोंदी, आरोग्य विषयक नोंदी, खाद्य व वैरण उत्पादनाच्या नोंदी तसेच इतर नोंदी ठेऊन त्याचे वेळोवेळी विश्लेषण करून त्यानुसार व्यवस्थापनामध्ये बदल करावा.

- डॉ. सचिन टेकाडे,  ८८८८८९०२७०
(सहाय्यक संचालक,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)

 


इतर कृषिपूरक
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले...
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...