Agriculture Agricultural News Marathi article regarding heat stress in milch animals | Agrowon

जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रण

डॉ.शिवकुमार यंकम
मंगळवार, 7 एप्रिल 2020

उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढून चारा खाण्याचे प्रमाण घटते. याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. याचबरोबरीने पचन आणि चयापचयाचे आजार गाई,म्हशींमध्ये दिसतात. आजाराची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात.

उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढून चारा खाण्याचे प्रमाण घटते. याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. याचबरोबरीने पचन आणि चयापचयाचे आजार गाई,म्हशींमध्ये दिसतात. आजाराची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात.

उन्हाची वाढती तीव्रता माणसांप्रमाणेच जनावरांना त्रासदायक ठरते. हिरवा चारा आणि  पाण्याची कमतरता असल्यामुळे दूध उत्पन्न, शरीर पोषण आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
 उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढून चारा खाण्याचे प्रमाण घटते. याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. उन्हाचा दाह गाईंपेक्षा म्हशींमध्ये जास्त दिसून येतो त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीमध्ये अत्यंत कमी असतात. कातडी काळी असल्यामुळे सूर्य प्रकाश परावर्तित न होता कातडीमध्ये जास्त प्रमाणात शोषला जातो. म्हशीचे शारीरिक तापमान वाढते, त्यामुळे म्हशींमध्ये उन्हाचा दाह जास्त प्रमाणात दिसून येतो.

 • हा आजार अतिप्रखर सूर्य किरणे आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो.
 • कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते.
 •  अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 

उष्माघाताची लक्षणे

 • जनावरे जोरात धापा टाकतात, श्वासोछवास जोराने करतात, नाडी जलद चालते.
 • चारा खाण्याचे प्रमाण कमी होते, अपुऱ्या ऊर्जेअभावी गाई,म्हशी अशक्त होतात. 
 • रवंथ गती मंदावते. डोळे खोल जातात. जनावरे एकटक बघतात.
 • तोंड आणि नाक कोरडे पडते. जनावरांचे शेण घट्ट होते. 
 •  वेळीच काळजी व उपचार न केल्यास जनावरे दगावण्याची दाट शक्यता असते.

कडव्या आजाराची लक्षणे  

 •  आजार प्रामुख्याने ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो, त्यांच्यामध्ये जास्त दिसतो.  कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीमध्ये मेलेनीन हा घटक कमी प्रमाणात असतो. 
 • चाऱ्याच्या अभावी भुकेपोटी काही वेळा जनावरे गाजर गवत खातात. अशी जनावरे उन्हात जास्त वेळ फिरली असता हा आजार दिसतो. गाजर गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. 
 • जनावराच्या अंगाची जळजळ होते, खाज सुटते. शरीरावर लाल चट्टे येतात.

उपाय योजना

 • जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे किंवा ओले कापड, गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे.  त्यावर वारंवार पाणी मारावे. 
 • जनावरांना झाडाखाली किंवा थंड ठिकाणी गोठ्यात बांधावे.
 • भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी व चारा द्यावा 
 • पाण्यात साखर व मीठ असे मिश्रण करून प्यायला द्यावे.
 •  नाकातील रक्तस्राव थांबत नसेल तर पशूतज्ज्ञांच्या सल्याने औषधोपचार करावेत.जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. 

पचन संस्थेचे आजार 

 • उन्हाळ्यामध्ये जनावरांना प्रथिनयुक्त खुराक, चारा देणे गरजेचे असताना याच वेळी कमी पौष्टिक आणि कमी प्रथिनयुक्त चारा दिला जातो. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो, परिणामी उत्पादन तसेच प्रजननक्षमता कमी होते.
 • दुष्काळ, उन्हाळ्यामुळे जनावरे चारा कमी आणि पाणी जास्त पीत असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन होते, आम्लाचे प्रमाण वाढते.
 •  घामावाटे सोडियम आणि पोटॅशिअम यासारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम शरीर प्रक्रियेवर होतो.

चयापचयाचे आजार 

 • आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे चयापचयाचे आजार होतात.
 • चरायला बाहेर फिरणाऱ्या जनावरांना जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. परंतु, टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण खर्ची पडते. यामुळे जनावरांचे वजन दिवसेंदिवस कमी होत जाते. ही स्थिती मुख्यतः गाभण जनावरांमध्ये लवकर आढळून येते.

विषबाधा  

 • हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात, यामुळे विषारी वनस्पती जसे की, बेशरम, घाणेरी, गुंज, धोतरा जनावरांच्या खाण्यात येतात,त्यांना विषबाधा होते. 
 •  बाधित जनावरे गुंगल्यासारखी करतात. काही काळात खाली बसतात.  वेळीच उपचार न केल्यास ताबडतोब दगावू शकतात.

आम्लधर्मीय अपचन

 • खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील अचानक बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्भवते.
 • चाऱ्याची कमी उपलब्धता, निकृष्ट चारा असल्यास पशुपालक जनावरांना घरातील धान्य भरडून देतात. त्यात प्रामुख्याने चंदी, खुराकातील घटक व धान्याचे प्रमाण अचानक बदलतात, त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या निर्माण होते.
 • यामुळे पोट गच्च फुगणे/राहणे, हगवण लागणे, रवंथ न करणे, लाथा मारणे व चारा न खाणे अशी लक्षणे दिसून येतात.

उपाययोजना 

 •  टंचाई सदृश परिस्थीतीत जनावरांना निकृष्ट चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात पशुखाद्य(खुराक) व क्षार मिश्रण द्यावे.
 •  विषबाधेची लक्षणे दिसताच पशूतज्ज्ञांकडून उपचार करावेत. 
 •  तीव्र स्वरूपाच्या आम्लधर्मीय अपचनात जनावर दगावण्याची शक्यता असल्यामुळे वेळेवर उपाययोजना आणि औषधोपचार करावेत.

 - डॉ.शिवकुमार यंकम, ७७०९३९७०१७
(डॉ. शिवकुमार यंकम  पशुवैद्यकीय दवाखाना, येरमाळा जि.उस्मानाबाद येथे पशुधन विकास अधिकारी आहेत. )


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...