Agriculture Agricultural News Marathi article regarding Horticulture schemes. | Agrowon

फलोत्पादनासाठी शासनाच्या योजना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

कृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या विविध योजना आहेत.

कृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या विविध योजना आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 
संरक्षित शेती योजनेचा उद्देश 

 • शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक साह्य करणे. 
 • ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. 
 • फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. 

लाभार्थी निवडीचे निकष 

 • शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यास शेतकऱ्यांच्या आपसांतील भाडेपट्टा करार या योजनेत ग्राह्य धरण्यात येणार नाही. तथापि शेतकऱ्याने शासकीय किंवा निमशासकीय घेतलेल्या जमिनीवर हरितगृह व शेडनेटगृह उभारावयाचे झाल्यास, दीर्घ मुदतीचा (किमान १५ वर्ष) व दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेला भाडेकरार या योजनेत ग्राह्य धरण्यात येईल. 
 • हरितगृह आणि शेडनेटगृहामध्ये फलोत्पादन पिकांची लागवड करणे बंधनकारक आहे. 
 •  शासकीय योजनेंतर्गत नोंदणीकृत गटातील एकाच गावातील पाच किंवा पाचपेक्षा अधिक शेतकरी हरितगृह-शेडनेटगृहामधील लागवड साहित्य तसेच पूर्व शीतकरणगृह, शीतखोली किंवा शीतगृह व शीत वाहन या घटकांसाठी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज केल्यास जिल्ह्यास दिलेल्या 
 • लक्षांकाच्या मर्यादेत सदर शेतकऱ्यांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल. 
 • या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, भागीदारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या शेतकरी समूह व बचत गट (पुरुष-महिला) यांना लाभ घेता येईल. 

अर्ज कुठे करावा 

 • लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (महाडीबीटी) या ऑनलाइन संकेत स्थळावर नोंदणी करावी. 

आवश्यक कागदपत्रे

 •  ७-१२ उतारा, ८-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बॅंक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 •  संवर्ग प्रमाणपत्र (अनु. जाती-अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) 
 •  पासपोर्ट आकाराचा सद्यःस्थितीचा फोटो, विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-२) इत्यादी
 • टीप ः आवश्यकतेनुसार कागदपत्रे संकेत स्थळावर अपलोड करावीत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम (१०० टक्के केंद्र पुरस्कृत) 
योजनेचे महत्त्व ः फळबाग लागवडीच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्मिती. 
योजनेचे उद्दिष्ट ः फळबाग लागवड माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ, उत्पादन वाढविणे. 
योजनेची व्याप्ती ः राज्यातील ३४ जिल्हे
योजनेचे स्वरूप
    फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे. 
    लाभार्थीस सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची लागवड करता येते. 
फळपिके  
आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, नारळ (बाणवली-टी.डी.) बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर कलमे, सुपारी, साग, गिरिपुष्प, सोनचाफा, कडुलिंब, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, करंज आणि इतर औषधी वनस्पती 
फुलपिके 
गुलाब, मोगरा, निशिगंध
लाभार्थी पात्रतेचे निकष ः 

 • लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. 
 •  जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व ७-१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. 
 • लाभार्थी जॉबकार्ड धारक असावा. 
 • योजनेसाठी जॉबकार्ड धारक  ‘अ़़' ते ‘ह’ प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र राहील. अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती क) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी ड) भू-सुधार योजनेचे लाभार्थी इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी फ) कृषी कर्ज माफी योजना २००८ नुसार अल्पभू-धारक व सीमांत शेतकरी ग) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वनअधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती ह) महिला प्रधान कुटुंबे.
 • योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे-वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती पिके ९० टक्के आणि कोरडवाहू पिके ७५ टक्के जिवंत ठेवतील अशाच लाभार्थी यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचे अनुदान देय राहील. 
 •  लाभार्थ्यांना २ हेक्टर क्षेत्राचे मर्यादेत फळझाड लागवड करता येते. 
 • कार्यान्वयीन यंत्रणा ः जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

इतर शासन निर्णय
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
‘सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग...जालना: ‘‘जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या ‘आत्मा’...
औषधी वनस्पती, वृक्ष लागवड योजना गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पतींची लागवड वाढत...
गोदामांचे नूतनीकरण अन्‌ नवीन निर्मितीमहाराष्ट्र राज्यात सुमारे १६८ गोदामांचे नूतनीकरण...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
शेती विकासासाठी स्मार्ट प्रकल्प, शेतकरी...राज्यात जागतिक बँक अर्थसाह्याने “मा. बाळासाहेब...
शेतकरी उत्पादक संस्था, बचत गटांसाठी...महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास भारतीय रिझर्व्ह...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
खरिपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाहवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
खत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...
डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...
शाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...
काजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...