वाढवा प्रतिकार क्षमता

सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. याच्या नियंत्रणासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्याचबरोबरीने आपणही सध्याच्या आहारात काय काळजी घ्यावी, कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात हे समजणे खूप आवश्यक आहे.
milk and turmeric mixture
milk and turmeric mixture

सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. याच्या नियंत्रणासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्याचबरोबरीने आपणही सध्याच्या आहारात काय काळजी घ्यावी, कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात हे समजणे खूप आवश्यक आहे.

बदलती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे अनेकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. व्यायामाचा अभाव, बैठे काम यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. हे लक्षात घेऊन प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बदलते हवामान, साथीचे आजार यांचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली असणे आवश्यक आहे.  

औषधोपचार  

  • घसादुखी, सर्दी या लक्षणाकडे, तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्याने औषधे सुरु करावीत. गर्दी, कोंदट वातावरण टाळावे. मास्क वापरावा.
  • कोमट पाण्याचे सेवन करावे. तुळशीची चार-पाच पाने, गवती चहा, दालचिनीचा तुकडा एक ग्लास पाण्यात घालून उकळून ते पाणी अर्धा कप प्रमाणात दोन-तीन वेळा सेवन करावे.
  • सितोपलादी चूर्ण आणि पिंपळी चूर्ण प्रत्येकी एक चतुर्थांश चमचा घेऊन मधासह चाटण दोन-तीन वेळा घ्यावे.
  • रोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
  • रात्री झोपताना गार दूध पिण्याची सवय असेल तर टाळावी.
  • संध्याकाळी रोज गरम दुधात हळद मिसळून उकळून प्यावे.
  • सितोपलादी चूर्ण अर्धा चमचा त्यात ज्येष्ठ मध पावडर अर्धा चमचा आणि एक चतुर्थांश चमचा पिंपळी पावडर मिसळून मधासह चाटण दिल्यास खोकला कमी होण्यास मदत होते.
  • छातीला तीळ तेल लावून शेकावे.
  • खोकल्याची ढास येत असेल तर लवंग भाजून तोंडात धरावी.
  • आहारात्मक उपाययोजना 

  • आहारात दही, आंबट ताक, दह्यातील कोशिंबीर, लस्सी या पदार्थांचा वापर टाळावा.
  • शीतपेय, थंड पाणी, थंड ज्यूस पिणे  टाळावे.
  • ए.सी. कमीत कमी वापरावा.
  • केळीचे शिकरण, फळांचे सलाड खाणे टाळावे.
  • बाहेर जाताना मास्क, रुमाल तोंडाला बांधावा. बांधलेला रुमाल त्वरित धुऊन टाकावा. वापरलेला मास्क योग्य पद्धतीने फेकून द्यावा.
  • बाहेरुन आल्यावर, कोणत्याही गोष्टीला हात लावल्यावर, जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
  • बाहेरून आल्यावर कपडे धुऊन वापरावेत.
  • काळजी  ताप वाढल्यास, श्वास घ्यायला त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत विलंब करू नये. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी. (टीप : या लेखातील उपचार आणि काळजी सर्दीच्या प्राथमिक अवस्थेतील आहेत.)

     - डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com