Agriculture Agricultural News Marathi article regarding importance of Linseed. | Page 3 ||| Agrowon

जवस : एक सुपर फूड

डॉ. राजेश क्षीरसागर, ऋषिकेश माने
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

जवस  पिकाचा प्रत्येक भाग हा व्यावसायिकरित्या उपयोगी आहे. जवसाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याचा मानवी आहारात उपयोग वाढला आहे. 

जवस  पिकाचा प्रत्येक भाग हा व्यावसायिकरित्या उपयोगी आहे. जवसाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याचा मानवी आहारात उपयोग वाढला आहे. 

जवस हे एक अलीकडच्या काळात सुपर फूड 
 म्हणून पुढे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील अधिक प्रमाणात असलेले ओमेगा-३ स्निग्ध आम्ल, लिग्नीन तंतुमय पदार्थांचे आरोग्यास असलेले फायदे. यामध्ये हृद्यासंबंधित आजार, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण, मधुमेह, कर्करोग, अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील आजारावर परिणामकारकरीत्या उपाय आहेत. 

  • जवसामध्ये असणारे प्रथिने रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. जवसाच्या तेलाचा बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, नूडल्स अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्यांची पोषण तत्त्वे वाढविण्यास उपयोग केला जातो.  
  • जवसामध्ये ओमेगा-३ स्निग्ध आम्ल जसे की, अल्फा लिनोलेनिक आम्ल, तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि अॅन्टीऑक्सिडन्टस हे मुबलक प्रमाणात आहेत. याचा फायदा हृद्यासंबंधित आजार, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण, मधुमेह, कर्करोग, अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील आजारावरील उपायांसाठी केला जातो. 
  • खाद्य तेलबियांच्या बरोबरीने औषधी, औद्योगिक उपयुक्तता, पशुआहार, झाडाच्या तंतुंपासून कापडनिर्मिती असे जवसाचे उपयोग आहेत.

 

जवसाचे आरोग्यास असणारे  फायदे

वजन कमी करण्यास मदत 
जवसाच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक उत्कृष्ट पोषक तत्त्व आहे. 

आहारात उपयोगी पोषक तत्त्वांचा पुरवठा 
 जवसामध्ये आहाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्वे आहेत. ते ओमेगा ३ स्निग्धाम्ले, अ, ड, इ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम फॅास्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे.

रक्तातील कॉलेस्टरॉल कमी करण्यास मदत  
 जवस बियांमधील तंतूमय पदार्थ रक्तात उपस्थित खराब कोलेस्टेरोलला बांधतात आणि शरीरातून ते काढण्यास साहाय्य करतात. वजन आटोक्यात ठेवतात.

 हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत 
 जवस बियांमध्ये ओमेगा ३ स्निग्धाम्ले विशेषकरून अल्फा लिनोलेनिक आम्ल हे चांगल्या प्रमाणात आहे. जवस बिया तुमच्या हृदयासाठी एक योग्य आहार आहे. त्याने रक्तवाहिन्यामध्ये गाठी बनण्याचा धोका कमी होतो.

अस्थिरोगावर उपयुक्त 
जवसामध्ये प्रथिनांचे व कॅल्शिअम आणि फॅास्फरसचे  प्रमाण मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे हाडे मजबूत होतात व हाडांचे दुखणे कमी होते.

 यकृत निरोगी ठेवण्यास मदत 
जवसामध्ये असलेल्या अॅन्टीऑक्सिडन्टसमुळे यकृताचे डीटॉक्स करण्यात मदत होते. अॅन्टीऑक्सिडन्टस यकृतातील विषारी व अपायकारक पदार्थ काढण्यास मदत करतात.

पचन क्रिया चांगली होण्यास मदत 
आहारात जवसाचा वापर करावा. ज्यामुळे भूक चांगली लागते. पचनक्रिया चांगली होते. जवसातील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बधाकोष्टतेवरही फायदा होतो.

त्वचेसाठी उपयोगी 
जवसामध्ये असणाऱ्या अॅन्टीऑक्सिडन्टस गुणांमुळे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढते आणि नव्या  पेशी तयार होतात. त्वचा निरोगी राहाते. 

महिलांच्या समस्या दूर करण्यात मदत  
जवसामुळे महिलांचे हार्मोन बॅलन्स नियंत्रित राहते. यामध्ये असणारे फायटोइस्ट्रोजेन हे मासिक पाळी संबंधी समस्यांवर उपायकारक आहेत. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

- डॉ. राजेश क्षीरसागर, ९८३४९०५५८०
(अन्न अभियांत्रिकी विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

 

 

 

 

 

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
होळीसाठी नैसर्गिक रंगनिर्मितीचा व्यवसायघरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे....
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायएव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक...
अंजिरापासून बर्फी, गर, पावडरअंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थचिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे...
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
जवस : एक सुपर फूडजवस  पिकाचा प्रत्येक भाग हा...
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...