कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
टेक्नोवन
शेळी दूध प्रक्रियेला संधी
भारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम तयार केले आहे. परदेशामध्ये शेळीच्या दुधापासून तयार केलेले पेटा, पिकोरिना हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम तयार केले आहे. परदेशामध्ये शेळीच्या दुधापासून तयार केलेले पेटा, पिकोरिना हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
शेळीचे दूध आरोग्यदायी आणि पचायला हलके आहे. आहार मूल्याच्या दृष्टीने औषधी समजले जाते. एक परिपूर्ण सकस आहार म्हणून शेळीचे दूध महत्त्वाचे आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये शेळीच्या २७ प्रकारच्या जाती आढळतात. देशी शेळी एका वेतात साधारणपणे ६० लिटर दूध देते. आपल्या राज्यातील उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी प्रसिद्ध आहे. सानेनसारख्या विदेशी जातीपासून संकर केलेली शेळी एका वेतात सुमारे ३०० लिटरपर्यंत दूध देते. जागतिक दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे २ टक्के आहे. शेळीपालन हा वेगाने वाढणारा कृषिपूरक व पर्यावरणपूरक दुग्ध व्यवसाय आहे.
दुधाचे आरोग्यदायी फायदे
- आर्द्रता ८५ ते ८७ टक्के, प्रथिने ३ ते ३.५ टक्के, स्निग्धता ४.५ टक्के, शर्करा (लॅक्टोज) ४ ते ५ टक्के आणि खनिज पदार्थ ०.५ ते १ टक्का असतात.
- दूध पचनास हलके असण्याचे कारण म्हणजे, स्निग्ध पदार्थाच्या कणांचा सूक्ष्म आकार.
- दुधात शरीरविरोधी सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक अधिक असतात.
- दुधात ९ ते १० प्रकारची खनिजे आहेत. परिणामी२, आवश्यक खनिजांची घटकांची कमतरता कमी होण्यास चांगल्याप्रकारे मदत होते.
- रोज ग्लासभर शेळीचे दूध पिणे आरोग्याला फायदेशीर आहे. हे दूध प्यायल्याने आतड्याची सूज कमी होण्यास मदत होते.
- कॅल्शिअमची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे कमजोर होतात. शेळीचे दूध प्यायल्याने कॅल्शिअमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात.
- दुधामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते.
- दुधात प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे शरीराचा विकास होण्यास मदत होते, हे लक्षात घेऊन मुलांना शेळीचे दूध द्यावे.
- हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी शेळीचे दूध फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हार्ट ॲटॅक, स्ट्रोक्स या समस्यांचा त्रास रोखण्यासाठी शेळीचे दूध फायदेशीर ठरते.
- शेळीच्या दुधात पोटॅशिअम घटकही मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
- अमृता राजोपाध्ये-कुलकर्णी, ७२१८३२७०१०
(कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)