Agriculture Agricultural News Marathi article regarding implements use in Ginger management. | Agrowon

आले पिकासाठी सुधारित अवजारे

डॉ. जयश्री रोडगे, सौ. मंजुषा रेवणवार
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.

आले आणि हळद लागवडीपासून विविध मशागतीची कामे केली जातात. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पांतर्गत हळद, आले लागवड ते उत्पादनापर्यंतचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की, बहुतांश पीक व्यवस्थापनाची कामे ही महिला करतात. ही कामे करण्यासाठी महिला अजुनही सुधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाहीत. हे लक्षात घेऊन महिलांचे श्रम कमी होण्यासाठी प्रकल्पांतर्गत विविध अवजारे विकसित करण्यात आली आहेत.विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत हळद  आणि आले पिकासाठी विविध लहान अवजारे तयार करण्यात आली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी झाले. वेळेवर काम करणे सुलभ झाले आहे. 

काडी-कचरा वेचण्यासाठी दाताळे 

 • मे ते जून या काळात शेतातील काडी,कचरा गोळा केला जातो. हे काम महिलांना करावे लागते. 
 • हाताने काडी,कचरा वेचण्यासाठी महिलांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे हातांना जखमा होतात. वाकल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. 
 • महिलांचा शेतातील काडीकचरा गोळा करण्याचा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले दाताळे वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे शारीरिक श्रम कमी होतात. वेळेची बचत होते.

कंद लागवडीसाठी उकरी आणि नखाळ्या 

 • काडी कचरा वेचल्यानंतर जमीन लागवडीसाठी तयार केली जाते. लागवडीसाठी सरी किंवा गादी वाफे तयार केले जातात.
 • कंद लावताना महिलांना दोन पायांवर बसून हाताच्या बोटांनी किंवा खुरप्याच्या साहाय्याने माती उकरून कंद लावावा लागतो. त्यामुळे बोटांना जखमा होतात, खुरप्याने माती उकरताना वेळ जास्त लागतो.
 • माती उकरून हळद आणि आले कंद लागवड करण्यासाठी उकरी आणि नखाळ्या ही छोटी अवजारे तयार करण्यात आली आहेत. उकरीमुळे माती उकरण्यास कमी वेळ लागतो. आले  कंद लागवडीचे काम  नेहमीच्या पद्धतीपेक्षा (३३ टक्के) लवकर होते.  
 • नखाळ्यांचा संच पाच बोटांमध्ये घालून जर माती उकरण्याचे काम केले तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आले कंद लागवडीचे काम (१६ टक्के) जास्त गतीने होते. हाताच्या बोटांना जखमा होत नाहीत. या अवजारांच्या वापरामुळे श्रमामध्ये बचत होऊन थकवा जाणवत नाही. 

 

तण काढण्यासाठी नवीन खुरपे

 • पिकामध्ये बहुतांश निंदणीची कामे महिला करतात. 
 • पारंपरिक पद्धतीने खुरप्याने तण काढले जाते. या पद्धतीमुळे महिलांना शारीरिक थकवा जाणवतो. श्रम जास्त लागतात. तण काढणे काहीवेळा अवघड जाते. वेळ जास्त लागतो. 
 •  निंदणीचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापिठाने सुधारित खुरपे विकसित केले आहे. या खुरप्यामुळे तण काढणे सोपे जाते. वेळ कमी लागतो. शारीरिक कष्ट कमी होतात. पारंपरिक खुरप्यापेक्षा ५ टक्के काम अधिक होते.

रोपांना माती लावण्यासाठी सावडी 

 • रोपांना माती लावताना पुरुष मंडळी खोरे वापरतात. हे खोरे वजनाने जड असल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करणे अवघड जाते. महिला रोपांना मातीची भर देण्यासाठी  जुन्या पाइपचा तुकडा, जुना पत्रा वापरतात. 
 •  मातीची भर देण्यासाठी पाईप तुकडा किंवा पत्रा वापरल्याने  महिलांच्या हाताला इजा होते.  हे लक्षात घेऊन विद्यापीठाने सावडी तयार केली आहे. 
 • सावडीला वरच्या बाजूस लाकडी मूठ आहे. याच्या वापराने महिलांच्या हाताला जखमा होत नाहीत. मातीची भर देण्याची गती (२१ टक्के) वाढते. 
 • माती लावण्याचे श्रम कमी झाल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही.

कंद स्वच्छतेसाठी हातमोजे

 • आले काढणी करताना नांगराचा वापर केला जातो. यामुळे आल्याचे कंद उघडे पडतात. 
 • तयार आल्याचे कंद जमिनीच्या बाहेर आल्यावर महिला हे गड्डे हाताने माती फोडून वेगळे करतात. हे काम महिला हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात. यामुळे बोटे आणि कातडीला जखमा होतात. 
 • पारंपरिक पद्धतीमध्ये महिला आल्याच्या गड्याची माती काढताना लोकरीचे मोजे वापरतात. पण हे मोजे एका दिवसात फाटून जातात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने विशिष्ट हातमोजे तयार केले आहेत. 
 • सुधारित हातमोजामुळे बोटांना इजा होत नाही. गड्डा स्वच्छ करण्याच्या कामाची गती वाढते. शारीरिक थकवा कमी होते. 

 

- डॉ. जयश्री रोडगे, ९५९४००५८४०

(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन,गृह विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

 

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...