Agriculture Agricultural News Marathi article regarding implements for soil drainage management | Page 2 ||| Agrowon

निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर, चीझल नांगर

वैभव सूर्यवंशी
गुरुवार, 7 जानेवारी 2021

फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कडक होते.फळबागेतील जमीन सुधारणेसाठी व्हायब्रेटिंग सब सॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो. 

फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कडक होते.फळबागेतील जमीन सुधारणेसाठी व्हायब्रेटिंग सब सॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो. 

सब सॉयलर 

  • सब सॉयलरला हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून १.५ ते २ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सब सॉयलरचा वापर आवश्‍यक आहे. 
  • हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत सब सॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सब सॉयलर चालतो. नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सब सॉयलर चालवावा. सब सॉयलरने ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार १.५ ते २ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.
  •  जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.
  • सब सॉयलरमुळे जमिनीतील जास्तीचे पाणी व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.
  • सब सॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे. ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सब सॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सब सॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. 
  • सब सॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी.

व्हायब्रेटिंग सबसॉइलर

  •   फळबागा,द्राक्ष बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. मातीची रचना खराब होते. पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येतात. या अडचणी लक्षात घेऊन   फळबागेतील जमीन सुधारणेसाठी व्हायब्रेटिंग सब सॉयलरचा वापर करावा.  याच्या वापराने जमिनीतील घट्ट झालेला मातीचा थर फोडला जातो. जमीन मोकळी होते.
  •   जमिनीतील पाणी आणि खनिजे वनस्पतीच्या मुळाच्या खोलीत आणि पावसाचे पाणी आणि सिंचनाचे पाणी जमिनीत चांगले मुरते.  त्याचा पीक वाढीस फायदा होतो. याच्या वापराने जमिनीत ओलावा टिकून रहातो. 
  •   हे यंत्र चालविण्यास सोपे आहे. कमी अश्वशक्ती लागते. 

चीझल नांगर  
  मर्यादित खोलीवर नांगरटीसाठी हा नांगर उपयुक्त आहे. याच्या वापराने  घट्ट झालेली जमीन  मोकळी केली जाते. 
  नांगराचा वापर करताना जमिनीवर फारसा दाब येत नाही. जमिनीतील कठीण थर लगेच मोकळा केला जातो. 
  हा नांगर जमिनीत १५ सें.मी. ते ४६ सें.मी. खोलीपर्यंत चालतो. 

-  वैभव सूर्यवंशी,  ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ (कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...
शास्त्रीय हाताळणी, पॅकिंग...खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला...
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या...वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग,...
सिंचनासाठी अत्याधुनिक स्वयंचलित पद्धती...सध्या स्वयंचलित यंत्रणेसाठी आवश्यक घटक आयात करावे...