Agriculture Agricultural News Marathi article regarding importance of trap crop. | Page 2 ||| Agrowon

सापळा पिकांची लागवड महत्त्वाची

डॉ. प्रशांत उंबरकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड महत्त्वाची आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते. 

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड महत्त्वाची आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते. 

मुख्य पिकांमध्ये सापळा पिकांची लागवड हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. हानिकारक किडींपासून संरक्षण करण्यासाठी किडींना ज्यास्त बळी पडणारे हंगामानुसार दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कामी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते. पर्यावरणाचे संवर्धन होते. मुख्य पिकाच्या उत्पादनात वाढ होते. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे. 

सापळा पिकांचे नियोजन
सोयाबीन 
सोयाबीनभोवती एरंडी या सापळा पिकाची एक ओळ बोर्डरवर लावावी. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भाव ग्रस्त एरंडीची पाने अळीच्या समूहासहित नष्ट केल्याने मुख्य पिकाचे संरक्षण होते. सोयाबीन पिकाभोवती ज्वारीची ओळ लावावी किंवा पेरणीच्या वेळेस १०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे सोयाबीन बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. सूर्यफूल किंवा झेंडूची एक ओळ पिकाभोवती लावावी. 

कापूस 
कपाशी पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक बोर्डर ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलाकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षिला जाऊन त्यावर अंडी घालतो.
कपाशीच्या भोवती एरंडीची एक ओळ लावावी. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालतो. असे अंडीपुंज आणि प्रादुर्भाव ग्रस्त एरंडीची पाने अळ्यांच्या पुंजक्या सहित नष्ट करावीत.
कपाशीच्या दहा ओळीनंतर एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरावी. मावा ही कीड चवळीवर मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे ढालकिडा, सिरफीड माशी क्रायसोपा ई. मित्रकिडींची वाढ होते. मका, मूग उडीद या पिकांवर मित्रकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.   

तूर
तूर पिकावरील हिरव्या बोंड अळीच्या व्यवस्थापनाकरिता ज्वारी किंवा बाजरीची आंतरपीक म्हणून किंवा तूर पेरणीच्या वेळेस १०० ग्रॅम ज्वारी/बाजरी (१ टक्का) बियाणे १० किलो तुरीच्या बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. यामुळे पक्षांना बसण्यासाठी पक्षी थांबे तयार होतात. हे पक्षी पिकावरील किडींना टिपून नष्ट करतात. तूर पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक बोर्डर ओळ लावावी.

भाजीपाला पिके

  •   कीड व्यवस्थापनाकरिता भाजीपाला पिकामध्ये झेंडू, बडीशोप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी या सापळा पिकांची लागवड करावी. यावर मित्र किडी, मधमाशा आकर्षिल्या जातात. 
  •    सापळा पिकामुळे रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होतो आणि भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन मिळते. 
  •   टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकाच्या बोर्डरवर एक ओळ झेंडू आणि दोन ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात. झेंडूच्या मुळामधून अल्फा टर्थीनिल हे रसायन स्रावते. यामुळे सुत्रकृमीचे नियंत्रण होण्यास मदत होते. 
  •    कोबीवर्गीय पिकामध्ये बोर्डरवर एक ओळ मोहरी पिकाची लागवड करावी.

- डॉ. प्रशांत उंबरकर, ९४२११३८९३६ 

(कृषी विज्ञान केंद्र, वर्धा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...