Agriculture Agricultural News Marathi article regarding implements regarding inter culture operations. | Agrowon

आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीर

वैभव सूर्यवंशी
बुधवार, 15 जुलै 2020

तण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,मोगी कोळपे,पॉवर वीडर यांचा वापर उपयुक्त ठरतो. अवजारांच्या वापरामुळे मजूर आणि वेळेची बचत होते.

तण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,मोगी कोळपे,पॉवर वीडर यांचा वापर उपयुक्त ठरतो. अवजारांच्या वापरामुळे मजूर आणि वेळेची बचत होते.

दातेरी हात कोळपे

 • दोन ओळीत निंदणी करण्यासाठी,मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो. मजुराची कार्यक्षमता टिकून राहते.
 •  कोळप्याचे पाते १५ सें.मी.लांबीचे असते.त्यामुळे दोन ओळींत १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकामध्ये या कोळप्याने निंदणी,खुरपणी करता येते.
 • कोळप्यामुळे साधारणपणे ३ सें.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते.सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या,मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपे सारख्या क्षमतेने वापरता येते.
 • हात कोळप्याचे वजन सात किलो असल्याने सहज उचलून नेता येते.एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी,खुरपणी करू शकतो.

सायकल कोळपे

 • याचा उपयोग १५ सें.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी,खुरपणी करण्याकरिता होतो.
 • ५ ते ७ सें.मी.पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते.
 • एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी,खुरपणी करू शकतो.

 मोगी कोळपे

 • याचा उपयोग २० सें.मी पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी करण्यासाठी होतो. याद्वारे मातीसुद्धा लावता येते.
 • कोळप्याबरोबर तीन वेगवेगळे पास दिलेले आहेत. ज्याच्या वापर पिकाच्या दोन ओळीतील अंतरानुसार करता येतो. 

पॉवर वीडर

 • बाजारपेठेत विविध क्षमतेचे पॉवर वीडर उपलब्ध आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो.
 • हे अवजार ओळीत लावलेल्या पिकांमध्ये, फळपिके आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते. 
 • ज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६० ते ७० सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कापूस, ऊस, डाळिंब, संत्रा, द्राक्षे इत्यादी विविध पिकांसाठी आपण पॉवर वीडरचा वापर करू शकतो. 
 • पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत. पॉवर वीडर मध्ये इंजीन , इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल  इ. भाग आहेत. 

-वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४,

(विषय विशेषज्ञ, कृषि शक्ती व अवजारे अभियांत्रिकी, कृषि विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म, जळगाव)

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...