Agriculture Agricultural News Marathi article regarding hydrophonix fodder production. | Agrowon

हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा निर्मिती

डॉ. समीर ढगे
बुधवार, 6 मे 2020

हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत चाऱ्याची निर्मिती करता येते.एक किलो बियाण्यापासून ७ ते ८ किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी जास्त पाण्याची आवश्‍यकता नसते. 

हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत चाऱ्याची निर्मिती करता येते.एक किलो बियाण्यापासून ७ ते ८ किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी जास्त पाण्याची आवश्‍यकता नसते. 

येत्या काळात जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धत हिरव्या चाऱ्याची निर्मिती करावी. कमी खर्चामध्ये शेडनेटमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करता येते. बांबू, लाकूड, लोखंडी पाईप  यांचा वापर करून सांगाडा उभारता येतो. या सांगाड्याला शेडनेटचे कापड लावून तात्पुरते हरितगृह तयार करता येते. यामध्ये स्वयंचलित सूक्ष्म सिंचनाद्वारे किंवा पाठीवरील पंपाद्वारे ठरावीक कालावधीमध्ये पाणी फवारणी केली जाते. या तंत्राद्वारे चारानिर्मिती करताना धान्याची उगवण व उत्पादन हे वातावरणातील घटकांवर अवलंबून असते. हंगाम, उष्णता, हवेतील आर्द्रता इत्यादी घटकांचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. 
आपल्याकडे चारा निर्मितीसाठी मका पिकाचा वापर अधिक योग्य आहे. मका बियाणाची उपलब्धता, कमी किंमत, जलद वाढ, अधिक उपलब्धता यामुळे या पिकाची निवड योग्य ठरते. चारा निर्मितीसाठीचे  बियाणे चांगल्या प्रतीचे स्वच्छ, कीडमुक्त, प्रक्रिया न केलेले, उगवण क्षमता व चांगल्या प्रतीचे असावे.
बियाणांची चांगली उगवण ही चारा निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे. उगवण प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मका बियाणे ४ ते ५ तास पाण्यात चांगले भिजवावे. या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे ट्रे देखील निर्जंतुक करणे आवश्‍यक आहे. निर्जंतुकीकरण केल्याने बुरशीची वाढ होत नाही. 
बियाणे पाण्यात भिजवल्यानंतर १ ते २ दिवस गोणपाटात दडपून ठेवल्यास बियाणांना कोंब फुटतात. कोंब आलेले बियाणे ट्रे मध्ये स्थलांतरित करावे.

चारा उत्पादन 

  • प्रति एक मीटर वर्ग ट्रेसाठी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे. बियाणे जास्त दाट झाल्यास बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे बियाणांचा वापर जास्त दाट करू नये.
  • चारा निर्मितीसाठी जास्त पाण्याची आवश्‍यकता नसते. १ किलो चारा उत्पादनासाठी १ ते ३ लिटर पाणी पुरेसे आहे.
  • ट्रे मधील बियाणांना १ ते २ दिवसानंतर कोंब फुटण्यास आणि २ ते ३ दिवसांनी मुळांची वाढ होण्यास सुरवात होते.  साधारणतः सात ते दहा दिवसामध्ये पिकाची काढणी करणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेमध्ये अधिक प्रमाणात हिरवा चारा उत्पादन व अधिक शुष्क पदार्थांची निर्मिती होणे आवश्‍यक असते. हिरव्या चाऱ्याची वाढ होताना रोपांमध्ये पाण्याची वाढ व शुष्क पदार्थ म्हणजेच एकूण अन्नद्रव्यांची घट होते. 
  • एक किलो मका बियाणांपासून ७ ते १० दिवसांत ८ ते १० किलो हिरवा चारा तयार होतो. बियाणांचा दर्जा व प्रकारानुसार रोपांची १० ते ३० सेंमी उंचीपर्यंत वाढ होते. बियाणांमध्ये असलेल्या स्टार्चचा वापर करून रोपे मोठी होतात. त्यामुळे शुष्क पदार्थांचे प्रमाण कमी होते,पाणी शोषले जाते. प्रथिने व तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण वाढते. 

चारा निर्मितीमधील ठळक मुद्दे 
हंगामानुसार मका, बाजरीचे बियाणे १२ ते १४ तास पाण्यात भिजत ठेवावे. बियाण्याला कोंब येण्यासाठी २४ तास किंवा जास्त काळ गरजेनुसार पोत्यात अथवा सुती कापडात गुंडाळून ठेवावे. दोन फूट लांब आणि रुंद ट्रेमध्ये ८०० ग्रॅम ते एक किलो बियाणे पसरून ठेवावे. एका खोलीत अथवा चारी बाजूने आडोसा असलेल्या जागेची निवड करावी. बांबूच्या साहाय्याने एकावर एक रचलेला सांगाडा करून त्यामध्ये ट्रे ठेवावेत.दर एक तासाने एक मिनिट किंवा दर दोन तासाने दोन मिनिटे बियाणांवर पाण्याचा शिडकावा करावा.दहाव्या दिवसापर्यंत दहा इंच उंचीचा हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो.

चाऱ्याचे फायदे 

  • चारा निर्मितीसाठी जागा कमी लागते. मातीची आवश्‍यकता नसते.
  • कमीत कमी पाण्याचा वापर करून सातत्याने चारा उत्पादन घेता येते.
  • शेतामध्ये चारा तयार होण्यासाठी ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा  दिवसांत चाऱ्याची निर्मिती.
  • एक किलो बियाण्यापासून ७ ते ८ किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
  • कमीत कमी खर्चात जास्त चारा उत्पादन घेता येते.दुष्काळी भागांत चारा निर्मितीसाठी अत्यंत फायदेशीर.

-  डॉ. समीर ढगे, ९४२३८६३५९६
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कराड)


इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...