Agriculture Agricultural News Marathi article regarding Gram cultivation | Agrowon

रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवड

डॉ. तुकेश सुरपाम
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे उत्पादनात वाढ होते.त्याचबरोबरीने लागवडीचा वेळ, मजुरी आदींमध्येही बचत  होते.

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे उत्पादनात वाढ होते.त्याचबरोबरीने लागवडीचा वेळ, मजुरी आदींमध्येही बचत  होते.
 

हरभरा  पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना 
 करावी. पेरणीस जास्त उशीर झाल्यास आणि किमान तापमान खूपच कमी झाल्यास उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी कोरडवाहू तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करावी. 

लागवडीच्या पद्धती

 • दोन सरीतील अंतर १५० सेंमी. ठेवावे. यामुळे १२० सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार होतो.
 • १२० सेंमी रुंदीच्या वरंब्यामुळे ३० सेंमी अंतरावर चार ओळीत लागवड करावी. 
 • जमिनीच्या प्रकारानुसार सरीची रुंदी कमी किंवा जास्त करता येऊ शकते.

अन्य पद्धत 

 • दोन सरीतील अंतर १२० सेंमी. ठेवावे. यामुळे ९० सेंमी रुंदीचा वरंबा तयार होतो. वरंब्यावर ३० सेंमी अंतरावर तीन ओळी घेता येतात. दोन्ही बाजूच्या सरी या गरजेनुसार ३० सेंमी किंवा कमी जास्त मिळू शकतात.
 • एका वरंब्यावर ४५ सेंमी अंतराच्या तीन ओळी घेण्यासाठी १३५ सेंमी रुंदीचा वरंबा तयार करावा. यासाठी दोन सरीतील अंतर १८० सें मी. ठेवण्यासाठी बीबीएफ यंत्र फाळाच्या (सरी) मध्य खुणेवर चालवावे. दोन्ही बाजूस पडणारी सरी ४५ सेंमी रुंदीची होते. 

फायदे

 • चांगली मशागत होऊन लागवडीसाठी गादीवाफे तयार होतात.
 • दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर तसेच बियाण्यांची खोली शिफारशीनुसार ठेवता येते.
 • प्रति हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.  
 • वरंब्यावर पीक असल्यामुळे पाणी आणि हवा यांचे योग्य संतुलन राखले जाते. पिकाला पुरेपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो.
 • दोन्ही बाजूंनी असलेल्या सरीमुळे अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. तसेच कमी पाण्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत मिळते.
 • तणांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.आंतरमशागत करणे सोयीचे होते.
 • बीबीएफ यंत्रामुळे रुंद वरंबा व सरी पाडणे, बियाण्यासोबत खत देणे, रासणी करणे शक्य होते. 
 • यंत्राच्या वापरामुळे बियाणे, वेळ, इंधन, मजुरीवरील खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. 

  - डॉ. तुकेश सुरपाम, ८६६८३९८७४९
(विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी), 
कृषी विज्ञान केंद्र, खामगाव,जि.बीड)


इतर कडधान्ये
आरोग्यदायी कडधान्येमुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के,...
कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोतकडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत....
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
हरभरा पिकाची सुधारित लागवडहरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार...
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण...सध्याच्या परिस्थितीत तूर पीक कळ्या लागण्याच्या...
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवडकोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय,...
रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवडहरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
प्रकाश संश्लेषण, पाणी वापर...चवळी पिकांच्या पर्णसंभारामध्ये प्रकाश संश्लेषण...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...